< 約書亞記 11 >

1 哈祚爾王雅一聽見這事,便派人去見瑪冬王,史默龍王,阿革沙夫王,
जेव्हा हासोराचा राजा याबीन याने हे ऐकले तेव्हा त्याने मादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना,
2 和住在北方山區,基乃勒特南方平原低地,和西方的多爾高原諸王;
आणि तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात. तळवटीत आणि पश्चिमेकडील दोरात असलेल्या राजांना,
3 又去見東西各地的客納罕人、阿摩黎人、希威人、培黎齊人,以及住在山區的耶步斯人,和赫爾孟山麓米茲帕地方的赫特人。
आणि पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रातांत राहणारे हिव्वी यांना बोलावणे पाठवले.
4 他們都帶領自己所有的軍隊和車輛。
तेव्हा त्यांचे सर्व सैन्य समुद्रकिनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते.
5 這些王子都合一起來,來到默龍水邊紮營,要同以色列人交戰。
या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढावयास मेरोम सरोवराजवळ तळ दिला.
6 上主對若蘇厄說:「在這些人面前,你不要害怕,因為明天這時,我必要使他們全在以色列人面前被殺;你要砍斷他們的馬蹄筋,火燒他們的車輛。」
मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांच्या उपस्थितीला भिऊ नको, कारण उद्या मी या वेळी त्या सर्वांना इस्राएलाच्या हाती देऊन मारणार आहे. त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.”
7 若蘇厄遂率領自己的軍民突至默龍水旁,向他們進攻。
तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम पाण्याजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला.
8 上主將他們交在以色列人手中,以色列人擊殺他們,往西直追到大漆冬和米斯勒佛特瑪殷,往東直追到米茲帕山谷,將他們殺得沒有剩下一個。
परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पा खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.
9 若蘇厄便照上主指示他的,對待了他們,砍斷了他們的馬碲筋,火燒了他們的車輛。
परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले.
10 若蘇厄班師回來時,奪取了哈祚爾,用刀斬了哈祚爾王。──原來哈祚爾以前是這些王國的都城。
१०त्या वेळी यहोशवाने माघारी येऊन हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले. पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते.
11 又將城內的一切生靈,用刀殺死,完全予以毀滅,沒有留下一個生靈,以後放火燒了哈祚爾城。
११तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; आणि कोणताही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही; नंतर त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले.
12 若蘇厄奪取了那些王子的一切城邑,生摛那些王子,用刀將他們殺死,將城池完全予以毀滅,全照上主的僕人梅瑟所吩咐的。
१२परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजासह हस्तगत करून त्यांना तलवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला.
13 至於那些處於土丘上的城市,除哈祚爾外,以色列人都沒有焚毀:若蘇厄只燒了哈祚爾。
१३टेकड्यांवर वसलेली कोणतीही नगरे इस्राएलाने जाळली नाहीत; हासोर मात्र यहोशवाने जाळले.
14 那些城中所有的財物和牲畜,以色列人都搶了來,歸為己有:所有的人都用刀殺死,完全予以毀滅,沒有留下一個生靈。
१४या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तलवार चालवून प्रत्येक मनुष्य मारून टाकला, एकही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही.
15 上主怎樣吩咐衪的僕人梅瑟,梅瑟也怎樣吩咐了若蘇厄,若蘇厄也就怎樣辦了。凡上主吩咐梅瑟的事,若蘇厄沒有不照辦的。
१५परमेश्वराने आपला सेवक मोशे याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली; आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले. यहोशवाने मोशेला आज्ञा दिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.
16 這樣,若蘇厄佔領了那整個地區:包括山地,整個南方,哥笙全境,平原,阿辣巴原野,以色列山地和附近平原,
१६अशा प्रकारे यहोशवाने इस्राएलाचा डोंगरी मुलूख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, असा सर्व देश घेतला.
17 由上色依爾去的哈拉克山起,一直到赫爾孟山麓,黎巴嫩山谷間的巴爾加得:各城的王子都被生摛,都被殺死。
१७तसेच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोऱ्यातील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला; त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले.
18 若蘇厄同這些王子交戰,時日頗為長久,
१८त्या सर्व राजाशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.
19 因為除住在基貝紅的希威人外,沒有一座城願與以色列子民媾和,都是以色列人用武力攻取的。
१९गिबोनात राहणाऱ्या हिव्व्याखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी समेट केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली,
20 原來這是上主的意思,叫他們心硬,來與以色列人交戰,好使他們遭受無情的毀滅,澈底的破壞,正如上主對梅瑟所吩咐的
२०कारण परमेश्वराने त्यांची मने कठीण केली होती, अशासाठी की त्यांनी इस्राएलाविरुद्ध युद्ध करण्यासाठी पुढे यावे आणि त्याने त्यांचा समूळ नाश करावा. परमेश्वराने मोशेला अज्ञापिल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करण्याच्या निर्णयापर्यंत, त्याने त्यांच्या दया-याचनेची गय केली नाही.
21 以後若蘇厄出兵,消滅了赫貝龍、德彼爾、阿納布山地、猶大山地和以色列山地所有的阿納克人,毀滅了他們和他們所有的城市。
२१तेव्हा यहोशवाने डोंगराळ प्रदेशांत जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब यहूदा व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या अनाकी लोकांचा नाश केला. त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.
22 這樣以色列子民境內,沒有剩下一個阿納克人,只在迦薩、加特和阿布多得還有。
२२इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद यांतले थोडे उरले.
23 若蘇厄佔領了那整個地區,全如上主對梅瑟所說的;若蘇厄遂將這地區按照以色列支派分給他們作產業。以後國內昇平,再無戰事。
२३परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला. यहोशवाने तो इस्राएल लोकांस वंशांच्या नियमाप्रमाणे वाटून वतन करून दिला; तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.

< 約書亞記 11 >