< Solomon Laa 5 >

1 Ka ngannu vasanu aw, kamah dum la ka lo coeng. Ka murrah neh ka botui te ka bit. Ka duup neh ka khoitui ka caak. Ka misurtui neh ka suktui khaw ka ok coeng. Rhoihui Ka hui long khaw ca saeh. O saeh lamtah ka hlo rhoek khaw rhuihmil pai saeh.
(स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझे बहिणी, माझे वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत. मी माझा मध मधाच्या पोळ्यासहीत खाल्ला आहे. मी माझा द्राक्षरस व दूध प्यालो आहे. मित्रांनो, खा. माझ्या प्रियांनो; प्या, मनसोक्त प्या.
2 Ka ih muelh vaengah ka hlo kah a khoek ol loh ka lungbuei a haeng. Ka ngannu, ka cangyaeh, ka vahui neh ka cuemhmuet aw kai hamla ong pai. Ka lu dongkah ka sampin khaw khoyin tuicip, buemtui hah coeng.
(ती तरुणी स्वतःशी बोलते) मी झोपलेली आहे. पण माझे हृदय स्वप्नात जागे आहे. माझा प्रियकर दार वाजवतो आणि म्हणतो, माझे बहिणी, माझ्या प्रिये, माझ्या कबुतरा, माझ्या विमले! माझे डोके दहिवराने ओले झाले आहे. माझे केस रात्रीच्या दवबिंदूने ओलसर झाले आहेत.
3 Ka angkidung te ka pit coeng tih metlam ka bai eh? Ka kho te ka silh dae metlam ka ti sak eh?
(तरुण स्त्री स्वतःशी बोलते) मी माझा पोषाख काढून टाकला आहे. तो पुन्हा मी कसा अंगात घालू? मी माझे पाय धुतले आहेत. ते मी कसे मळवू?
4 Ka hlo loh a kut te a put longah a thawt tih anih ham ka ko umya.
पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला, आणि माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले.
5 Kamah hlo te ong pah ham kamah ka thoh vaengah ka kut dongah murrah cip. Ka kutdawn dongkah murrah te thohhna kut dongla long.
माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले. तेव्हा माझ्या हातास दाराच्या कडीवरील गंधरस लागला. माझ्या बोटांवरून त्याचा द्रव गळत होता.
6 Ka hlo hamla ka ong pah vaengah ka hlo tah dongpam tih khum. Ka hinglu tah anih voek hamla cet coeng. Anih te ka toem dae amah ka hmuh moenih. Amah ka khue dae kai n'doo moenih.
मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले. पण माझा प्रियकर तोंड फिरवून निघून गेला होता. तो गेला तेव्हा माझा जीव गळून गेला. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. मी त्यास हाक मारली पण त्याने मला उत्तर दिले नाही.
7 Khopuei ah aka hil tih aka tawt rhoek loh kai m'hmuh tih kai te n'ngawn uh. Vongtung aka tawt rhoek loh kai te n'hi sak uh tih ka pum dong lamkah ka lumuek hni te a phueih uh.
शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले. त्यांनी मला मारले, जखमी केले. कोटावरच्या पहारेकऱ्यांनी माझा अंगरखा घेतला.
8 Jerusalem nu nang te ka caeng coeng. Kai hlo te na hmu koinih ka lungnah a tloh te a taengah metlam na thui eh?
(ती स्त्री त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो! मी तुम्हास शपथ घालून सांगते, जर तुम्हास माझा प्रियकर सापडला, तर कृपाकरून त्यास सांगा की, मी प्रेमामुळे आजारी झाले आहे.
9 Huta khuikah sakthen aw, kai hlo lakah nang hlo te metlam a om? Kaimih nan caeng van bangla a hlo lakah nang hlo tah tloe a?
(त्या शहरातील स्त्रिया त्या तरुणीशी बोलत आहेत) अगे स्त्रियांतील सर्वात सुंदरी! तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून अधिक चांगला आहे तो कसा काय? तू आम्हास अशी शपथ घालतेस तर तुझ्या प्रियकरांत इतरांपेक्षा अधिक ते काय आहे?
10 Kamah hlo tah ngo tih thim, a thawngsang soah hnitai la pai.
१०(तरुणी त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहेत) माझा प्रियकर गोरापान व लालबुंद आहे. तो दहा हजारात श्रेष्ठ आहे.
11 A lu tah sui kah suicilh la om, a sampin bu tih vangak bangla muem.
११त्याचे मस्तक शुध्द सोन्याप्रमाणे आहे. त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंमकावळ्यासारखे काळे आहेत.
12 A mik rhoi tah sokca tui taengkah vahui bangla, suktui neh a yuh tih a hol hnothen bangla om.
१२त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत, दुधात धुतलेल्या कबुतरासारखे आहेत, कोदंणात जडलेल्या मोलवान खड्यासारखे आहेत.
13 A kam rhoi tah canglak botui, rhaltoeng bo-ul bangla, a hmuilai tah tuilipai neh murrah tuicip la long.
१३त्याचे गाल सुगंधी झाडाचे वाफे, सुगंधी फुलझाडांचे ताटवे असे आहेत, अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत. त्याचे ओठ कमलपुष्पाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्रवतो.
14 A kut tah timsuih neh a moep sui hnaai van pawn ni. A bung khaw vueino saphi, minhum mueithuh van pawn ni.
१४त्याचे हात रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत. त्याचे पोट नीलमणी जडवलेल्या मऊ हस्तिदंतफलकासारखे आहे.
15 A phai rhoi tah suicilh buenhol dongkah a sut lungbok tung van pawn ni. A mueimae neh Lebanon kah lamphai thing coelh van pawn ni.
१५त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत. त्याचे रुप लबानोनासारखे आहे. ते गंधसरू झाडासारखे उत्कृष्ट आहे.
16 Kamah hlo he a ka didip tih a pum la ngailaemnah la om. He tah ka hui Jerusalem nu.
१६होय, यरूशलेमेच्या कन्यांनो, माझा प्रियकर हाच माझा सखा आहे. त्याची वाणी सर्वांत गोड आहे. तो सर्वस्वी सुंदर आहे.

< Solomon Laa 5 >