< 出埃及記 35 >
1 梅瑟召集以色列子民全會眾,向他們說:「這是上主吩咐你們應遵行的事:
१मोशेने सगळ्या इस्राएल लोकांच्या मंडळीला एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या या;
2 六日內作工,第七日為你們是聖日,應完成為上主安息;凡在這一日作工的,應受死刑。
२सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविसाव्याचा शब्बाथ होय, त्या दिवशी काम करणाऱ्या कोणत्याही मनुष्यास अवश्य जिवे मारावे.
3 安息日不准在你們住的一切地方生火。」獻禮的命令
३शब्बाथ दिवशी तुम्ही आपल्या राहत असलेल्या जागेत कोठेही विस्तव पेटवू नये.
4 梅瑟又訓示以色列子民全會眾說:「上主這樣命令說:
४मोशे सर्व इस्राएल लोकांच्या मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे;
5 由你們財物中取一份作獻儀,獻給上主;凡甘心樂捐的,可獻於上主的獻儀是:金、銀、銅,
५परमेश्वरासाठी तुम्ही अर्पणे आणावी. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वराकरता सोने, चांदी, पितळ;
६निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस;
७लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;
८दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;
९तसेच एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावी.
10 你們中間凡有天才的人,都要來製造上主所命令的一切:
१०“तुमच्यापैकी जे कोणी कुशल कारागीर आहेत त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे
11 帳棚、棚頂和棚罩,鉤子、木板、橫木、柱子和卯座,
११निवासमंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब, व उथळ्या;
१२कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट,
१३मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर;
१४प्रकाशासाठी दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आणि दिव्यासाठी तेल;
15 香壇和杠桿,傅禮的油、香料、帳棚入口的門簾,
१५धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, निवासमंडपाच्या दारासाठी पडदा;
16 全燔祭壇和祭壇的銅格子、杠桿及一切器具,盆和盆座,
१६होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक;
१७अंगणाचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या उथळ्या, आणि अंगणाच्या फाटकासाठी पडदा;
१८निवासमंडप व अंगण ह्याच्यासाठी मेखा व तणावे,
19 聖所內行禮的祭服,亞郎大司祭的聖衣,以及他兒子們行祭的服裝。」人民的獻儀
१९पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या पुत्रांची पवित्र वस्रे.”
२०मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली.
21 凡甘心情願捐獻的人都來送給上主獻儀,為製造會幕和會幕中的一切用具及聖衣之用;
२१नंतर ज्यांच्या अंतःकरणांत स्फूर्ती झाली, त्या सर्वांनी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्रांसाठी परमेश्वरास अर्पणे आणली.
22 無論男女,凡甘心樂捐的,都把金針、耳環、戒指、項鍊和各樣金器送來,各人都把金子奉獻給上主作獻儀。
२२ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळ्या स्त्रीपुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.
23 凡有紫色、紅色、朱紅色毛線、細麻、山羊毛、染紅的公羊皮、海豚皮的,也都送來。
२३ज्या ज्या पुरुषांच्याकडे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले.
24 願奉獻銀子和銅的,也送來,奉獻給上主作獻儀;凡有皂莢木的,也送來,為製造各種應用之物。
२४चांदी व पितळ यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वरास अर्पण केले.
25 凡技巧的婦女都親手紡線,把所紡的紫色、紅色、朱紅色毛線和細麻送來。
२५ज्या स्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले.
२६आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ती होऊन त्यांना बुध्दी झाली, त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले.
27 首長奉獻了紅瑪瑙石,鑲在厄弗得和胸牌上的寶石,
२७अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व ऊरपट ह्यात जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली.
28 香料和油,為點燈,為製傅禮的油,為製焚香而用。
२८दिव्याचे तेल व अभिषेकाचे तेल व सुगंधी धुपासाठी मसाला आणला.
29 以色列子民,無論男女,凡甘心樂捐,為製造上主藉梅瑟所吩咐的一切工程的,都自願向上主奉獻了禮品。派定工程師
२९परमेश्वराने मोशेला जे करण्याची आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्राएल लोकांनी स्वखुशीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली, ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंतःकरणांत स्फूर्ती झाली त्यांनीही अर्पणे आणली.
30 梅瑟向以色列子民說:「你們看,上主已提名,召叫了猶大支派的烏黎的兒子,胡爾的孫子貝匝勒耳,
३०तेव्हा मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, पाहा, परमेश्वराने यहूदा वंशातील ऊरीचा पुत्र म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला नाव घेऊन बोलावले आहे.
31 使他充滿天主的神,使他有智慧、技能和知識,能作各種工程,
३१आणि त्याने त्यास देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुध्दी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे.
३२तो सोने, चांदी आणि पितळ ह्यांच्यापासून कलाकुसरीचे काम करील.
33 能雕刻寶石,加以鑲嵌,雕刻木頭,製造各種藝術工程。
३३तो रत्नांना पैलू पाडील. लाकडाचे नक्षीकामही करून अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील.
34 上主又賜給他和丹支派的阿希撒瑪客的兒子敖曷里雅布領導的才能,
३४परमेश्वराने त्यास आणि दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब, ह्यांच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे.
35 使他們充滿藝術的才能,能雕刻刺繡,並用紫色、紅色、朱紅色的毛線和細麻作繡花及編織的各種工作,能作各種工程,能設計圖案。」
३५कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व प्रकारचे कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशासारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.