< 申命記 17 >

1 有任何殘缺或瑕疵的牛羊,不可祭獻給上主你的天主,因為這為上主你的天主是可憎惡的事。
परमेश्वरास यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरू यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.
2 在你中間,即在上主你的天主賜給你的一座城內,若發見一個男人或女人,做了上主你的天主眼中視為惡的事,違犯了他的盟約,
तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या नगरात राहायला लागल्यावर एखादे दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर आले. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळले. परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध,
3 去事奉敬拜其他的神,或太陽,或月亮,或任何天象,反對我所吩咐的事;
म्हणजे आज्ञांचे उल्लघंन करून ते सूर्य, चंद्र, किंवा आकाशातील तांरागण इतर दैवतांची पूजा करू लागले,
4 如果有人告訴了你,你一聽說,就應詳細調查。如果實有其事,真在以色列中做了這種可惡的事,
अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची खात्री झाली,
5 就將那做這種惡事的男人或女人,帶到城門外,用石頭砸死他們。
तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही त्या व्यक्तीला शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मारा.
6 根據兩個或三個見證的口供,即可將這該死的人處以死刑;根據一個見證的口供,卻不可處以死刑。
त्या व्यक्तीच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका.
7 見證人應先下手,然後眾人纔下手將他處死:如此由你中間剷除了這邪惡。
प्रथम साक्षीदारांनी मारायला हात उचलावा, मग इतरांनी मारावे. अशाप्रकारे आपल्यामधून अमंगळपणा निपटून काढावा.
8 若在你城鎮內發生了訴訟案件:或是殺人,或是爭訟,或是毆傷,而又是你難以處決的案件,你應起來上到上主你的天主所選的地方,
एखादे खूनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हास आवाक्याबाहेरचे वाटेल, या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल, तेव्हा परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे.
9 去見肋未司祭和那在職的判官,詢問他們,他們要指教你怎樣判斷這案件。
तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्यावा. या समस्येची सोडवणूक ते करतील.
10 你應依照他們在上主所選的地方,有關那案件指教你的話去執行;凡他們教訓你的,應完全遵行。
१०परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हास सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते ते सर्व कुचराई न करता अंमलात आणा.
11 應全依照他們給你的指導,告訴你的判斷去執行;對他們告訴你的定案,不可偏左偏右。
११तुला ज्या सूचना ते देतील व जो निर्णय तुला सांगतील त्याप्रमाणे कर. त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासुन उजवीडावीकडे वळू नको.
12 若有人擅自行事,不聽從那侍立於上主你的天主前供職的司祭,或不聽從判官,應把這人處死。如此你由以色列中剷除了這邪惡;
१२जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याचे तेथे हजर असणाऱ्या याजकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्यास चांगले शासन करा. त्यास मृत्यूदंड द्या. इस्राएलातून या नीच मनुष्याचे उच्चाटन करा.
13 民眾聽見了,必都害怕,再不敢擅自行事。
१३हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत.
14 當你進入上主你的天主賜給你的土地,佔據了那地,安住在那裏以後,你如說:「我願照我四周的各民族,設立一位君王統治我,」
१४तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या देशात तुम्ही जात आहात. त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे रहाल. मग इतर राष्ट्राप्रमाणे आपण आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हास वाटेल.
15 你應將上主你的天主所揀選的人,立為你的君王。應由你兄弟中立一人,作你的君王,不可讓不屬你兄弟的外方人統治你。
१५तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तीची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये.
16 但是,不可許他養許多馬,免得他叫人民回到埃及去買馬,因為上主曾對你們說過:「你們不可再回到那條路上去;」
१६त्याने स्वत: साठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये, असे परमेश्वराने बजावले आहे.
17 也不可許他有許多妻妾,免得他的心迷於邪途;也不可許他過於積蓄金銀。
१७तसेच त्यास बऱ्याच स्त्रिया असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत्त होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.
18 幾時他登上了王位,依照肋未司祭處所存的法律書,給他抄寫一本,
१८राज्य करायला लागल्यावर त्याने स्वत: साठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्याजवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे.
19 叫他帶在身邊一生天天閱讀,好使他學習敬畏上主他的天主,謹守遵行這法律上的一切話和這些規則。
१९नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने तो परमेश्वर देवाचे भय बाळगायला शिकेल.
20 如此他可避免對自己的同胞心高氣傲,偏離這些誡命,好使他和他的子孫在以色列中間久居王位。
२०म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्यास स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो व त्याचे वंशज इस्राएलावर दीर्घकाळ राज्य करतील.

< 申命記 17 >