< 箴言 19 >
१ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे.
२ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही, आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो.
३मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो, आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते.
४संपत्ती खूप मित्रांची भर घालते, पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात.
5 作假見證的人,難免受罰;撒播謊言的人,勢必難逃。
५खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही.
६उदार मनुष्यापासून पुष्कळ लोक मदतीसाठी विचारणा करतात; आणि जो कोणी दान देतो त्याचा प्रत्येकजण मित्र आहे.
7 人窮兄弟恨,朋友更遠離;誰追求空言,是捕風捉影。
७गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात, तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार! तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात.
8 獲得明哲的,必愛惜自己;珍惜明智的,必覓得幸福。
८जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो, जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल.
9 作假見證的人,難免受罰;撒播謊言的人,自趨滅亡。
९खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल.
10 安逸的生活,不適於愚人;奴隸管君主,更是不相宜。
१०मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही, तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते.
११बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो, आणि अपराधाकडे दुर्लक्ष करणे त्याची शोभा आहे.
12 君主的盛怒,有如獅子的怒吼;君王的恩惠,有如草上的朝露。
१२राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे.
13 愚昧的兒子,是父親的災禍;吵鬧的女人,有如屋頂漏水。
१३मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे; आणि भांडखोर पत्नी सतत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे.
14 房屋與錢財,是父母的遺產;賢明的妻子,是上主的恩賜。
१४घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे, पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.
१५आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.
16 恪守上主誡命的,可保全生命;輕視上主道路的,必自趨喪亡。
१६जो कोणी आज्ञा पाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, पण जो मनुष्य आपल्या मार्गाविषयी विचार करत नाही तो मरेल.
17 向窮人施捨,是借貸於上主;對他的功德,上主必要報答。
१७जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो, आणि तो त्याने जे काही केले त्याची परतफेड करील.
18 尚有希望時,應懲罰兒子;但不可存心置他於死地。
१८काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर, आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको.
१९रागीट मनुष्याला दंड दिला पाहिजे; जर तुम्ही त्यास सोडवले, तर तुम्हास दुसऱ्या वेळेसही सोडवावे लागेल.
20 你應聽取勸告,接受教訓,使你今後成個明智的人。
२०सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार, म्हणजे तू आपल्या आयुष्याच्या शेवटी सुज्ञान होशील.
21 人在心中儘可策劃多端,實現的卻是上主的計劃。
२१मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात, पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील.
२२प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते; आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला.
23 敬畏上主,使人得生命,滿懷敬畏,必無殃無禍。
२३परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे; आणि तो जीवनाकडे नेतो, आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे, आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही.
२४आळशी आपला हात ताटात घालतो, आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.
25 你若杖責輕狂人,幼稚者將變明智;你只譴責明智者,他即更明瞭義理。
२५निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल, बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल.
२६जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो, तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे.
२७माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील.
28 邪曲的見證,戲笑公義;惡人們的嘴,吞食不義。
२८भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो आणि वाईटाचे मुख अन्याय गिळून टाकते.
२९निंदकासाठी धिक्कार आणि मूर्खाच्या पाठीसाठी फटके तयार आहेत.