< 以西結書 48 >
1 支派的姓名如下:由極北瑞起,沿赫特隆路至哈瑪特口,再至哈匝爾厄南,;──北有大馬士革邊界,有哈馬特邊界──每支派由東界到西界各有一份:這是丹的一份。
१ही वंशाची नावे आहेत. दानाचा वंश देशाचा एक विभाग स्विकारील. त्याची सीमा उत्तर सीमेपासून हेथलोनाकडच्या वाटेजवळ, हामाथाच्या प्रवेशापर्यंत दिमिष्काच्या सीमेवरील हसर-एनान, उत्तरेकडे हमाथाजवळ. दानाची सीमा त्याच्या पूर्वेकडून सर्व मार्गाने महासमुद्राकडे जाईल.
२दानाच्या दक्षिण सीमेपाशी पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत एक विभाग तो आशेराचा.
3 靠近阿協爾的邊界,由東界到西界,是納斐塔里的邊界,
३आशेराबरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग नफतालीचा, त्याच्या पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत पसरलेला.
4 靠近納納斐塔里的邊界,由東界到西界,是默納協的邊界,
४नफतालीबरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग मनश्शेचा, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंतचा विस्तारीत प्रदेश.
5 靠近默納協的邊界,由東界到西界是厄法辣因的一份。
५मनश्शेबरोबर त्याच्या दक्षिण सीमेचा एक विभाग पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत तो एफ्राईमाचा.
6 靠近厄弗辣因的邊界,由東界到西界,是勒烏本的一份。
६एफ्राईमाच्या दक्षिण सीमेच्या पूर्वबाजूपासून ते पश्चिमबाजूपर्यंत एक विभाग रऊबेनाचा.
७रऊबेनाबरोबरच्या बाजूच्या सीमेच्या पूर्व ते पश्चिम एक विभाग तो यहूदाचा.
8 靠近猶大的邊界,由東界到西界,是你們應保留的獻地,寬二萬五千肘,長由東界到西界,如每支派分得的一份一樣,中間是聖所。
८यहूदाच्या सीमेस लागून असलेला जो पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत विस्तारलेला प्रदेश पंचवीस हजार हात रुंद व इतर वंशांना मिळालेल्या विभागाइतका पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पाल आणि त्याच्या मध्यभागी पवित्रस्थान होईल.
9 你們為上主保留的獻地,長二萬五千肘,寬一萬肘。
९तुम्ही जो प्रदेश परमेश्वरास अर्पण कराल तो लांबीला पंचवीस हजार हात व रुंदीला वीस हजार हात असावा.
10 這塊所獻的聖地應歸司祭,北面長二萬五千肘,西面寬一肘,東面寬一萬肘,南面寬二五千肘,衵間是上主的聖所。
१०पवित्र प्रदेशाचा विभाग हा नेमून दिला होता, हा समर्पित प्रदेश याजकांचा; ही जमीन उत्तरेला पंचवीस हजार हात लांबीची, पूर्वेला व पश्चिमेला दहा-दहा हजार हात रुंदीची असेल. तिची दक्षिणेला लांबी पंचवीस हजार हात असावी. त्याच्या बरोबर मध्यावर परमेश्वराचे मंदिर असेल.
11 這地應歸疲祝聖作上主司祭的匝多克的子孫,他們謹慎遵行了我的禮規,當以色列子民墮落時,他們沒有像肋未人一樣落時下去。
११सादोकाच्या वंशजातले जे याजक पवित्र झालेले आहेत ज्या कोणी माझी सेवा निष्ठेने केली, त्यांच्यासाठी तो होईल. जेव्हा इस्राएली लोक बहकून गेली तेव्हा जसे लेवी बहकले तसे ते बहकले नाहीत. इस्राएलाच्या लोकांबरोबर बहकले नाहीत.
12 屬司祭之地是獻地中至聖之地,靠近近肋未人的邊界。
१२त्यास देशातील अर्पिलेल्या प्रदेशातून हा एक प्रदेश त्यांना परमपवित्र होईल; तो लेवींच्या सीमेपाशी असेल.
13 屬肋未人的地與司祭的邊界平行,長二萬五千肘,寬一萬肘,總計長二萬五千肘,寬二萬肘。
१३याजकांच्या सीमेपाशी लेव्यांना पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद प्रदेश मिळावा. त्यांना पूर्ण लांबी रुंदीची, म्हणजे पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जमीन असावी.
14 其中的地不可變賣,不可交換也不可轉讓,這是地中最好的一份,因為是祝聖於上主的。
१४त्यांनी या जमिनीची विक्री वा अदलाबदली करु नये. इस्राएल देशातील कोणतेही प्रथमफळे वेगळे करून इतर प्रदेशाकडे जाऊ देऊ नये. कारण तो भाग परमेश्वरास पवित्र आहे.
15 由二萬五千肘的面積所餘的五千肘應列為俗地,作為居住的城市和郊區,城市應在中心。
१५उरलेली जमीन, पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पांच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल. नगर ह्याच्या मध्यावर असावे.
16 城市的面積如下:北面四千五百肘,北面四千五百肘,南面四千五百肘,東面四千五百肘。
१६नगरीची मापे पुढीलप्रमाणे असतील, उत्तर बाजू चार हजार पाचशे हात, दक्षिण बाजू चार हजार पाचशे हात पूर्व व पश्चिम बाजूही तेवढ्याच म्हणजे चार हजार पाचशे हात.
17 城市外的郊區是:北面二百五十肘,南面二百五十肘,東面二百五十肘,西面二百五十肘。
१७नगरासाठीचे कुरण उत्तरेकडे अडीचशे हात, दक्षिणेकडे अडीचशे हात, व पूर्वेकडे अडीचशे हात व पश्चिमेकडे अडीचशे हात असावे.
18 至於那與所獻聖地平行的所餘之地,東面長一萬肘,西面長一萬肘,甚中出產應作為城內居民的食糧。
१८आणि पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर जो उरलेला प्रदेश तो लांबीने पूर्वेकडे दहा हजार हात. व पश्चिमेला दहा हजार हात होईल; आणि तो पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर होईल; त्याचे उत्पन्न नगरातील कामगारांसाठी अन्नासाठी होईल.
१९सर्व इस्राएलाच्या वंशांतून जे कोणी नगरात काम करतील त्या लोकांनी त्या जागेची मशागत करावी.
20 整個獻地為二萬五千肘長,二萬五千肘寬,為一方形,是你們應保留的所獻聖地和城市地段。
२०सर्व अर्पिलेला प्रदेश पंचवीस हजार हात लांब आणि पंचवीस हजार रुंद होईल; ह्याप्रकारे तुम्ही प्रदेशाचे पवित्र अर्पण एकत्रितपणे नगराच्या विभागासाठी द्यावे.
21 在所獻聖地和城市地段的兩所餘之地,二萬五千肘由東至東面的邊界,由西至西面的邊界,與各支派所分之地平行,都歸元首,所獻聖地與聖所在中間。
२१“तो अर्पिलेला भाग व नगराचे विभाग यांच्या एका बाजूला व दुसऱ्या बाजूला जो उरलेला भाग आहे तो अधिपतीचा असावा. अर्पिलेल्या प्रदेशाच्या पंचवीस हजार हातांच्यासमोर पूर्व सीमेकडे आणि पश्चिमेकडे पंचवीस हजार हातांच्यासमोर पश्चिम सीमेकडे, वंशाच्या विभागासमोर जो प्रदेश आहे तो अधिपतीसाठी असावा आणि पवित्र अर्पिलेला प्रदेश व मंदिराचे पवित्रस्थान त्याच्या मध्यभागी असावे.
22 除在屬元首的地中間,有肋未人的產業和城市地段外,凡在猶大邊界和本雅明邊界飲間的土地,皆歸元首所有。
२२ह्यातील काही हिस्सा याजकाचा, काही लेवींचा व काही मंदिराकरिता आहे. मंदिर या भागाच्या मध्यभागी आहे. शिल्लक राहिलेली जमीन देशाच्या राजाच्या मालकीची आहे. राजाला, बन्यामीनची जमीन व यहूदाची जमीन यांच्यामधील जमीन मिळेल.
23 至於其餘的支派:由東界到西界,是本雅明的一份。
२३आणि बाकीच्या वंशास, पूर्व बाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत, त्यातला एक बन्यामीनाचा भाग.
24 靠近本雅明的邊界由東界至西界是西默盎的一份。
२४बन्यामिनाच्या सीमेपाशी त्याच्या पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत तो शिमोनाचा विभाग.
25 靠近西默盎的一邊界,由東界至西界是依撒加爾的一份。
२५शिमोनाच्या सीमेपाशी पूर्व बाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत तो इस्साखाराचा विभाग.
26 靠近依撒加爾的邊界,由東界至西界是則布隆的一份。
२६इस्साखाराच्या सीमेपाशी पूर्वबाजूस पश्चिमबाजूपर्यंत तो जबुलूनाचा विभाग.
27 靠近則布隆的邊界,由東界至西界,是加得的一份。
२७जबुलूनाच्या सीमेपाशी पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत, गादाचा, एक विभाग.
28 靠近加得的邊界,是南方向陽的邊界,由塔瑪爾到默黎巴卡德士水沿河直到大海。
२८गादाच्या सीमेपाशी दक्षिण बाजूस, दक्षिणेकडे, तामारापासून मरीबोथ कादेशाच्या जलापर्यंत, नदीकडे मोठ्या समुद्रापर्यंत सीमा होईल.
29 這是你們各支派抽籤平分的土地,是你們應得的產業──吾主上主的斷語。
२९ज्या देशाची वाटणी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्राएलाच्या वंशास वतनासाठी विभागणी कराल तो हाच आहे. त्यांचे विभाग हेच आहेत.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
३०ही नगराची बाहेर निघण्याची ठिकाणे आहेत. उत्तर बाजूस मापाने चार हजार पाचशे हात लांब असेल.
31 北面有三門:一為勒烏本門,一為猶大門,一為肋未門。城門都是照以色列支的名字派起的。
३१नगराच्या वेशी, तिला तीन द्वारे असतील, इस्राएल वंशाच्या नावाप्रमाणे त्यांची नावे, रऊबेनचे द्वार, यहूदाचे द्वार व लेवीचे द्वार.
32 東面為四千五百肘,有三門:一為若瑟門,一為本雅明門,一為丹門。
३२पूर्व बाजू चार हजार पाचशे हात लांब असेल. तिला तीन द्वारे असतील. योसेफाचे द्वार, बन्यामीनाचे द्वार व दानाचे द्वार.
33 南面為四千五百肘,有三門:一為西默盎門,一為依撒加爾門,一為則步隆門。
३३दक्षिण बाजूसुद्धा चार हजार पाचशे हात लांब असेल. तिलाही शिमोनाचे द्वार, इस्साखाराचे द्वार व जबुलूनाचे द्वार अशी तीन द्वारे असतील.
34 西面為四千五百肘,有三門:一為加得門,一為阿協爾門,一為納斐塔里門。
३४पश्चिम बाजूही चार हजार पाचशे हात लांब असेल. तिच्या तीन द्वारांची नावे पुढीलप्रामाणे असतील. गादाचे द्वार, आशेराचे द्वार व नफतालीचे द्वार.
35 周圍共一萬八千肘。這城從那天起名叫「上主在那裏。」
३५ते सभोवतीचे अंतर अठरा हजार हात असेल. त्या दिवसापासून नगरीचे नाव ‘परमेश्वर तेथे आहे’ असे पडेल.