< Solomon Laa 3 >

1 Ka hinglu kah a lungnah te khoyin ah ka thingkong dongah ka tlap. Anih te ka tlap dae amah ka hmuh moenih.
(ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता, ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो, त्याची उत्कंठा मला लागली. मी त्यास उत्कटतेने शोधले; पण तो मला सापडला नाही.
2 Ka thoo laeh vetih kho khopuei khui neh imdak ah khaw, toltung ah khaw ka hil mako. Ka hinglu loh a lungnah te ka tlap laeh mako. Anih te ka tlap dae amah ka hmuh moenih.
मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती, रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन. मी त्यास शोधले पण मला तो सापडला नाही.
3 Khopuei te a hil tih aka tawt rhoek loh kai m'hmuh uh. Ka hinglu kah a lungnah te na hmuh uh nim?
शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले. मी त्यांना विचारले, “माझ्या प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का?”
4 Amih lamloh vel ka poeng vaengah ka hinglu kah a lungnah te ka hmuh. Amah te ka tuuk tih a nu im hil neh kai n'yom nah imkhui hil amah ka khuen duela anih te ka hlah pawh.
मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते. इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला. मी त्यास धरले. मी त्यास जाऊ दिले नाही. मी त्यास माझ्या आईच्या घरी नेले. जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्यास सोडले नाही.
5 Jerusalem nu rhoek nang te kan caeng coeng. Kohong kah sakhi rhuinu long khaw sayuk long khaw n'haeng boel saeh. Lungnah loh a ngaih duela haenghang boeh.
(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो, रानतल्या हरिणी आणि मृगी यांच्या साक्षीने मी शपथ घालून सांगते. आमचे प्रेम करणे संपत नाही, तोपर्यंत त्यामध्ये व्यत्यय आणू नका.
6 Myrrah a phum neh thenpom vaidik boeih lamkah hmueihtui tah hmaikhu tung bangla khosoek lamloh aka cet he unim?
(ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने अशी धुराच्या खांबासारखी, रानातून येणारी ती ही कोण आहे?
7 Solomon taengkah a baiphaih aih ke. A kaepvai kah hlangrhalh sawmrhuk rhoek khaw Israel hlangrhalh khui lamkah ni.
पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे. त्याच्यासभोवती साठ सैनिक आहेत, ते साठजण इस्राएलाच्या सैनिकांपैकी आहेत.
8 Amih boeih tah cunghang a muk uh tih caemtloek neh phaep uh. Hlang loh khoyin kah birhihnah dongah a phai ah a cunghang a vah.
ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत. रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला करायला ते तयार आहेत.
9 Manghai Solomon loh Lebanon thing te amah kah pa la a sak.
राजा शलमोनाने स्वत: साठी लबानोनी लाकडाची पालखी तयार केली.
10 A tung te cak neh, a imci te sui neh, a ngoldoelh te daidi neh a saii. A khui tah Jerusalem nu kah lungnah neh a ben.
१०त्याचे खांब चांदीचे केले. पाठ सोन्याची केली. बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली. त्याचा अंतर्भाग यरूशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने सजवला आहे.
11 Cet lamtah manghai Solomon taengkah Zion nu rhoek ke hmu uh lah. A lueinah hnin neh a lungbuei kohoenah hnin ah anih te a manu loh rhuisam neh a khuem.
११(ती स्त्री यरूशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा. त्या दिवशी तो खूप आनंदी होता.

< Solomon Laa 3 >