< 那鴻書 1 >

1 關於尼尼微的神諭,厄耳科士人納鴻的神視錄:
निनवे शहराविषयीची घोषणा. एल्कोशी नहूम याच्या दृष्टांताचे पुस्तक.
2 上主是嫉惡和復仇的天主;上主要復仇,且憤恕填胸;上主汐必對敵人復仉,必向仇人洩怒。
परमेश्वर हा ईर्ष्यावान व सूड घेणारा देव आहे; परमेश्वर सूड घेणारा व क्रोधयुक्त देव आहे. परमेश्वर आपल्या विरोध्यांचा बदला घेतो आणि तो आपल्या शत्रूंसाठी क्रोध राखून ठेवतो.
3 上主雖緩於發怒,但能力偉大,衪決不全然免罰;衪的行為是在狂風暴雨中,雲彩是衪腳下的塵埃。
परमेश्वर रागवण्यास मंद आणि महापराक्रमी आहे; त्याच्या शत्रूंना तो निरापराध ठरवणार नाही. परमेश्वर झंझावातातून आणि वादळातून त्याचे मार्ग काढतो आणि मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत.
4 衪一呵叱海洋,海洋即枯竭,眾河流也為之乾涸,巴商與加爾默耳於是枯槁,黎巴嫩的花卉也隨之凋謝。
तो समुद्राला दटावतो आणि त्यास कोरडा करतो; तो सर्व नद्या कोरड्या करतो. बाशान व कर्मेलसुद्धा गळून जातील; लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो.
5 山岳在衪面前震盪,丘陵動搖;大地寰宇及其中所有的居民,在衪面前莫不戰慄。
त्याच्या उपस्थितीने पर्वत हलतात आणि टेकड्या वितळून जातात; त्याच्या उपस्थितीने पृथ्वी कोसळते, खरोखर हे जग आणि त्यामध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य थरथरतो.
6 誰能抵得住衪的怒氣﹖誰能忍受得住衪的烈怒﹖衪的憤怒如火冒出,連磐石也要在衪面前破碎。
त्याच्या क्रोधापुढे कोण उभा राहू शकेल? त्याच्या क्रोधाच्या संतापाचा कोण प्रतिकार करू शकेल? त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे ओतलेला आहे आणि त्याच्यामुळे खडक फुटून जातात.
7 上主原是良善的,是患難之日的避難所,衪必照顧依賴衪的人;
परमेश्वर चांगला आहे, संकटसमयी तो शरणदुर्ग आहे आणि जे त्याच्या ठायी आश्रय घेतात त्यांना तो जाणतो.
8 在洪流氾濫時,衪必拯救他們;但對衪的敵人,衪必予以毀滅,將衪的仇人驅入黑暗。
पण तो त्याच्या शत्रूंचा पूर्णपणे महापुराने नाश करील; तो त्यांचा पाठलाग करून अंधारात उधळून लावील.
9 尼尼微,你們對上主有什麼圖謀﹖衪必完全予以毀滅,不必二次降災。
तुम्ही लोक परमेश्वराविरुध्द काय योजना करत आहात? पण तो त्याचा पूर्ण अंत करील; दुसऱ्यांदा विपत्ती उठणारच नाही.
10 他們像纏結的荊棘[又像大醉的豪飲者,]必如乾楷全被燒盡。
१०ते गुंतागुंत झालेल्या काटेरी झुडपाप्रमाणे, आपल्या स्वत: च्या पिण्याने मस्त झालेले असले तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील.
11 是由你們中間出現了那妄想反抗上主,圖謀惡計的人。
११जो परमेश्वराविरुध्द वाईट योजना करतो, दुष्कर्माला बढती देतो असा कोणी एक निनवेतून निघाला आहे.
12 上主這樣說:「雖然他們裝備齊全而且眾多,但仍要被剷除,歸於烏有。雖然磨難了你,我必不再磨難你。
१२परमेश्वराने जे काय म्हटले ते हेः जसे परमेश्वराने म्हटले, जरी ते त्यांच्या संपूर्ण बलाने आणि संख्येने पुष्कळ असले तरीसुद्धा ते छेदले जाऊन त्यांचे लोक नाहीसे होतील. परंतु तू यहूदा, जसे परमेश्वराने म्हटले; जरी मी तुला पीडले आहे तरी पुढे मी तुला पीडणार नाही.
13 現在我必由你身上打斷他的軛,打碎你的鎖鏈。
१३तर आता मी त्यांचे जोखड तुझ्यावरून मोडून काढीन व तुझी बंधने तोडून टाकीन.
14 尼尼微,上主已對你下了命令:你的名字不再傳於後世;我要把彫像鑄像由你神廟內除去,並使你的墳墓成為辱罵的對象。」
१४आणि परमेश्वराने तुझ्याबद्दल आज्ञा दिली आहे की, निनवे, तुझे नाव धारण करणारे तुझ्या वंशातील कोणीही उरणार नाही. मी तुझ्या देवाच्या मंदिरातील कोरलेल्या मूर्ती व ओतीव मूर्ती छेदून टाकीन. मी तुझी कबर खोदून काढील, कारण तू दुष्ट आहेस.
15 看,那傳報福音,宣侑和平者的腳已站在山上! 猶大,你的慶節,償還你的誓願吧! 因為那惡者不會再由你中間經過,他已全然消滅。
१५पाहा, जो सुवार्ता आणतो, शांती जाहीर करतो! असा जो त्याचे पाय पर्वतांवर आहेत, यहूदा आपले सण साजरे कर, आपले नवस फेड, दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करणार नाही, त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.

< 那鴻書 1 >