< 詩篇 30 >

1 【病後感恩歌】 聖殿祝聖的詩歌,達味作。 上主,我稱揚你,因為你救拔了我,你也沒有使我的仇敵向我自誇。
स्तोत्र; मंदिराच्या प्रतिस्थापनेच्या वेळचे गाणे. दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस.
2 上主,我一向你呼號,我主,你便醫治了我。
हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले.
3 上主,你由陰府中把我救出,又使我安全復生,免降幽谷。 (Sheol h7585)
हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे. (Sheol h7585)
4 上主的聖民,請向上主歌頌,稱謝上主的聖名。
जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
5 因為上主的忿怒,瞬息消散;上主的恩愛卻要終生綿延。晚間雖令人哭涕,清晨卻使人歡喜。
कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
6 我曾自誇說過,我永不會動搖。
मी आत्मविश्वासात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही.
7 上主,你恩待我,使我立足於穩固山岡;但是你一掩面,我便立刻感到失措驚惶。
होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो.
8 上主,我曾向你呼號,我曾向我主哀求說:
परमेश्वरा, मी तुझ्याकडे आरोळी केली आणि माझ्या प्रभू कडून अनुग्रह मागितला.
9 我如果降入陰府,我的血於你何益?灰土豈能讚美你,或宣揚你的忠義?
मी मरण पावल्यावर खाली थडग्यात गेलो तर काय लाभ? माती तुझी स्तुती करणार काय? ती तुझी विश्वासयोग्यता सांगेल काय?
10 上主,請俯聽我,憐憫我;上主,求你前來助佑我。
१०हे परमेश्वरा, ऐक आणि माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला मदत करणारा हो.
11 你把我的哀痛,給我變成了舞蹈,脫去了我的苦衣給我披上喜樂;
११तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत.
12 為此,我的心靈歌頌你,永不止息;上主,我的天主,我要永遠稱謝你!
१२म्हणून माझे हृदय तुझी स्तुती गाईल आणि शांत राहणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सर्वकाळ स्तुती करीन.

< 詩篇 30 >