< Job 42 >
1 Hottelah Job ni BAWIPA hah a pathung teh hettelah a dei.
१नंतर ईयोबने परमेश्वरास उत्तर दिले, तो म्हणाला:
2 Bangpuengpa na sak thai tie hah ka panue, na noenae hah ngang thai lah awm hoeh.
२“परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे, तू योजना आखतोस त्या प्रत्यक्षात कोणीही थांबवू शकत नाही.
3 Apimaw kaie panuenae laipalah khokhangnae ka hrawk e hah telah na pacei. kai hanelah kângairu poung e lah, ka panue hoeh e ka pâpha e lah ao hah ma.
३तू मला विचारलेस, हा अज्ञानी मनुष्य कोण आहे जो असे मूर्खासारखे बोलतो आहे? तरीही मला ज्या गोष्टी कळत नव्हत्या त्या गोष्टी मी बोललो, त्यांच्याविषयीच मी बोलत होतो. ज्या गोष्टी समजणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते त्यांच्याविषयी मी बोलत होतो.
4 Pahren lahoi thai nateh, lawk na dei sak haw. Lawk na pacei vaiteh na pathung haw telah na ti.
४परमेश्वरा, तू मला म्हणालास, ईयोब, तू ऐक, मी बोलेन, मी तुला प्रश्न विचारेन, आणि तू मला उत्तर दे.
5 Nang teh hnâ hoi dueng doeh na thai rah, hatei, atu teh ka mit hoi na hmu toe.
५परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते, परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे.
6 Hatdawkvah, kama hoi kama ka kâpanuet teh, hraba hoi vaiphu dawk ka tahung teh, pan ka kângai toe telah a ti.
६आता मलाच माझी लाज वाटते. मला पश्चाताप होत आहे. मी आता धुळीत आणि राखेतबसून पश्चाताप करील.
7 BAWIPA ni Job koevah lawk be a dei hnukkhu, BAWIPA ni Teman tami Eliphaz koevah, nang hoi na hui roi koevah ka lungkhueknae a kâan. Bangkongtetpawiteh, ka san Job patetlah kaie kong dawk, lawkkatang hah na dei awh hoeh.
७परमेश्वराचे ईयोबाशी बोलणे झाल्यावर तो तेमानीच्या अलीफजला म्हणाला, मला तुझा आणि तुझ्या दोन मित्रांचा राग आला आहे. का? कारण तुम्ही माझ्याबद्दल योग्य बोलला नाही. परंतु ईयोब माझा सेवक आहे. तो माझ्याविषयी बरोबर बोलला.
8 Hatdawkvah, maitotan 7, tutan 7 hrawi nateh, ka san Job koevah cet awh nateh, nangmouh hanelah thuengnae hah poe awh. Hahoi ka san Job ni nangmouh hanelah a ratoum vaiteh, hote kai ni ka coe pouh han. Nahoeh pawiteh, na pathu awh e patetlah na lathueng lawk na ceng awh han. Bangkongtetpawiteh, ka san Job patetlah kaie kong dawkvah, lawkkatang na dei awh hoeh telah a ti.
८म्हणून अलीफज, आता सात बैल आणि सात एडके घे. ते घेऊन माझ्या सेवकाकडे, ईयोबाकडे जा. त्यांना मार आणि त्यांचा स्वत: साठी होमबली अर्पण कर. माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईन. मग मी तुम्हास योग्य असलेली शिक्षा देणार नाही. तुम्ही अतिशय मूर्ख होता म्हणून तुम्हास शिक्षा करायला हवी. तुम्ही माझ्याविषयी नीट बोलला नाही. परंतु माझा सेवक ईयोब मात्र माझ्याबद्दल अगदी योग्य बोलला.
9 Hottelah Teman tami Eliphaz hoi Shuhi tami Bildad hoi Naamath tami Zophar tinaw a cei awh teh, BAWIPA ni kâ a poe e patetlah a sak awh teh, BAWIPA ni Job kâheinae hah a coe pouh.
९तेव्हा अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथीचा यांनी देवाचे ऐकले. नंतर परमेश्वराने ईयोबाच्या प्रार्थनेला उत्तर दिले.
10 Hahoi Job ni a huinaw kathum touh hanelah, a ratoum pouh torei teh, BAWIPA ni Job kangduenae hmuen hah bout ahawi sak teh, BAWIPA ni Job teh yampa e a tawnta e hlakvah, let hni touh bout a poe.
१०ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली याप्रकारे परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्यास पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले.
11 Hottelah a hmaunawnghanaw hoi a tawncanunaw pueng teh, yampa kapanueknaw pueng ni a im dawk a tho awh teh, rawca a ca awh. BAWIPA ni a lathueng vah kathoute a phasak e naw pueng dawk a lungpahawi awh teh a lungmawng sak awh. Tami pueng ni ahni koevah, ngun hoi suinaw hah a poe awh.
११ईयोबाचे सगळे भाऊ आणि बहिणी त्याच्या घरी आले. ईयोबाला जो कोणी ओळखत होता तो ही त्याच्याकडे आला. त्यांनी ईयोबासह भोजन घेतले. त्यांनी ईयोबाचे सांत्वन केले. परमेश्वराने ईयोबावर इतकी संकटे आणली त्याचे त्यांना वाईट वाटले. प्रत्येकाने ईयोबाला चांदीचा तुकडा आणि सोन्याची अंगठी दिली.
12 Hottelah BAWIPA ni ahmaloe e hlak a hnukteng yawhawinae kapap poung lah a poe. Tu 14,000, kalauk 6,000, maitotan a bo lah 1,000, hoi la manu 1,000 a tawn.
१२परमेश्वराने ईयोबाच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक कृपा केली. ईयोबाकडे आता चौदा हजार मेंढ्या, सहा हजार उंट, दोन हजार गायी आणि एक हजार गाढवी आहेत.
13 Ca tongpa 7 touh hoi canu 3 touh hai a tawn.
१३ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या.
14 Apasuekpoung e min teh Jemimah, apâhni e teh Keziah, apâthum e teh Kerenhappukh.
१४ईयोबाने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसऱ्या मुलींचे नाव कसीया ठेवले. तिसऱ्या मुलीचे नाव केरेन हप्पूक ठेवले.
15 Ram thung pueng dawk Job e canu patetlah meikahawi e awm hoeh. A na pa ni ahnimouh teh a thangroinaw koe râw a rei van.
१५त्याच्या मुली त्या देशातील सर्वात सुंदर मुली होत्या, ईयोबाने त्याच्या मुलींना त्याच्या मालमत्तेतला वाटा दिला. त्यांच्या भावांप्रमाणे ईयोबाच्या मालमत्तेतला वाटा त्यांना मिळाला.
16 Hathnukkhu hoi Job teh kum 140 a hring teh a ca capanaw hoi a na mincanaw se pali totouh a hmu rah.
१६अशा तऱ्हेने ईयोब एकशे चाळीस वर्षे जगला. तो त्याची मुले, नातवंडे, पतवंडे पाहीपर्यंत जगला.
17 Hottelah Job a matawng teh hnintha kuep lahoi a due.
१७नंतर ईयोब मरण पावला. ईयोब चांगले आयुष्य जगला. तो अगदी वयोवृध्द होऊन मेला.”