< 以賽亞書 13 >
१आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा.
2 你們在禿山上樹起旗幟,向他們高呼揮手,叫他們走進王侯的御門!
२उघडया डोंगरावर इशारा देणारा ध्वज उभारा, त्यांना मोठयाने हाक मारा, त्यांनी सरदारांच्या द्वारात यावे म्हणून त्यांना हाताने खुणवा.
3 我已向我聖潔的人下令,並為了我的憤怒,召集了我的戰士,我那驕矜自喜的常勝軍。
३मी आपल्या पवित्र केलेल्यांस आज्ञा केली आहे, होय, माझ्या क्रोधास्तव मी माझ्या पराक्रमी लोकांस, तसेच गर्वाने उल्लासीत होणाऱ्या माझ्या लोकांस बोलाविले आहे.
4 聽!山上有喧囂聲,好像有無數的人群。聽!列國的嘈雜聲,萬民正在聚集;萬軍的上主正在檢閱赴敵的部隊:
४अनेक लोकांच्या समुदायाच्या गोंगाटाप्रमाणे, अनेक राष्ट्रांच्या राजाच्या एकत्र जमल्याप्रमाणे डोंगरात गलबला होत आहे. सेनाधीश परमेश्वर लढाईसाठी फौज तयार करत आहे.
5 他們都來自遠方,來自天邊。上主和他盛怒的工具,要來毀滅整個大地。
५ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत. परमेश्वर त्याच्या न्यायाच्या शस्त्रांसहीत संपूर्ण देशाचा नाश करावयास येत आहे.
6 號啕罷!因為上主的日子近了,它來有如全能者實行毀滅;
६आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आहे; सर्वसमर्थाकडून विनाशासहीत तो येत आहे.
७त्यामुळे सर्व हात गळाले आहेत, आणि प्रत्येक हृदय विरघळले आहे;
8 人人都驚慌失措,劇疼和痛苦侵襲他們,痙攣得有如臨產的婦女;他們彼此驚愕相視,面容有如火燄。
८ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील.
9 看哪!上主的日子來到,必有殘忍、雷霆和烈怒,為使大地變為荒涼,為殲滅地上的罪人。
९पाहा, क्रोध आणि संतापाने भरून वाहणारा रोष, असा परमेश्वराचा दिवस येत आहे अशासाठी की देश उजाड आणि तिच्यातून पाप्यांचा नाश करायला येत आहे.
10 那時,天上的眾星與群宿不再發光,太陽一升起即變為昏黑,月亮也不再放光明。
१०आकाशाचे तारे आणि नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत. अरुणोदयापासूनच सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाशणार नाही.
11 我要懲罰世界,是為了它的罪惡;懲罰惡人,是為了他們的惡行;要抑制自負者的驕橫,要屈服暴虐者的傲慢;
११मी जगाला त्यांच्या वाईटासाठी आणि दुष्टांला त्यांच्या अपराधासाठी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरवील.
12 我要使人比提煉的黃金更少見,使人比敖非爾純金更希罕。
१२मी पुरुषांना उत्कृष्ट सोन्यापेक्षा अधिक दुर्मिळ करील आणि मानवजात ओफीरच्या शुध्द सोन्याहून शोधण्यास कठिण करील.
13 為此,由於萬軍上主的憤怒,在他暴發怒火之日,天要震撼,地要震動,離其本位。
१३म्हणून मी आकाश हादरून सोडील, व पृथ्वी तिच्या स्थानावरून हालविली जाईल, सेनाधीश परमेश्वराचा संताप आणि त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस येईल.
14 那時,人們將如被追逐的羚羊,又如無人率領的羊群,各自轉向自己的民族,各自逃回自己的故鄉。
१४शिकारी झालेल्या हरिणाप्रमाणे किंवा मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे, प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या लोकाकडे वळेल आणि आपल्या देशाकडे पळून जाईल.
15 凡被捕獲的,都要被刺殺;凡被擒住的,都要喪身刀下。
१५जो कोणी सापडेल त्यास मारण्यात येईल आणि जो कोणी पकडला जाईल त्यास तलवारीने मारण्यात येईल.
16 他們的嬰兒將在他們眼前被人摔死,他們的房屋將被洗劫,他們的婦女要受姦污。
१६त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची बालके आपटून तुकडे तुकडे करण्यात येतील. त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील.
17 我要鼓勵瑪待人來攻擊他們,這些人既不重視白銀,也必貪愛黃金。
१७पाहा, मी त्यांच्याविरुद्ध माद्य लोकांस हल्ला करण्यासाठी उठवीन, ते रुप्याबद्दल पर्वा करणार नाहीत किंवा ते सोन्याने आनंदीत होणार नाही.
18 他們的弓箭要刺死青年,對腹中的胎兒毫不憐恤,對於嬰兒,他們的眼睛也毫不憐視。
१८त्यांचे बाण तरूणांना भेदून जातील. ते बालकांवर दया करणार नाहीत आणि मुलांना सोडणार नाहीत.
19 巴比倫--萬國的光輝,加色丁的驕矜榮耀,必要被上主傾覆,如同索多瑪和哈摩辣一樣,
१९आणि राज्याचे अधिक कौतुक, खास्द्यांच्या वैभवाचा अभिमान अशी बाबेल, तिला सदोम आणि गमोराप्रमाणे देवाकडून उलथून टाकण्यात येईल.
20 永遠再沒有居民,世世代代無人居住;阿剌伯人不在那裏設帳,牧人也不在那裏立欄;
२०ती कधी वसविली जाणार नाही आणि पिढ्यानपिढ्यापासून तिच्यामध्ये कोणी राहणार नाहीत. अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत किंवा मेंढपाळ आपले कळप तेथे विसाव्यास नेणार नाहीत.
21 臥在那裏的只有野獸,他們的房屋滿了鴟鴞;駝鳥在那裏棲息,魍魎在那裏舞蹈;
२१परंतु रानातील जंगली पशू तेथे पडतील. त्यांची घरे घुबडांनी भरतील; आणि शहामृग व रानबोकड तेथे उड्या मारतील.
22 豺狼在宮殿裏嗥叫,野狗在御苑內呼應;她的時期已來近了,她的日子不會久延。
२२तरस त्यांच्या किल्ल्यात आणि कोल्हे त्याच्या सुंदर महालात ओरडतील. तिची वेळ जवळ आली आहे आणि तिच्या दिवसास विलंब लागणार नाही.