< 詩篇 39 >
1 達味詩歌,交與樂官耶杜通。 我已決定:我要謹遵我的道路,免得我以口舌犯罪,當惡人在我面前時,我以口罩籠住我嘴。
१मुख्य गायकासाठी; यदूथूनासाठी, दाविदाचे स्तोत्र. मी ठरवले “मी जे बोलेन त्याकडे लक्ष देईन, म्हणजे मी माझ्या जीभेने पाप करणार नाही.”
2 我默不作聲,以免口出惡語,但我的痛楚更因此而加劇。
२मी स्तब्ध राहिलो, चांगले बोलण्यापासूनही मी आपले शब्द आवरले. आणि माझ्या वेदना आणखी वाईट तऱ्हेने वाढल्या.
3 我的心在腔滾滾沸騰,我愈沉思愈覺得烈火如焚;我的舌頭便不耐煩地說:
३माझे हृदय तापले, जेव्हा मी या गोष्टींविषयी विचार करत होतो, तेव्हा ते अग्नीप्रमाणे पेटले. तेव्हा शेवटी मी बोललो.
4 上主,求你明白啟示我:我的終期和壽數究有幾何,好使我知道我是何等脆弱。
४हे परमेश्वरा, माझ्या जीवनाचा अंत केव्हा आहे, आणि माझ्या आयुष्याचे दिवस किती आहेत हे मला कळू दे, मी किती क्षणभंगुर आहे ते मला दाखव. माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
5 你使我的歲月屈指可數,我的生命在你前算是虛無。世人的生存只是一口呵噓。
५पाहा, तू माझे दिवस हाताच्या रुंदी इतके केले आहेत. आणि माझा जीवनकाल तुझ्यासमोर काहीच नाही. खचित मनुष्य केवळ एक श्वासच आहे.
6 人生實如泡影,只是白白操勞,他們所有積蓄不知誰來得到。
६खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो, खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो, पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार.
7 我主,現今我還什麼希望?我的希望寄託在你的身上!
७हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू? तूच माझी एक आशा आहेस!
8 救你救我脫離我的種種罪愆,不要使我受愚人的恥笑侮慢。
८माझ्या अपराधांवर मला विजय दे, मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको.
९मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही. कारण हे तुच केले आहेस.
10 求你由我身上去這場災患,因你手的打擊,我已消瘦不堪。
१०मला जखमा करणे थांबव, तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे.
11 你為了罰罪而把世人懲治,你像蛀蟲將他的珍寶侵蝕;至於人,不過只是一口氣。上主,求你俯聽我的祈禱,求你側耳靜聽我的哀告,莫要作聾不聽我的哭號。因為
११जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस. कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो. खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला)
१२परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझ्याकडे कान लाव. माझे रडणे ऐक, कारण तुझ्याजवळ परका, माझ्या पूर्वजांसारखा उपरी आहे.
13 求你轉移你的目光,不要怒視我,使我一去不返之前能得享安樂。
१३तुझे माझ्यावरील टक लावून बघने फिरव, म्हणजे मी मरणाच्या आधी पुन्हा हर्षीत होईल.