< 創世記 11 >

1 當時全世界只有一種語言和一樣的話。
आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते.
2 當人們由東方遷移的時候,在史納爾地方找到了一塊平原,就在那裏住下了。
ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली.
3 他們彼此說:「來,我們做磚,用火燒透。」他們遂拿磚當石,拿瀝青代灰泥。
ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते.
4 然後彼此說:「來,讓我們建造一城一塔,塔頂摩天,好給我們作記念,免得我們在全地面上分散了! 」
मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.”
5 上主遂下來,要看看世人所造的城和塔。
आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरूज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला.
6 上主說:「看,他們都是一個民族,都說一樣的語言。他們如今就開始做這事;以後他們所想做的,就沒有不成功的了。
परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही.
7 來,我們下去,混亂他們的語言,使他們彼此語言不通。」
चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”
8 於是上主將他們分散到全地面,他們遂停止建造那城。
मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले.
9 為此人稱那地為「巴貝耳,」因為上主在那裏混亂了全地的語言,且從那裏將他們分散到全地面。
त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.
10 以下是閃的後裔:洪水後兩年,閃正一百歲,生了阿帕革沙得;
१०ही शेमाची वंशावळ: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा पिता झाला.
11 生阿帕革沙得後,閃還活了五百年,也生了其他的兒女。
११अर्पक्षदाला जन्म दिल्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, तो आणखी मुले व मुलींचा पिता झाला.
12 阿帕革沙得三十五歲時,生了舍拉;
१२अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने शेलहाला जन्म दिला.
13 生舍拉後,阿帕革沙得還活了四百零三年,也生了其他的兒女。
१३शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
14 舍拉三十歲時,生了厄貝爾;
१४जेव्हा शेलह तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबरला जन्म दिला;
15 生厄貝爾後,舍拉還活了四百零三年,也生了其他的兒女。
१५एबरला जन्म दिल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
16 厄貝爾三十四歲時生了培肋格;
१६एबर चौतीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला.
17 生培肋格後,厄貝爾還活了四百三十年,也生了其他的兒女。
१७पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
18 培肋格三十歲時,生了勒伍;
१८पेलेग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने रऊ याला जन्म दिला.
19 生勒伍後,培肋格還活了二百零九年,也生了其他的兒女。
१९रऊ याला जन्म दिल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
20 勒伍三十二歲時,生了色魯格;
२०रऊ बत्तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने सरुगाला जन्म दिला.
21 生色魯格後,勒伍還活了二百零七年,也生了其他的兒女。
२१सरुगाला जन्म दिल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
22 色魯格三十歲時,生了納曷爾;
२२सरुग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने नाहोराला जन्म दिला.
23 生納曷爾後,色魯格還活了二百年,也生了其他的兒女。
२३नाहोराला जन्म दिल्यावर सरुग दोनशे वर्षे जगला आणि त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
24 納曷爾活到二十九歲時,生特辣黑;
२४नाहोर एकोणतीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला.
25 生特辣黑後,納曷爾還活了一百一十九年,也生了其他的兒女。
२५तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला.
26 特辣黑七十歲時,生了亞巴郎、納曷爾和哈郎。
२६तेरह सत्तर वर्षांचा झाला, तेव्हा त्याने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला.
27 以下是特辣黑的後裔:特辣黑生了亞巴郎、納曷爾和哈郎;哈郎生了羅特。
२७तेरहाची वंशावळ ही: तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला.
28 哈郎在他的出生地,加色丁人的烏爾,死在他父親特辣黑面前。
२८हारान, आपला पिता तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला.
29 亞巴郎和納曷爾都娶了妻子:亞巴郎的妻子名叫撒辣依;納曷爾的妻子名叫米耳加,她是哈郎的女兒;哈郎是米耳加和依色加的父親。
२९अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय आणि नाहोरच्या पत्नीचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा पिता होता.
30 撒辣依不生育,沒有子女。
३०साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते.
31 特辣黑帶了自己的兒子亞巴郎和孫子,即哈郎的兒子羅特,並兒媳,即亞巴郎的妻子撒辣依,一同由加色丁的烏爾出發,往客納罕地去;他們到了哈蘭,就在那裏住下了。
३१मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, हारानचा मुलगा लोट, आणि आपली सून म्हणजे अब्रामाची पत्नी साराय यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला आणि प्रवास करीत ते हारान प्रदेशापर्यंत येऊन तेथे राहिले.
32 特辣黑死於哈蘭,享壽二百零五歲。
३२तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.

< 創世記 11 >