< 民數記 36 >
1 那時若瑟後裔的家族中,有默納協的子孫,瑪基爾的兒子基肋阿得子孫的家族首領,來到梅瑟和叵子民各家族的首領前說:
१नंतर योसेफवंशाच्या कुळातला मनश्शेचा मुलगा माखीर याचा मुलगा गिलाद याच्या वंशातल्या घराण्यातील प्रमुख जवळ आले ते मोशेपुढे व इस्राएल लोकांच्या घराण्यातील प्रमुखांशी बोलायला गेले.
2 「上主吩咐我主,以抽籤來分給以色列子民土地為產業,我主又領了木的保,將我們兄弟責羅斐哈得的產業,分給他的女兒們。
२ते म्हणाले, परमेश्वराने इस्राएलाला चिठ्ठ्या टाकून आमचे वतन घेण्याची आमच्या स्वामींना आज्ञा केली आहे. याप्रकारे परमेश्वराने सलाफहादची जमीन त्याच्या मुलींना द्यायची आज्ञा केली आहे. सलाफहाद आमचा भाऊ होता.
3 現在,如果她們嫁給了以色列子民另一支派的人,她們的產業就脫離了我們祖先的產業,而加在所嫁給的那一支派的產業上:這樣,我們抽籤分得的產業就減少了。
३आता जर त्या इस्राएलाच्या वंशातल्या दुसऱ्या कोणत्याही वंशांच्या मुलाशी विवाह केला तर त्यांचे वतन आमच्या वडिलांच्या वतनातून त्यांचा हिस्सा काढून घेतला जाईल.
4 甚至一到以色列子民的喜年,她們的產業仍舊加在所嫁的那一支派的產業內,我們祖先支派的產業就減少了她們那一份」。
४आणि जेव्हा इस्राएलाच्या वंशाचे योबेल होईल तेव्हा ज्यांच्या त्या होतील त्यांच्या वंशाच्या वतनात त्यांचे वतन मिळवले जाईल, अशाने त्यांचे वतन आमच्या वडिलांच्यावंशाच्या वतनातून काढून टाकले जाईल.
5 梅瑟依上主的指示訓令以色列子民說:「若瑟子孫支派說的有理。
५मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून इस्राएल लोकांस ही आज्ञा दिली, तो म्हणाला, योसेफाच्या वंशाचे म्हणणे बरोबर आहे.
6 上主對於責羅斐哈得的女兒們這樣這樣吩咐說:她們可任意嫁給自己所喜愛的人,但只應嫁給屬於自己祖先支派的人。
६सलाफहादाच्या मुलींसाठी परमेश्वराची ही आज्ञा आहे: जर तुम्हास कोणाशी लग्न करायचे असेल तर तुम्ही तुमच्या वंशातील कोणाशी तरी लग्न करा.
7 以色列子民的產業不可由一支派轉移至另一支派,因為以色列子民每人應固守自己祖先支派的產業。
७यामुळे इस्राएल लोकांमध्ये वतन एका वंशाकडून दुसऱ्या वंशाकडे जाणार नाही. आणि प्रत्येक इस्राएली मनुष्यास त्याच्या पूर्वजांकडून मिळालेले वतन ठेवता येईल.
8 以色列子民支派中,凡繼承產業的子女,應嫁給她祖先支派的人為妻,好使每個以色列子民能固守祖先的產業。
८आणि इस्राएल वंशातल्या कोणत्याही एखाद्या स्त्रीला तिच्या वडिलांकडून वतन मिळाले तर तिने तिच्या कुळातील एखाद्याशीच लग्न केले पाहिजे. यामुळे प्रत्येकाला पूर्वजांकडून मिळालेली वतन ठेवता येईल.
9 這樣產業就不會由一支派轉移至另一支派,因為以色列子民各支派應固守自己的產業」。
९तेव्हा इस्राएल लोकांमध्ये वतन एक वंशाकडून दुसऱ्या कुळाकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक इस्राएली मनुष्य त्याच्या पूर्वजांकडून मिळालेले वतन जवळ बाळगू शकेल.
10 上主怎樣吩咐了梅瑟,責羅斐哈得的女兒們就怎樣做了。
१०सलाफहादच्या मुलींनी परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे पालन केले.
11 責羅斐哈得的女兒:瑪赫拉、提爾匝、曷米革拉、米耳加和諾阿,嫁給了自己叔伯的兒子們,
११म्हणून सलाफहादच्या महला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ यांनी त्यांच्या चुलत भावांशी लग्न केले.
12 即嫁給了若瑟的兒子默納協子孫家族的人:如此她們的產業仍留在她們祖先家族的支派內。
१२योसेफाचा मुलगा मनश्शे याच्या वंशातील ते होते. म्हणून त्यांची वतने त्यांच्या वडिलांच्या कुळाकडेच राहिली.
13 這是上主在耶利哥對面,約旦河邊,摩阿布曠野內,藉梅瑟向以色列子民所頒佈的誡命和規則。
१३परमेश्वराने यार्देनपाशी यरीहोजवळ मवाबाच्या मैदानात मोशेच्याद्वारे इस्राएलाच्या वंशाना दिलेल्या या आज्ञा व नियम आहेत.