< 彌迦書 5 >
1 被圍困的女子,現在妳要抓傷身,他們己圍困住我們,用棍杖搫打以色列民長的面頰。
१यरूशलेमेतील लोकहो, आता युध्दामध्ये एकत्र या. तुझ्या शहरा भोवती एक भिंत आहे, पण ते काठीने इस्राएलाच्या न्यायाधीशाच्या गालावर मारतील.
2 厄弗辣大白冷! 你在猶大群邑中雖是最小的,但是將由你從我生出一位統治以色列的人,他的來歷源自亙古,遠自永遠的時代。
२पण हे, बेथलहेम एफ्राथा. जरी तू यहूदातील सर्व कुळांत सर्वात लहान आहेस. तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलात अधिकारी व्हायला एकजण निघेल. त्याचा प्रारंभ पुरातन काळापासून, प्राचीन काळापासून आहे.
3 因此,上主必將遺棄他們,直到孕婦生產之時,那時他 弟兄中的遺民必將歸來,與以色列子民團聚。
३यास्तव प्रसूतीवेदना पावणारी प्रसवेपर्यंत तो त्यांना सोडून देईल, आणि मग त्याचे उरलेले भाऊ इस्राएलाच्या लोकांकडे परत येतील.
4 他必卓然屹立,以上主的能力及上主他們的天主之名的權威,牧放自己的羊群。他們將獲得安居,因為他必大有權勢,直達地極。
४तो उभा राहून परमेश्वराच्या सामर्थ्याने, परमेश्वर त्याचा देव याच्या नावाच्या प्रतापाने, आपला कळप चारील, आणि ते वस्ती करतील; कारण आता तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत महान होत जाईल.
5 他本人將是和平! 當亞述人侵入我們地域,蹂躪我們領土時,必有七個牧者,八個人民首領奮起對抗。
५आणि तो पुरुष आंम्हास शांती असा होईल. अश्शूर जेव्हा आमच्या देशात येईल व ते आमच्या राजवाड्यात चालतील, तेव्हा आम्ही सात मेंढपाळ आणि आठ मुख्य त्याच्याविरुध्द उभे राहू.
6 他們必用刀統治亞述,用劍管轄默洛得地。當亞述侵入我們地域,蹂躪我們的境域時,他必救援我們。
६तो आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर आणि निम्रोदच्या प्रदेशांमध्ये तलवारीने घात करेल. जेव्हा ते आमच्या देशात येतील आणि आमच्या सीमा पायदळी तुडवतील. तेव्हा हा पुरुष त्याच्यापासून आम्हाला सोडवीन.
7 那時,雅各伯的遺民,在許多民族中,必如由上主而來的朝露,必如落在青草上的甘霖,不再期待於人,也不寄望於人子。
७जसे परमेश्वराकडून दहिवर येते, जशा गवतावर सरी येतात आणि त्या मनुष्याची वाट पाहत नाही व मनुष्याच्या मुलाची वाट पाहत नाही, तसे याकोबचे उरलेले लोक पुष्कळ लोकांच्यामध्ये होतील.
8 那時,雅各伯的遺民,在異民中,在許多民族中,必如獅子在森林百獸中,必如幼童在羊群中,所經之處,必加以蹂躪摧殘,無人能夠搶救。
८जसा जंगलातील प्राण्यांमधील सिंह येतो, जसा तरूण सिंह मेंढ्यांच्या कळपांत येतो, आणि तो मेंढ्यांच्या कळपातून गेला तर त्यांना तुडवितो व चिरडून टाकतो व त्यांना वाचवायला कोणी नसते, त्याच प्रकारे याकोबाचे राहीलेले लोक, पुष्कळ लोकांच्यामध्ये असतील.
9 你的手臂將高舉在你敵人之上,你的一切仇敵必要滅絕。
९तुझा हात तू शत्रूंवर उंचावलेला होवो आणि तो त्यांचा नाश करो.
10 到那一日──上主的斷語──我必由你中間毀滅你的戰馬,破壞你的車輛,
१०परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात असे होईल की, मी तुझे घोडे तुझ्यामध्ये नष्ट करीन आणि तुमचे रथ मोडून टाकीन.
११तुझ्या देशातील गावांचा मी नाश करीन आणि तुझे सर्व किल्ले पाडून टाकीन.
१२तुझ्या हातून मी जादूटोणा नष्ट करीन, आणि तुमच्यात यापुढे भविष्य सांगणारे नसतील.
13 我必由你們中間消滅你的彫像和石柱,使你不再膜拜你手製的作品;
१३मी तुझ्या कोरीव मूर्तींचा आणि दगडी स्तंभांचा नाश करीन. तुमच्या हातांनी घडविलेल्या वस्तूंची तुम्ही पूजा करणार नाही.
१४तुझ्यामधून अशेराचे पूजास्तंभ मी उपटून काढीन, आणि तुझ्या शहरांचा नाश करीन.
15 對那不順服的異民,我必在憤怒激憤之下施以報復。
१५आणि ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही त्यांचा मी क्रोधाने व कोपाने प्रतिकार करीन.”