< 启示录 5 >

1 我看见坐在宝座上那位,右手拿着书卷,书卷两面都写满了字,有七个封印。
मग मी, जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते आणि ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती.
2 我又看见一位力量强大的天使,大声喊道:“谁配展开这书卷并拆开它的封印?”
आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?”
3 在天上、地上和地底,没有人能够展开书卷阅读。
परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यांत पाहावयास समर्थ नव्हता.
4 找不到配展开并阅读书卷的人,我为之大哭。
ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही म्हणून मला फार रडू आले.
5 一位长老对我说:“不要哭!看,犹大部落的狮子、大卫的后裔,他已经赢得这场战斗,能够展开书卷,拆开它的七印。”
परंतु वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.”
6 我看见在宝座和四个活物中间,在众长老之中,有一个羊羔,好像被杀掉了,有七个羊角和七个眼睛,那是上帝的七灵,被派到世界各地。
राजासनाच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या व त्या वडीलांच्या मध्यभागी कोकरा उभा असलेला मी पाहिला, तो वधलेल्यासारखा होता, त्यास सात शिंगे आणि सात डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे होते.
7 羊羔走过去,从宝座上那位的右手拿了书卷。
तो गेला आणि त्याने जो, राजासनावर बसला होता, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.
8 拿到书卷后,四个活物和二十四位长老俯伏在羊羔前,各拿着琴和盛满了香的金炉,这香是众信徒的祈祷。
आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना होत्या.
9 他们唱着一首新歌:“你配拿到书卷并拆开封印,因你曾被杀,用你的血从所有部落、语言、民族和国家处赎回上帝的人。
आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रांतून देवासाठी माणसे विकत घेतली आहेत.
10 你让他们成为我们上帝的国和祭司,他们要在人间执掌王权。”
१०तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य आणि याजक बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील.”
11 我继续看着,听见千万天使的声音,他们都围在宝座、活物和长老的周围,
११मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती.
12 大声说:“被杀的羊羔配得上获得权能、财富、智慧、力量、尊贵、荣耀和祝福!”
१२देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले. जो वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे.
13 我又听见在天上、地上、地底和海中的一切造物,以及天地间的万物都说:“愿祝福、尊贵、荣耀和权利,都归于坐在宝座上的那一位和羊羔,直到永远!” (aiōn g165)
१३प्रत्येक निर्माण केलेली वस्तू आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, “जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!” (aiōn g165)
14 四个活物说:“阿门!”众长老也俯伏敬拜。
१४चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्यास अभिवादन केले.

< 启示录 5 >