< 申命記 13 >
1 若你們中出現了一位先知或作夢的人,給你提供一種神蹟或奇事,
१स्वप्नांचा अर्थ सांगणारा एखादा संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल.
2 而他所說的神蹟和奇事實現了,以致向你說:「讓我們去隨從事奉其他的神罷! 」而那神是你素不相識的;
२कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हास पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हास अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल.
3 你不要聽從這先知或作夢者的話,因為上主你們的天主有意試探你們,願意知道你們是否全心全靈真愛上主你們的天主。
३तरी त्या संदेष्टयाचे किंवा स्वप्न पाहणाऱ्याचे ऐकू नका. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करता कि नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहत असेल.
4 你們只應跟隨上主你們的天主,只應敬畏他,遵守他的誡命,聽從他的話,事奉他。依靠他。
४तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याचे भय बाळगा त्याच्या आज्ञा पाळा. त्याची वाणी ऐका, त्याची सेवा करा आणि त्यालाच बिलगूण राहा.
5 至於這先知或作夢的人,應處死刑,因為他出言背叛了領你出埃及地,由奴隸之家贖出你來的上主你們的天主,要你離棄上主你的天主命你當行的道路:如此你由你中間剷除了邪惡。
५तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मिसर देशात तुम्ही गुलाम होता तेव्हा तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा मनुष्य तुम्हास दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही या दुष्टाईचे निर्मूलन करा.
6 如果你的兄弟,你父親或母親的兒子,或你的兒女,或你的愛妻,或你視如性命的朋友,暗中引誘你說:「讓我們去事奉其他的神罷! 」而那神是你和你的祖先素不相識的,
६तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हास दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ती म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु. तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकण्यातही नसलेले हे दैवत असेल
7 是你四周,離你或近或遠,由地極這邊到地極那邊的各民族所敬拜的神;
७(मग ते देव तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे आसपासच्या किंवा दुरच्या राष्ट्राचे असोत.)
8 你不可對他表示同意,不可聽從他,也不可憐視他,顧惜他,袒護他;
८त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची गय येऊ देऊ नका. त्यास मोकळा सोडू नका. तसेच त्यास लपवू नका.
9 務要將他殺死,並且你應先動手,然後全體人民動手打死他。
९त्यास ठार करा. त्यास दगडांनी मारा. पहिला दगड तुम्ही उचला आणि मारायला सुरूवात करा. मग इतर जण त्यास दगडांनी मारतील.
10 你應用石頭砸死他,因為他圖謀使你離棄領你出埃及地,出奴隸之家的上主你的天主。
१०मरेपर्यंत त्यास दगडमार करावी; कारण मिसरमधून ज्याने तुम्हास दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासूनच हा तुम्हास बहकवायचा प्रयत्न करत आहे.
11 這樣全以色列人聽了必然害怕,在你中間不致做出這樣邪惡的事。
११ही गोष्ट सर्व इस्राएलांच्या कानावर गेली की त्यांनी ही भीती वाटेल, आणि अशी दुष्कृत्ये करायला ते धजावणार नाहीत.
12 如果你聽說,在上主你的天主賜給你居住的一座城內,
१२तुम्हास राहण्याकरता तुमचा देव परमेश्वर नगरे देईल. त्यापैकी एखाद्या नगरातून तुमच्या कानावर वाईट बातमी येईल. ती अशी की,
13 由你中間出來了一些壞人,勾引本城的居民說:「讓我們去事奉其他的神罷! 」而那神是你們素不相識的;
१३तुमच्यापैकीच काही नीच माणसे आपल्यापैकी काही जणांना कुमार्गाला लावत आहेत. आपण अन्य दैवतांची सेवा करु या, असे म्हणून त्यांनी नगरातील लोकांस बहकावले आहेत. (ही दैवते तुम्हास अपरीचीत असतील.)
14 你就該調查、探尋、仔細訪問;如果真有其事,在你中間真發生了這樣可惡的事,
१४असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याची आधी पूर्ण शहानिशा करून घ्या. ते खरे निघाले, असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले,
15 你該用利劍殺盡這城的居民,完全破壞此城和城中所有的一切,連城中的牲畜也用劍殺盡,
१५तर त्या नगरातील लोकांस त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा तलवारीने वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उध्वस्त करा.
16 並把由城中掠奪的一切財物堆積在廣場上,將城和所掠奪的一切財物放火焚燒,全獻給上主你的天主,使那城永遠成為廢墟,再不得重建。
१६मग तेथील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करून शहराच्या मध्यभागी आणा. आणि त्याचबरोबर सर्व शहर बेचिराख करून टाका. ते तुमचा देव परमेश्वर याचे होमार्पण असेल. ते शहर पुन्हा कधीच वसवता कामा नये.
17 凡應毀滅之物,一件也不可留在你手中,好使上主撤回他的盛怒,對你施恩,憐恤你,照他對你祖先所誓許的,使你繁昌,
१७ते नगर नाश करायला परमेश्वराच्या हवाली केले जावे म्हणून त्यातील कोणतीही वस्तू स्वत: साठी ठेवून घेऊ नका. ही आज्ञा ऐकलीत तर परमेश्वराचा तुमच्यावरचा क्रोध ओसरेल. त्यास तुमची दया येईल तुमच्याबद्दल प्रेम वाटेल तुमच्या पूर्वजांना त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याच्याकृपेने तुमच्या देशाची भरभराट होईल.
18 只要你聽從上主你的天主的話,遵守我今天所吩咐你的一切誡命,實行上主你的天主眼中視為正直的事。
१८नगरे उध्वस्त करण्याविषयी तुमचा देव परमेश्वर याचे ऐकलेत, त्याच्या आज्ञा पाळल्यात तरच हे घडेल. तेव्हा तुमचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करा.