< 路加福音 1 >
१ज्या गोष्टींची आम्हास पक्की खातरी आहे त्या गोष्टी जे प्रारंभापासून प्रत्यक्ष पाहाणारे व शब्दाचे सेवक होते,
2 關於在我們中間所完的事蹟,己有許多人,依照那些自始親眼見過,並為真道服役的人所傳給我們的,著手編成了記述,
२त्यांनी त्या जशा आम्हास सोपवून दिल्या त्या तशाच सांगाव्या म्हणून त्यांविषयीचा वृत्तांत अनुक्रमाने लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे.
3 我也從頭仔細查訪的一切,遂立意按著次第給你寫出來,
३म्हणून हे थियफिला महाराज, मी सर्व गोष्टींचा मुळापासून चांगला शोध केल्यामुळे मलाही हे बरे वाटले की, या सर्व घटनांविषयीची माहिती आपणाला व्यवस्थित पणे माहिती लिहावी.
४यासाठी की ज्या गोष्टींचे शिक्षण आपल्याला मिळाले आहे त्यांचा निश्चितपणा आपण पूर्णपणे जाणावा.
5 在猶太王黑落德的時候,阿彼雅班中有一位司祭名叫匝加利亞,他的妻子是出於亞郎的後代,名叫依撒伯爾。
५यहूदीया प्रांताचा राजा हेरोद याच्या दिवसात, जखऱ्या नावाचा कोणी याजक होता. तो अबीयाच्या याजक घराण्यातील असून त्याची पत्नी अहरोनाच्या वंशातील होती व तिचे नाव अलीशिबा होते.
6 二人在天主前是義人,都照上主的一切誡命和禮規行事,無可指摘。
६ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत.
7 但是,他們沒有孩子,因為依撒伯爾素不生育,兩人又都上了年紀。
७परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती, शिवाय ते दोघेही फार म्हातारे झाले होते.
8 正逢匝加利亞輪著他的班次,在天主前盡司祭的職務時,
८मग असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे त्याचे याजकाचे काम करत असता,
9 按著司祭的常例,他抽中了籤,得進上主的聖所獻香。
९याजकांच्या रीतीप्रमाणे परमेश्वराच्या भवनात धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली.
१०आणि लोकांचा सगळा जमाव धूप जाळण्याच्या वेळेस बाहेर प्रार्थना करीत उभा होता.
११तेव्हा परमेश्वराचा दूत, धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.
१२त्यास पाहून जखऱ्या भयभीत झाला.
13 但天使向他說:「匝加利亞,不要害怕! 因為你的祈禱己蒙應允,你的妻子依撒伯爾要給你生一個兒子,你要給他起名叫若翰。
१३परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलीशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव.
14 你必要喜樂歡躍,許多人也要因他的誕生而喜樂,
१४तेव्हा तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील.
15 因為他在上主面將是偉大的,淡酒濃酒他不喝,而且他在母胎中就要充滿聖神;
१५कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.
१६तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल.
17 他要以厄利亞的精神和能力,在祂在前面先行,為使父的心轉向兒子,使悖逆者轉向義人的心意,並為上主準備一個善良的百姓。」
१७आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलीयाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल.
18 匝加利亞遂向天主說:「我憑什麼能知道這事呢? 因為我已經老了,我的妻子也上了年紀。」
१८मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे घडणारच असे मी कशावरुन समजू? कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नीसुद्धा उतारवयात आहे.”
19 天使回答說:「我是站在天主在前面的加俾額爾,奉命來向你說話,報告給你這個喜訊。
१९देवदूताने त्यास उत्तर दिले, “मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रीएल आहे आणि तुझ्याशी बोलायला व तुलाही सुवार्ता सांगायला मला पाठविण्यात आले आहे.
20 看,你必成為啞吧,不能說話,宜到這事成就的那一天,因為你沒有相信我的話;但我的話屆時必要應驗。」
२०पाहा, हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही व तू मुका राहशील कारण माझे शब्द जे योग्यवेळी पूर्णपणे खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”
२१तेव्हा जखऱ्याची वाट पाहणाऱ्या लोकांस तो परमेश्वराच्या भवनात इतका वेळ का राहिला याचे आश्चर्य वाटले.
22 及至他出來後,不能與他們講話,他們這才知道他在聖所中見了異象,他已成了啞吧,只給他們打手勢
२२तो बाहेर आल्यावर त्यास त्यांच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्यांना जाणिव झाली की, परमेश्वराच्या भवनात त्याने दृष्टांत पाहिला आहे. तो त्यांना खुणा करत होता परंतु तो तसाच मुका राहीला.
२३मग असे झाले की त्याच्या सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो घरी परत गेला.
24 幾天以後,他的妻子依撒伯爾了孕,自己躲藏了五個月,說:
२४त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली व पाच महिने लपून राहिली, ती म्हणाली,
25 「上主在眷顧的日子這樣待了我,除去了我在人間的恥辱。
२५लोकांमध्ये माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले.
26 到了第六個月,天使加俾額爾奉天主差遺,往加利肋亞一座名叫納匝肋的城去,
२६अलीशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावी,
27 到一位童貞女那裡,她已與達味家族中一個名若瑟的男子訂了婚,童貞女的名叫瑪利亞。
२७एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते.
28 天使進去向她說:「萬福! 充滿恩寵者,上主與妳同在! 」[在女人中妳是蒙祝福的。]
२८देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभू तुझ्याबरोबर आहे.
29 她卻因這話驚惶不安,便思慮這樣的請安有什麼意思。
२९परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली.
30 天使對她說:「瑪利亞,不要害怕,因為妳在天主在面前獲得了寵幸。
३०देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे.
३१पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव.
32 祂將是偉大的,並被稱為至高者的兒子,上主天主要把祂祖先達味的御座賜給祂。
३२तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल.
33 祂要為王統治雅各伯家,直到永遠;祂的王權沒有終結。」 (aiōn )
३३तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (aiōn )
34 瑪利亞便向天使說:「這事怎能成就? 因為我不認識男人。」
३४तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही.
35 天使答覆她說:「聖神要臨於妳,至高者的能要庇廕妳,因此,那要誕生的聖者,將稱為天主的兒子。
३५देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्यास देवाचा पुत्र म्हणतील.
36 且看,妳的親戚依撒伯爾,她雖在老年,卻懷了男胎,本月已六個月了,她原是素稱不生育的
३६बघ, तुझी नातेवाईक अलीशिबा ही सुद्धा म्हातारपणात गरोदर असून तिला पुत्रगर्भ राहीला आहे आणि जिला वांझ म्हणले जाई तिला आता सहावा महिना आहे.
३७कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
38 瑪利亞說:「看,上主的婢女,願照你的話成就於我吧! 」天使便離開她去了。
३८मरीया म्हणाली, खरोखर “मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
39 瑪利亞就在那幾日動身,急速往山區去,到了猶太的一座城。
३९त्या दिवसात मरीया उठली आणि घाईने यहूदीया प्रांताच्या डोंगराळ भागातील एका नगरात गेली.
४०तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले.
41 依撒伯爾一聽到瑪利亞安,胎兒就在她腹中歡躍。依撒伯爾遂充滿聖神,
४१जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली.
42 大聲呼喊說:「在女人中妳是蒙祝福的,妳的胎兒也是蒙祝福的。
४२ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, “स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे.
४३माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला कोठून?”
44 看,妳安的聲音一入我耳,胎兒就在我腹中歡喜跳躍。
४४जेव्हा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडली, तेव्हा माझ्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली
45 那信了由上主傳於她的話必要完成的,是有福的。」
४५जिने विश्वास ठेवला ती धन्य आहे, कारण ज्या गोष्टी प्रभूने तिला सांगितल्या त्याची पूर्णता होईल?
४६मरीया म्हणाली, “माझा जीव प्रभूला थोर मानतो,
४७आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे.
48 因為祂垂顧了祂婢女的卑微,今後萬世萬都要稱我有福;
४८कारण त्याने आपल्या दासीची दैन्य अवस्था पाहीली. आतापासून मला सर्व पिढ्या धन्य म्हणतील.
४९कारण जो सर्वसमर्थ आहे त्याने माझ्यासाठी मोठी कामे केली आहेत; आणि त्याचे नाव पवित्र आहे.
५०जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे
५१त्याने त्याच्या हाताने सामर्थ्याची कार्ये केली आहेत; जे गर्विष्ठ अंतःकरणाचे आहेत त्यांची त्याने पांगापांग केली आहे.
52 祂從高座上推下權勢者,卻舉揚了卑微貧困的人。
५२त्याने राज्य करणाऱ्यांना त्यांच्या राजासनांवरून ओढून काढले आहे आणि गरीबास उंचावले आहे.
53 祂曾使飢餓者飽饗美物,反使那富有者空手而去。
५३त्याने भूकेल्यास चांगल्या पदार्थांने तृप्त केले आहे. आणि धनवानास रिकाम्या हाताने परत पाठवले आहे.
54 祂曾回憶起自己的仁慈,扶助了祂的僕人以色列,
५४दयेपोटी त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.
55 正如祂向我們的祖先所說過的思許,施思於亞巴郎和他的子孫,直到永遠。」 (aiōn )
५५आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरण करावी. त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.” (aiōn )
56 瑪利亞同依撒作爾住了三個月左右,就回本家去了。
५६अलीशिबेबरोबर तीन महीने राहिल्यानंतर मरीया आपल्या घरी परत गेली.
५७अलीशिबेची प्रसूतीची वेळ आल्यावर, तिने एका मुलास जन्म दिला.
58 她的鄰居和親戚聽說上主向她大施仁慈,都和她一同歡樂。
५८प्रभूने तिच्यावर मोठी दया केली आहे, हे तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले आणि ते तिच्या आनंदात सहभागी झाले.
59 到了第八天,人們來給這孩子行割損禮,並願意照他父親的名字叫他匝加利亞。
५९मग असे झाले की, आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले असता, त्याच्या पित्याच्या नावाप्रमाणे ते बाळाचे नाव देखील जखऱ्या ठेवणार होते.
६०परंतु त्याच्या आईने उत्तर दिले, नाही त्याऐवजी त्याचे नाव योहान ठेवायचे आहे.
61 他們就向她說:「在妳親戚中沒有叫這個名子的。」
६१ते तिला म्हणाले, तुझ्या नातलगात या नावाचा कोणीच नाही.
६२नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना हातवारे करून विचारले, याचे नाव काय ठेवावे, अशी तुझी इच्छा आहे
63 他要了一塊小板,寫道:「若翰是他的名字。」群人都驚訝起來。
६३तेव्हा त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि, त्याचे नाव योहान आहे, असे लिहीले यावरुन त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले.
64 匝加利亞的口和舌頭立時開了,遂開口讚美天主。
६४त्याच क्षणी त्याचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व देवाला धन्यवाद देऊ लागला.
65 於是,所有的鄰居都滿懷怕情;這一切事就傳遍了全猶太山區,
६५तेव्हा सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीया प्रांताच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलू लागले.
66 凡聽見的人都將這事存在人中,說:「這孩子將成為什麼人物啊? 」因為上主的手與他同在。
६६जे कोणी हे ऐकले ते प्रत्येकजण मनात विचार करत होते, ते म्हणाले, हे मूल पुढे कोण होणार आहे? प्रभू त्याच्याबरोबर आहे असे त्यांच्या लक्षात आले.
६७त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला आणि त्यानेही भविष्यवाणी केली; तो म्हणाला,
68 「上主,以色列的天主應受讚美,因祂眷顧救贖了自己的民族,
६८“इस्राएलाचा देव प्रभू, ह्याची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आणि लोकांची खंडणी भरून सुटका केली.
69 並在自己的僕人達味家中,為我們興起了大能的救主,
६९त्याने आपला सेवक दावीद याच्या घराण्यातून आमच्यासाठी सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
70 正如祂藉歷代諸聖先知的口所說過的, (aiōn )
७०हे देवाने त्याच्या पवित्र संदेष्ट्यांद्वारे युगाच्या प्रारंभापासून सांगितले होते. (aiōn )
७१जे आमचे शत्रू आहेत व जे आमचा द्वेष करतात त्यांच्यापासून सुटका करण्याचे अभिवचन त्याने आम्हास दिले.
७२आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे व आपल्या पवित्र कराराची आठवण ठेवणार आहे,
७३हा करार एक शपथ होती जी त्याने आमचा पूर्वज अब्राहामाला वाहिली.
७४ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूच्या हातातून सोडवले जाऊन,
७५माझ्यासमोर पवित्रतेने व नीतिमत्त्वाने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.
76 至於你,小孩,你要稱為至高者的先知,因你要走在上主的在面前,為祂預備道路,
७६हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरीता तू त्यांच्यापुढे चालशील.
७७यासाठी की, त्याच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा.
७८देवाच्या दयेमुळे स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.
79 為光照那坐在黑暗和死影中的人,並引我們的腳步,走向和平的道路。」
७९तिच्याकडून जे अंधारात आहेत व मृत्युच्या छायेत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल.”
80 這小孩漸漸長大,心神堅強。他住在荒野中,直到他在以色列人前出現的日期。
८०मग तो मुलगा वाढत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांस प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.