< 以賽亞書 21 >

1 有關瀚海的神諭:猶如風暴由南方掃來;同樣,仇敵將由沙漠,由可怕之地而來。
समुद्राजवळच्या राणाविषयी ही देववाणी. जसा दक्षिणेचा वादळवारा सर्व काही खरडून नेतो त्याप्रकारे तो रानांतून, भयंकर देशातून येत आहे.
2 一悽慘的神視顯示給我:搶奪的盡量搶奪,破壞的盡量破壞。厄藍,上前!瑪待,圍攻!我要結束所有的嘆息!
दु: खदायक असा दृष्टांत मला देण्यात आला आहे, विश्वासघातकी मनुष्य विश्वासघाताने करार करतो, आणि नाश करणारा नाश करतो. हे एलामा वर जा आणि हल्ला कर, हे माद्या वेढा घाल, मी तिचे सर्व उसासे थांबवीन.
3 為此我的兩腰滿是酸痛,侵襲我的劇痛無異產婦的痛苦;我惶亂得不能再聽,我昏迷得不能再看。
यास्तव माझ्या कंबरेत वेदना भरल्या आहेत, प्रसुती वेदनेप्रमाणे तडफडणाऱ्या स्त्री प्रमाणे त्या वेदनांनी मला पकडले आहे. जे मी ऐकले त्यामुळे मी खाली वाकलो आहे, जे मी पाहिले त्यामुळे मी विचलीत झालो.
4 我的心神錯亂了,恐怖驟然襲擊了我;我所渴望的黃昏,為我反成了恐怖。
माझे हृदय धडधडते, थरकाप माझ्यावर हावी होतो. रात्र मला किती सुखावह वाटे, ती आता मला भेदरून टाकणारी झाली असून.
5 盛宴已擺,華毯已舖,人們正在吃喝之際:「將帥們!起來!用油擦盾!」
त्यांनी मेज तयार केला, त्यांनी कापड पसरवले आणि खाल्ले व प्याले, उठा, अधिकाऱ्यांनो, आपल्या ढालींना तेल लावा.
6 因為吾主對我這樣說:「去!派置一個警衛,叫他報告他所見的!
जा, त्या ठिकाणी एक पहारेकरी ठेव असे प्रभूने मला सांगितले, तो जे काही पाहणार त्याची वार्ता सांगावी.
7 當他見到騎兵隊、一對一對的馬兵、驢隊和駱駝隊時,他要注意,要多多注意!」
जेव्हा तो रथ, घोडेस्वार, गाढवावर बसलेले, उंटावर बसलेले पाहील, तेव्हा त्याने सतर्क व सावधान असायला हवे.
8 守望者喊叫:「吾主!我整日站在瞭望台上,長夜鵠立在我的守望所。
पहारेकरी सिंहनाद करून म्हणाला, हे प्रभू, पाहाऱ्याच्या बुरूजावर मी रोज दिवसभर उभा असतो आणि पूर्ण रात्र मी आपल्या चौकीवर उभा राहतो.
9 看哪!來了一隊人馬,一對一對的騎兵!」有一個喊叫說:「陷落了!巴比倫陷落了!她所有的神像也都摔碎在地!」
आणि जोडी जोडीने चालणाऱ्या घोडस्वारांचे एक सैन्य येत आहे. त्याने म्हटले, बाबेल पडली, पडली, आणि तिच्या सर्व कोरीव देव मूर्तींचा पूर्ण पणे नाश होऊन ते जमिनीस मिळाल्या आहेत.
10 我那被碾軋的百姓,我那禾場上的子民!凡是我由萬軍的上主,以色列的天主所聽到的,我都告訴了你們。
१०हे माझ्या मळणी केलेल्या आणि खळ्यांतील धान्या! माझ्या खळ्यातील लेकरा! सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, ह्याकडून जे काही मी ऐकले, ते तुम्हास घोषीत केले.
11 有關厄東的神諭:從色依爾有人向我喊叫說:「警衛!夜已何時了﹖夜已何時了﹖」
११दूमाविषयीचा घोषणा, सेईर येथून मला कोणी मला हाक मारतो, पहारेकऱ्या, रात्री काय राहिल? पहारेकऱ्या, रात्री काय राहिल?
12 警衛答說:「黎明已至,然而仍是黑夜;如果你們仍要詢問,詢問罷!再來一次!」
१२पाहारेकरी म्हणाला, सकाळ येते व रात्रही येते, जर तुम्ही विचाराल तर विचारा आणि परत या.
13 有關荒野的神諭:你們在森林中,在荒野裏過宿罷!德丹的商旅,
१३अरेबिया विषयी घोषणा, ददानीच्या काफिल्यालो, अरबस्तानच्या रानांत तुम्ही रात्र घालवणार.
14 請攜水出來迎接口渴的人!特瑪地的居民,請備糧接待逃難的人!
१४अहो तेमाच्या राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांना पाणी आणा, पळून गेलेल्यांना भाकरी घेऊन भेटा.
15 因為他們出逃,是由於面臨刀劍,面臨出鞘的刀劍,面臨已張的弓弩,面臨激烈的戰爭。
१५कारण ते तलवारी, वाकवलेले धनुष्य, काढलेल्या तलवारी आणि युद्धाच्या दडपणापासून पळाले आहेत.
16 上主曾這樣對我說:「照僱工的年限計,還有三年,刻達爾所有的榮耀都要完結;
१६कारण परमेश्वराने मला सांगितले, एका वर्षाच्या आत, जसा मोलकरी एका वर्षासाठी नियूक्त केला जातो, त्याच प्रकारे केदारचे वैभव तुम्ही संपलेले पाहाल.
17 刻達爾子民的英勇弓手人數,剩下的很少。」因為上主以色列的天主,早就這樣說了。
१७फक्त थोडेच धनुर्धारी, वीर योद्धा केदार मध्ये उरतील, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर हे बोलला आहे.

< 以賽亞書 21 >