< 马太福音 2 >
1 耶稣诞生在犹太的伯利恒,当时正是希律王执政时期。耶稣诞生后,几位智者从东方来到耶路撒冷。
१हेरोद राजाच्या दिवसात यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात येशूचा जन्म झाल्यानंतर, पूर्वेकडील देशातून ज्ञानी लोक यरूशलेम शहरात येऊन विचारपूस करू लागले की,
2 他们说:“犹太之王已经诞生,他在哪里?我们看到他的明星显现于东方的夜空,特来拜访。”
२“यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.”
3 希律王听闻此言颇感紧张,整个耶路撒冷城的民众也内心惴惴。
३जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले;
4 希律召集所有的祭司长和民间的宗教老师,询问他们弥赛亚可能会诞生在何处。
४हेरोद राजाने सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमवून त्यांना विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे?
५ते त्यास म्हणाले, “यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात, कारण संदेष्ट्यांच्याद्वारे असे लिहिलेले आहे की;
6 犹大的伯利恒啊,你在犹大诸城中并非渺小,因为未来你们中将诞生一位领袖,他将带领以色列人。”
६‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’”
7 听闻此言,希律私下叫来几位智者,仔细询问那颗星具体出现的时间。
७मग हेरोद राजाने ज्ञानी लोकांस गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नक्की कधी दिसला याची वेळ विचारून घेतली.
8 然后他派他们去伯利恒,还说:“你们到了那里后,仔细寻找那个孩子,找到后就来向我报告,我也会去拜见他。”
८त्याने त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व तुम्हास शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मी ही येऊन त्यास नमन करीन.”
9 智者于是听从国王的旨意出发,他们之前看到的那颗星位于东方,一路指引着他们,最终停在孩子所在之处的上空。
९राजाचे हे सांगणे ऐकून ते त्यांच्या वाटेने निघाले. जो तारा त्यांनी पूर्वेस पाहीला होता त्याने बेथलेहेम नगरापर्यंत त्यांचे मार्गदर्शन केले आणि ज्ञानी लोक बालकापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यापुढे चालला.
१०तो तारा पाहून ज्ञानी लोकांस अतिशय आनंद झाला.
11 他们随即走进房屋,看见孩子与其母亲玛利亚。于是他们伏拜在孩子面前,打开宝袋,将里面的黄金、乳香、没药作为礼物送给他。
११नंतर ते त्या घरात गेले आणि ते बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली.
12 由于主曾托梦警告他们,不要将眼前所见禀报希律王,于是他们便从另外一条道路回到了自己的国家。
१२देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी सूचना दिल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.
13 智者离开后,主的天使出现在约瑟的梦中,告诉他:“快起来!带着孩子和他的母亲逃到埃及并住下,等候我的指示。因为希律一定会想方设法找到这孩子并将他除掉。”
१३ते गेल्यावर, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे.”
14 约瑟醒来后,立刻连夜带着孩子和妻子向埃及逃去。
१४त्या रात्री तो उठला आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशात निघून गेला.
15 此后便一直住在那里,直到希律王驾崩。这件事应验了主借先知所传达的预言:“我从埃及唤出我儿。”
१५तो हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. “मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे.” असे जे प्रभूने संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले ते पूर्ण झाले.
16 希律发现智者欺骗了他,非常生气。根据从智者处打听的信息,他推测这个男孩应该不到两岁,于是立刻下令杀掉伯利恒城内及周边地区所有两岁以下男孩。
१६तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद राजा अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे पुरूष बालके होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारले.
१७यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते, ते त्यासमयी पूर्ण झाले. ते असेः
18 在拉玛传来可怕的痛哭与哀嚎,拉结为其子女哭泣,白发人送黑发人,这是任何安慰都无法抚平的悲伤。
१८“रामा येथे रडणे व मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे, आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.”
19 希律王驾崩之后,主派天使向住在埃及的约瑟托梦,告诉他:
१९पुढे हेरोद राजा पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला,
20 “出发吧!带着孩子和孩子的母亲去以色列,因为想要取这孩子性命的人已死去。”
२०“उठ, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्राएल देशास जा, कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.”
21 约瑟醒来后,便带着孩子和孩子的母亲动身前往以色列。
२१तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात आला.
22 但当他听说希律之子亚基劳斯继位做了犹太王,便害怕回到以色列。由于在梦中获得警告,于是他便去了加利利,
२२परंतु अर्खेलाव हा आपला पिता हेरोद याच्या जागी यहूदीया प्रांतात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास घाबरला, आणि स्वप्नात देवाने सूचना केल्यानंतर तो गालील प्रांतास निघून गेला,
23 在一座名为拿撒勒的城市中安顿下来。这应验了先知的那句话:人们将称他为拿撒勒人。
२३व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.