< Amos 6 >
1 Anunae Zion dongah mongkawt tih Samaria tlang ah aka pangtung rhoek aih. Namtom kah a tanglue a phoei dongah amih taengla Israel imkhui te kun uh van.
१जे सीयोनमध्ये आरामात आहेत त्यांना, आणि जे शोमरोनाच्या पर्वतावर सुरक्षीत आहेत त्यांना हायहाय, जे राष्ट्रांतील प्रसिद्ध लोक आहेत, ज्यांच्याकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्यांना, हायहाय.
2 Kalneh la cet uh lamtah hmu lah. Te lamloh Khamath Rabbah la cet uh lamtah Philisti kah Gath la suntla uh. Te kah ram tah then ngai tih a khorhi te na khorhi lakah len a?
२“कालनेला जाऊन पाहा, तेथून महानगरी ‘हमाथला’ जा, तेथून पलिष्ट्यांची नगरी गथला खाली जा. ते तुमच्या दोन्ही राज्यांपेक्षा चांगले आहेत काय? त्यांची सीमा तुमच्या सीमेपेक्षा मोठी आहे काय?
3 Yoethae khohnin ham rhoe tih kuthlahnah hmuen la mop uh.
३तुम्ही जे वाईट दिवसास दूर करता, आणि हिंसाचाराचे आसन जवळ आणता, त्यांना हाय हाय.
4 Vueino thingkong dongah yalh uh tih a soengca dongah cawklawih uh. Boiva khui lamkah tuca neh sael-im khui lamkah saelca aka ca rhoek.
४तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि आपल्या गाद्यांवर पसरता. तुम्ही कळपातील कोकरे, आणि गोठ्यातील वासरे खाता.
5 David bangla thangpa ol te a oei uh tih lumlaa tumbael te amamih ham a moeh uh.
५ते वीणेच्या संगीतावर मूर्खासारखे गातात, आणि दाविदाप्रमाणे ते वाद्यांवर सराव करतात.
6 Misurtui te baelcak dongah a ok uh tih situi tanglue neh koelh uh dae Joseph kah pocinah dongah a kothae uh pawh.
६ते प्यालांतून मद्य पितात आणि चांगल्या तेलाने आपणाला अभिषेक करतात. पण ते योसेफाचा नाश होत आहे, त्यावर शोक करीत नाहीत.”
7 Te dongah boeilu a poelyoe bangla a poelyoe uh pawn vetih cawklawih rhoek kah rhok nong ni.
७तर आता ते पाडाव होऊन पहिल्याने पाडाव झालेल्यांसहीत पाडावपणांत जातील, आणि ख्यालीखुशालीत वेळ घालवणाऱ्यांचा गोंधळ नष्ट होईल.
8 Ka Boeipa Yahovah loh a hinglu neh a toemngam coeng. He tah caempuei Pathen BOEIPA kah olphong ni. Jakob kah hoemdamnah te ka lok lo tih a impuei khaw ka hmuhuet. Te dongah khopuei neh a cungkuem te ka khaih ni.
८सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, प्रभू परमेश्वराने आपलीच शपथ वाहीली आहे की, “मी याकोबाच्या अभिमानाचा तिरस्कार करतो, त्याच्या किल्ल्यांचा मी तिटकारा करतो. म्हणून मी ती नगरी व त्यातील सर्वकाही शत्रूच्या हाती देईल.”
9 Tedae ana om saeh, im pakhat ah hlang parha sueng mai cakhaw duek uh ni.
९त्यावेळी, कदाचित एका घरांत दहा लोक असतील, तर ते सर्व मरतील.
10 Anih te a panoe neh a rhok aka soem loh a khuen tih im lamloh a rhuh a khuen vaengah khaw im thael kah taengah, “Nang taengah om pueng a?” a ti nah ni. Te vaengah, “Lunglilungla la,” a ti vetih, “Saah lah, BOEIPA ming te poek ham moenih,” a ti ni.
१०प्रेते घेऊन जाळण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित् कोणी असेल तर, त्यास लोक विचारतील “तुझ्याजवळ आणखी कोणी आहे काय?” तो मनुष्य म्हणेल, नाही, मग तो त्यास म्हणेल, “गप्प राहा, आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नाही.”
11 BOEIPA loh a uen dongah im len te a pil la, im yit te a nuei la a boh pawn ni ke.
११कारण पाहा! परमेश्वर आज्ञा देईल, तेव्हा मोठ्या घरांचे तुकडे तुकडे पडतील व लहान घरांचा भुगा-भुगा होईल.
12 Thaelpang dongah marhang yong vetih saelhung nen khaw a thoe rhet aya? Te dongah tiktamnah te sue la, duengnah thaihtae te pantong la na poeh sakuh.
१२घोडे खडकावरून धावतात का? तेथे कोणी जमीन बैलांनी नांगरतात का? पण तुम्ही तर न्यायाचे विष केले, आणि चांगुलपणाचे फळ कडू केले आहे.
13 “Mah thaa neh mah hamla a ki n'loh moenih a?,” aka ti rhoek te Lodebar ah a kohoe uh.
१३तुम्ही ज्यात काहीच नाही त्यामध्ये आनंद करता, तुम्ही म्हणता, “आम्ही आमच्या बळावर सत्ता संपादन केली.”
14 He tah caempuei Pathen BOEIPA kah olphong ni. Israel imkhui nang taengah namtom ka thoh coeng ne. Te dongah nangmih te Khamath a pawk nah lamloh Arabah soklong duela n'nen uh ni.
१४“पण हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन, ते राष्ट्र तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला दु: ख देईल.” सेनाधीश परमेश्वर देव, असे म्हणतो.