< 利未記 5 >
1 若有人詛咒的誓言,能為所見所知的事作證而不肯聲明,就犯了罪,應負罪咎;
१जर एखाद्याने इतरास सांगण्यासारखी साक्ष ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहित असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;
2 或有人誤觸了什麼不潔之物,不論是不潔野獸的屍體,或是不潔家畜的屍體,或是不節昆蟲的屍體,而未發覺,以後發覺自己成為不潔的,因而有罪;
२किंवा कोणी अशुद्ध वस्तुला किंवा मरण पावलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला किंवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला जरी नकळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल.
3 或有人誤摸了人的不潔,任何能玷污人的不潔,而未發覺,以後發覺,就有了罪;
३त्याचप्रमाणे मनुष्याशी संबध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तुला नकळत स्पर्श केला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्यास नंतर कळाले तर तो दोषी ठरेल.
4 或有人出言輕易發了誓,或懷惡意,或懷善意,人無論在什麼事上輕易發了誓,當時未發覺,而以後發覺自己在某些事上有了罪;
४किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी आपल्या ओठांद्वारे अविचाराने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्यास ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल.
5 那麼幾時他發覺在上述某件事上有了罪,就該承認自己所犯的罪,
५तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी;
6 為賠補所犯的罪,應由羊群中取一隻母羊或綿羊,或山羊,獻給上主作贖罪祭,司祭應為他的罪行贖罪禮。
६आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून कोकरांची किंवा करडांची एक मादी कळपातुन आणावी; आणि मग याजकाने त्या मनुष्याच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.
7 如果他的財力不足辦一隻羊,為賠補所犯的罪,應獻給上主兩隻班鳩或兩隻雛鴿:一隻做為贖罪祭,一隻做為全燔祭。
७त्यास कोकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे.
8 將牠們交給司祭;司祭應先奉獻那作贖罪祭的一隻,掐住脖子扭斷牠的頭,卻不可分離;
८त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करु नये
9 然後取些贖罪祭犧牲的血,灑在祭壇壁上,其餘的血都擠在祭檀腳旁:這是贖罪祭。
९पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी निचरु द्यावे; हे पापार्पण होय.
10 至於第二隻:照全燔祭的儀式獻作全墦祭。司祭這樣為他所犯的罪行贖罪禮,他方可獲得罪赦。
१०मग याजकाने दुसऱ्या पक्ष्याचा विधीप्रमाणे होम करावा; ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; म्हणजे त्याची क्षमा होईल.
11 如果他的財力連兩隻班鳩或兩隻雛鴿也不能備辦,為賠補所犯的罪,應獻十分之一「厄法」細麵,作贖罪祭祭品,上面不可倒油,也不可放乳香,因為是贖罪祭。
११“जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले देखील देण्याची त्याची ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग सपिठ पापार्पण म्हणून आणावे; त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय.
12 將祭品交給司祭,司祭就取出一把麵,放在祭壇上與獻給上主的火祭一同焚燒,為獲得記念:這是贖罪祭。
१२त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याच्या स्मरणाचा भाग म्हणून परमेश्वराच्या चांगूलपणा करिता होम करावा; हे पापार्पण होय.
13 司祭這樣為他所犯的罪過行贖罪禮,他方可獲得罪赦。剩下的,如素祭一樣,應歸於司祭。」贖過祭祭儀。
१३अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचे उरलेले सपिठ याजकाचे होईल.”
१४नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
15 若有人有了過犯,不慎冒犯了上主的聖物,為賠補自己的過失,應從羊群中取一隻無瑕的公綿羊,依照你的估價,按聖所的幣制折合銀子,獻與上主作贖過祭。
१५“परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा दोष नसलेला मेंढा असावा, हे शेकेल पवित्र निवास मंडपातील चलनाप्रमाणे असावे; हे दोषार्पण होय.
16 為賠償他對聖物所犯的過失,應還另加五分之一,交給司祭。司祭應用贖過祭的公綿羊為他行贖罪禮,他方可獲得罪赦。
१६ज्या पवित्र वस्तूची विटंबना करून त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किंमतीचा पाचवा हिस्सा रक्कम त्याने याजकाला द्यावी; ह्याप्रकारे याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.
17 若有人犯了罪,不慎做了上主戒命所不許做的事,有了過犯,應負罪債,
१७परमेश्वराने निषिद्ध केलेली एखादी गोष्ट करून कोणाकडून चुकून किंवा नकळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.
18 他應照你的估價,從羊群中取一隻無瑕的公綿羊,交給司祭做贖過祭。司祭這樣為他不慎而誤犯的過失,替他行贖罪禮,他才可獲得罪赦:
१८त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा; हे दोषार्पण होय, तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा तो असावा अशाप्रकारे याजकाने त्या मनुष्याकडून नकळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.
१९हे दोषार्पण होय; परमेश्वरासमोर तो नक्कीच दोषी आहे.”