< 創世記 46 >
1 以色列遂帶著他所有的一切出發,來到了貝爾舍巴,向他父親依撒格的天主獻了祭,
१इस्राएलाने, आपले जे काही होते त्याबरोबर प्रवासास सुरुवात केली आणि तो बैर-शेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला अर्पणे वाहिली.
2 當夜天主在神視中對以色列說:「雅各伯、雅各伯!」他答說:「我在這裏。」
२रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?”
3 天主說:「我是天主,你父親的天主。你不要害怕下到埃及去,因為我要使你在那裏成為一大民族。
३तो म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको, कारण मी तुझ्यापासून तेथे एक मोठे राष्ट्र तयार करीन.
4 我與你一同下到埃及,也必使你再上來;若瑟要親手合上你的眼。」
४मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.”
5 雅各伯遂由貝爾舍巴起程。以色列的兒子們扶自己的父親雅各伯和自己的孩子及妻子,上了法郎派來接他的車,
५मग याकोब बैर-शेबाहून उठला. इस्राएलाच्या मुलांनी आपला बाप, आपल्या स्त्रिया व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाड्यांतून मिसरला आणले.
6 帶了家畜和在客納罕地積聚的財物,一同向埃及進發:這樣雅各伯和他所有的孩子,
६त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले; याप्रमाणे याकोब व त्याची संतती मिसर देशास आली.
7 即他的兒子、孫子、女兒、孫女,他的一切孩子,都一同來到了埃及。
७त्याने आपल्यासोबत आपली मुले व नातू, आपल्या मुली व नाती या सर्व संतानांना मिसरात नेले.
8 以下是來到埃及的以色列人,雅各伯和他子孫的名單:雅各伯的長子勒烏本;
८इस्राएलाचे जे पुत्र त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी: याकोबाचा प्रथम जन्मलेला रऊबेन;
९रऊबेनाचे पुत्र हनोख आणि पल्लू आणि हेस्रोन आणि कर्मी;
10 西默盎的兒子:耶慕耳、雅明、敖哈得、雅津、祚哈爾和客納罕女子的兒子沙烏耳;
१०शिमोनाचे पुत्र यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल;
११लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी;
12 猶大的兒子:厄爾、敖難、舍拉、培勒茲和則辣黑:厄爾和敖難已死在客納罕地。培勒茲的兒子:赫茲龍和哈慕耳;
१२यहूदाचे पुत्र एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह, (परंतु एर व ओनान हे कनान देशात मरण पावले. पेरेसाचे पुत्र हेस्रोन व हामूल),
13 依撒加爾的兒子:托拉、普瓦、雅叔布和史默龍;
१३इस्साखाराचे पुत्र तोला, पुवा, लोब व शिम्रोन;
१४जबुलूनाचे पुत्र सेरेद, एलोन व याहलेल
15 以上是肋阿在帕丹阿蘭給雅各伯生的子孫;還有他的女兒狄納:男女子孫共計三十三人。
१५(याकोबाला लेआपासून पदन-अरामात झालेली सहा मुले व दीना ही मुलगी; त्याच्या कुटुंबात मुले आणि मुली मिळून तेहतीस जण होते),
16 加得的兒子:漆斐雍、哈基、叔尼、厄茲朋、厄黎、阿洛狄和阿勒里;
१६गादाचे पुत्र सिफयोन आणि हग्गी, शूनी आणि एसबोन, एरी, अरोदी, आणि अरेली;
17 阿協爾的兒子:依默納、依市瓦、依市偉、貝黎雅和他們的姊妹色辣黑;貝黎雅的兒子赫貝爾和瑪耳基耳:
१७आशेराचे पुत्र इम्ना आणि इश्वा, इश्वी, आणि बरीया, आणि त्याची बहीण सेराह; आणि बरीयाचे पुत्र हेबर व मलकीएल
18 以上是拉班給他的女兒肋阿的婢女齊耳帕,給雅各伯生的子孫,共計十六人。
१८(जिल्पा जी लाबानने आपली मुलगी लेआ हिला दिली होती, तिच्यापासून झालेले हे सगळे याकोबाचे पुत्र होते. ती एकंदर सोळा माणसे होती),
१९याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र योसेफ व बन्यामीन हे होते;
20 翁城的司祭頗提斐辣的女兒阿斯納特在埃及地給若瑟生了默納協和厄弗辣因;
२०(योसेफास मिसर देशातील ओनचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे पुत्र झाले),
21 本雅明的兒子:貝拉、貝革爾、阿市貝耳、革辣、納阿曼、厄希、洛士、慕平、胡平和阿爾得:
२१बन्यामिनाचे पुत्र बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.
२२(याकोबापासून राहेलीस झालेली ही मुले. सर्व मिळून ते सर्व चौदा जण होते),
२३हुशीम हा दान याचा मुलगा होता;
24 納斐塔里的兒子:雅赫則耳,古尼,耶則爾和史冷:
२४नफतालीचे पुत्र यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते.
25 以上是拉班給他的女兒辣黑耳的婢女彼耳哈,給雅各伯生的子孫,共計七人。
२५(लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हाचे याकोबापासून झालेले हे पुत्र. हे सर्व मिळून सात जण होते).
26 由雅各伯所生而同來到埃及的人數,除雅各伯的兒媳不計外,共計六十六人。
२६याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या स्त्रिया सोडून सहासष्ट जण होती.
27 此外還有若瑟在埃及所生的兒子二人:雅各伯家來到埃及的全體人數,共計七十人。
२७योसेफास मिसर देशात झालेले दोन पुत्र मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते.
28 雅各伯派猶大先去見若瑟,同他約定在哥笙相見。他們來到了哥笙地方,
२८याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली.
29 若瑟套車上哥笙去迎接他父親以色列;一見了他,就撲在他頸上,抱住他的頸,哭了很久。
२९योसेफास आपला रथ तयार करून आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्यास सामोरा गेला. योसेफाने आपल्या पित्यास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यात गळा घालून तो बराच वेळ रडला.
30 以色列對若瑟說:「我見了你的面,見你還活著,現在我可以死了! 」
३०मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मला शांतीने मरण येवो, मी तुझे तोंड पाहिले आहे, आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.”
31 若瑟對他的兄弟們和父親的家屬說:「我要上去呈報法郎說:我在客納罕地的兄弟們和我父親的家屬,都來到我這裏了。
३१मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या वडिलाच्या घरच्या सर्वांना म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की, ‘माझे भाऊ व माझ्या वडिलाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत.
32 這些人都是放羊飼畜的人;他們的羊群牛群和他們所有的一切都帶來了。
३२माझ्या वडिलाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत, ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरेढोरे पाळत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’
३३जेव्हा फारो राजा तुम्हास बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’
34 你們要答說:你的僕人們自幼直到現在,都是牧養牲畜的人,我們和我們的祖先都是如此。這樣你們才能住在哥笙地方,因為埃及人厭惡一切牧羊的人。」
३४तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हास गोशेन प्रांतात राहू देईल. मिसरी लोकांस मेंढपाळ आवडत नाहीत.”