< Yeremiya 11 >
1 Yehova anayankhula ndi Yeremiya kuti,
१यिर्मयाला परमेश्वराकडून मिळालेले वचन, ते म्हणाले:
2 “Imvani mawu a pangano ili, ndipo uwawuze anthu a ku Yuda ndi a ku Yerusalemu.
२“यिर्मया, या कराराची वचने ऐक, आणि यहूदाच्या प्रत्येक मनुष्यास आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या हे घोषीत कर.
3 Awuze kuti Yehova, Mulungu wa Israeli akuti ‘adzakhala wotembereredwa munthu amene samvera mawu a pangano ili.
३त्यांना असे सांग की, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘जो कोणी या कराराची वचने ऐकत नाही, तो शापित असो.’
4 Awa anali mawu amene ndinalamulira makolo anu nditawatulutsa mu Igupto, kuchoka mʼngʼanjo yamoto.’ Ine ndinati, ‘Mverani Ine ndi kuchita chilichonse chimene ndakulamulirani. Mukatero mudzakhala anthu anga ndi Ine ndidzakhala Mulungu wanu.
४तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढून आणले, त्यावेळी मी त्यांना हा करार आज्ञापिला आणि ही वचने आचरनात आणा, तर तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईन.
5 Tsono Ine ndidzakwaniritsa lumbiro lomwe ndinalumbira kwa makolo anu kuti ndidzawapatsa dziko loyenda mkaka ndi uchi,’ dziko lomwe inu lero mukukhalamo.” Tsono Ine ndinayankha kuti, “Ameni, Yehova.”
५तुमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाकरिता मी हे करीन, दूध व मध यांची रेलचेल असलेली सुपीक भूमी द्यायचे मी त्यांना कबूल केले होते. त्याच भूमीवर तुम्ही आता राहत आहात.” तेव्हा मी म्हणालो होय, परमेश्वरा!
6 Yehova anandiwuza kuti, “Lengeza mawu onsewa mʼmizinda yonse ya ku Yuda ndi mʼmisewu ya mu Yerusalemu: ‘Mverani mawu a pangano ili ndi kuzitsatira.
६परमेश्वर मला म्हणाला, “यहूदाच्या शहरांतून व यरूशलेमेच्या रस्त्यांतून हे वचन घोषीत कर, कराराची वचने ऐका आणि त्यांचे पालन करा.
7 Kuyambira nthawi imene ndinatulutsa makolo anu ku Igupto mpaka lero, ndakhala ndi kuwachenjeza kawirikawiri kuti, ‘Mverani Ine.’
७कारण मी त्यांना मिसरच्या बाहेर काढले त्या दिवसापासून या दिवसापर्यंत मी तुमच्या पूर्वजांना इशारा देत आलो आहे की माझा शब्द ऐका.
8 Koma sanamvere kapena kulabadirako. Aliyense anawumirira kuchita zoyipa za mʼmitima yawo. Ngakhale ndinawalamulira kuti asunge pangano langa koma iwo sanasunge. Choncho ndinawalanga monga ndinaneneramo.’”
८पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही. ते दुराग्रही हृदयाचे बनले आणि आवडेल तेच त्यांनी केले. म्हणून मी त्यांना माझ्या आज्ञा पाळण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही, म्हणून करारात उल्लेखलेल्या सर्व शापित गोष्टी मला त्यांच्याबाबत कराव्या लागल्या.”
9 Kenaka Yehova anandiwuza kuti, “Anthu a ku Yuda ndi ku Yerusalemu andiwukira.
९नंतर परमेश्वर मला म्हणाला, “यहूदातील आणि यरूशलेममधील लोकांमध्ये कट सापडला आहे.
10 Abwereranso ku machimo a makolo awo, amene anakana kumvera mawu anga. Akutsata milungu ina ndi kumayitumikira. Aisraeli ndi Ayuda aphwanya pangano limene ndinachita ndi makolo awo.
१०ते त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पापांकडे वळले आहेत. त्यांच्या पूर्वजांनी माझे ऐकण्याचे नाकारले. त्यांनी दुसऱ्या देवांचे अनुसरण केले. त्यांची पूजा केली. इस्राएल व यहूदाच्या वंशजांनी, त्यांच्या पूर्वजांनी माझ्याशी केलेल्या, कराराचा भंग केला आहे.”
11 Choncho Yehova akuti, ‘Ndidzawagwetsera mavuto amene sadzatha kuwalewa. Ngakhale adzandilirire, sindidzawamvera.
११म्हणून परमेश्वर म्हणतो, मी त्यांना भयंकर संकटात टाकीन, ज्यातून त्यांना सुटका करून घेता येणार नाही. तेव्हा ते मदतीसाठी माझा धावा करतील, पण मी त्यांचे ऐकणार नाही.
12 Anthu a mʼmizinda ya Yuda ndi anthu a ku Yerusalemu adzapita ndi kukalirira milungu imene ankayifukizira lubani, koma milunguyo sidzawathandiza ndi pangʼono pomwe mavuto akadzafika.
१२यहूदातील शहरे व यरूशलेममधील रहिवासी ज्यांना ते अर्पणे देत असत, आणि धूप जाळीत असत, असे ते त्यांच्या देवांकडे आरोळी करतील, पण त्या भयंकर संकटकाळी लोकांस मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.
13 Iwe Yuda, uli ndi milungu yochuluka ngati chiwerengero cha mizinda yako; chiwerengero cha maguwa ansembe amene umafukizirapo lubani kwa Baala chili ngati misewu ya mu Yerusalemu.’
१३कारण यहूदा तुझ्या नगरा इतकेच तुझे देव झाले आहेत, आणि तू लज्जास्पद बाल देवाच्या वेद्या, बाल देवाच्या धूप वेद्या, यरूशलेमामधल्या रस्त्यांच्या संख्येइतक्याच केल्या आहेत.
14 “Tsono iwe Yeremiya usawapempherere anthu amenewa ngakhale kuwadandaulira kapena kuwapepesera, chifukwa sindidzawamvera akadzandiyitana pa nthawi ya mavuto awo.
१४यिर्मया, तू या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस आणि त्यांच्यासाठी विनंती करु नकोस. कारण जेव्हा ते दु: खात माझा धावा करतील, तेव्हा मी त्यांचे ऐकणार नाही.
15 “Kodi anthu anga okondedwa akudzachita chiyani mʼNyumba yanga? Kodi suja iwowa amachita zoyipa zambiri? Kodi mungathe kupulumuka, tsoka osakugwerani chifukwa cha nsembe zanuzo?”
१५“माझ्या प्रिय लोकांनी, ज्यांनी इतके दुष्ट हेतू धरले आहेत, ते माझ्या घरात का आहेत? कारण तुझ्या अर्पणाचे मांस तुझा बचाव करु शकणार नाही, कारण तू वाईट केले आणि नंतर आनंद केला.”
16 Kale Yehova ankakutchani mtengo wa olivi wa masamba obiriwira, wokhala ndi zipatso zokongola. Koma tsopano adzawutentha ndi mkuntho wamkokomo ndipo nthambi zake zidzapserera.
१६“दिसावयास देखणे असणाऱ्या हिरव्यागार फळाचे जैतूनाचे झाड असे नाव परमेश्वराने तुला दिले होते. पण आता मोठ्या गर्जनेच्या आवाजासहित त्याने त्यावर अग्नी पेटवला आहे. आणि त्याच्या फांद्या तोडल्या आहेत.
17 Yehova Wamphamvuzonse, amene anakudzalani, walamula kuti mavuto akugwereni. Inu a banja la Yuda ndi a banja la Israeli munachitira Yehova zoyipa ndi kumukwiyitsa pamene munkapereka nsembe zanu kwa Baala.
१७कारण सेनाधीश परमेश्वर, ज्याने तुला लावले आहे, तो तुझ्या विरूद्ध अरिष्ट बोलला आहे. कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली. त्यांनी ‘बाल’ देवाला यज्ञ अर्पण केले म्हणून मला राग आला.”
18 Yehova anandiwululira ndipo ndinadziwa. Iye anatsekula maso anga kuti ndione chiwembu chawocho.
१८परमेश्वराने मला या गोष्टींचे ज्ञान दिले. म्हणून मला त्या समजल्या. परमेश्वरा, तू मला त्यांची कृत्ये दाखवली.
19 Ndinali ngati mwana wankhosa wofatsa amene akupita naye kukamupha; sindinkadziwa kuti chiwembu chimene ankakonzekeracho chinkaloza ine. Iwo amati: “Tiyeni timuphe munthu ameneyu kuti dzina lake lisadzakumbukiridwenso.”
१९ते माझ्याविरूद्ध योजना आखत आहेत हे मला माहीत नव्हते. मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्यास जीवंताच्या देशातून तोडून टाकू म्हणजे त्याचे नाव आठवणीत राहणार नाही.”
20 Koma, Inu Yehova Wamphamvuzonse, Inu amene mumaweruza molungama ndi kuyesa mitima ndi maganizo, lolani kuti ine ndione kuti mwawalipsira, pakuti mlandu wanga ndawupereka mʼmanja mwanu.
२०पण सेनाधीश परमेश्वर, जो तू सत्याने न्याय करतोस, जो तू हृदय व मन पारखतोस. तू त्यांच्यावर केलेला प्रतिकार मी साक्ष देईन, कारण मी आपला वाद तुझ्याजवळ उघड केला आहे.
21 “Nʼchifukwa chake Yehova akunena za anthu a ku Anatoti amene akufuna kuwononga moyo wako namanena kuti, ‘Usanenere mʼdzina la Yehova, ukatero ife tidzakupha ndi manja athu,’
२१अनाथोथच्या लोकांबद्दल परमेश्वर या गोष्टी म्हणतो, जे तुझा जीव घेण्यास पाहत आहेत. ते म्हणातात, “परमेश्वराच्या नावावर भविष्यकथन करु नकोस, नाहीतर आम्ही तुला आमच्या हाताने ठार करु.”
22 koma Yehova Wamphamvuzonse akuti, ‘Ine ndidzawalanga. Achinyamata awo adzaphedwa ndi lupanga, ana awo aamuna ndi aakazi adzafa ndi njala.
२२यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा! “त्यांना मी शिक्षा करीन. त्यांचे तरुण तलवारीने मरण पावतील. त्यांची मुले आणि त्यांच्या मुली दुष्काळाने मरतील.
23 Sipadzakhala otsala ndi mmodzi yemwe, chifukwa ndidzalanga anthu a ku Anatoti chikadzafika chaka chawo cha chilango.’”
२३त्यांच्यातील एकही मनुष्य शिल्लक राहणार नाही. कारण मी अनाथोथच्या लोकांवर वाईट, म्हणजे त्यांच्या शासनाचे वर्ष आणतो.”