< Luke 24 >
1 Ni bwu mble, ni vi mumla wu Sati'a, ba ye ni bubu ibe'a nda nji nnye wu bwa ni kmo, wandi bana ti'a.
१आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी मसाले आणले.
2 Ba to ndi ba nyi kikle tita wa ka nyu ibe rju.
२त्यांना धोंड कबरेवरुन लोटलेला आढळला.
3 Ba ri nimi nda toh ndi k'mo Bachi Yesu na he na.
३त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही.
4 A hye niki, ba ri he ni tsishishi ni tu kpe yi, ndji ha ba rju kri ni ba ni inklon wa zan pri me.
४यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले.
5 Niki mba-ba ba ti sissri nda kukru ni shishi mba ni meme, i ba tre ni mba-ba ndi, “Ngye du yi ni wa ndji wu vrhi nimi biwa ba qu ye'a?”
५तेव्हा अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मरण पावलेल्यांमध्ये का करता?
6 Ana he ni wayi na, ba nzu lunde ye. Rhimre ni tre ma niwa a rhi he ni Galili,
६तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा.
7 ndi ba guchi vu Vren Ndji nu ndji bi lah tre, ba gran ni kunkro, ni vi wu tra ani la lunde.
७ते असे की, “मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्यास वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.”
8 Imba ba ba tika itre ma,
८नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली.
9 nda kma don bubu ibe'a nda bla ni wlon don ri'a baba mbru ndji bari, wawu ikpi biyi ba
९त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले.
10 Niki, Maryamu Magdalin, Joanna, Maryamu iyi Yakubu, ni mba ba rima, mle, baka vu bla ni manzani ba.
१०त्या स्त्रिया मग्दालीया नगराची मरीया, योहान्ना आणि याकोबाची आई मरीया या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या.
11 Ama itre wa a bla bawu a rju choloncho ni manzani ba, i bana kpanyime ni mba-ba na.
११पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.
12 I Bitrus a lu kri vu tsu hi ni bubu be'a, nda ku dran nda ya mima. A to ba pri nklon wu kpa ma ba shii zini kosan. Bitrus a kma hi ni koh ma, nda ni rhimre ikpi wa ba he'a
१२पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्यास तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.
13 Ni vi baki, ndji ha ni mimba ba vu nko tayi ni vi gbu Emmawus, wandi a mili ttamgba ni mbru rji ni Urushelima.
१३त्याच दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरूशलेम शहरापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते.
14 Ba si tre ni kpamba nitu ikpi biwa ba si zren'a.
१४ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते.
15 Niwa basi tre nda ni mye kpamba, Yesu kima a ye nda si zren ni ba.
१५ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.
16 Shishi mba ana bwu du ba mla toh ka ahi nha na.
१६पण त्यांचे डोळे त्यास ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते.
17 Yesu a hla bawu ndi, Bi ki zren nini tre nitu ngye, hambiwu ni ton nkoh? Ba kma kuki nda kri ngbonme.
१७येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?” चालता चालता ते थांबले. ते अतिशय दुःखी दिसले.
18 Iri mba, ni nde Cleopas a sa niwu ndi, “Wu nklen me yi ni gbu Urushelima wuna toh ikpi wa basi zren ni vivi yi na?
१८त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्यास म्हणाला, “या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरूशलेम शहरात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”
19 Yesu a mye ba ndi, “ikpi bi rime?” Ba sa wu ndi, “Ikpi nitu Yesu wu Nazarat wandi ana Anabi kikle ni ndu, mba lan tre ni shishi Irji mba ni ndji wawu'u,
१९येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?” ते त्यास म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला.
20 Wawu yi kikle Prist, baba bi ninkon wu gbu'a ba vu nu du ba lo u wu qu nda klo ni giciye.
२०आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यास मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले आणि त्यांनी त्यास वधस्तंभी खिळले.
21 Kina yo suron ndi wawu yi ni ye kpa Israila chuwo. E, nha ni kima, a vi tra zizan wa ikpi biyi ba he.
२१आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत.
22 Ngari, mba bari, nimi mbu ba rju ni tre wa anuta sissri, nitu hi mba ni bubu ibe ni bwubwu mble.
२२आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हास आश्चर्यचकित केले आहे. आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या,
23 Ba hi ka toh ndi kmo ma na he na, nda kma ye si tre baka toh Maleka wa a hla bawu ndi a he ni sissren.
२३परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. त्यांनी येऊन आम्हास सांगितले की, त्यांना देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.
24 Ndji mbu bari ba hi ni bubu ibe nda ka to tsra ni kpe wa mbaba ba hla'a. Ama bana to'o na.
२४तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्यास पाहिले नाही.”
25 Yesu a hla bawu ndi, “Bi ruru ndji, bi si sron kpanyime ni kpe wa anabawa ba tre!
२५मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.
26 Ana bi zan du Kristi sha ya ikpe biyi rhi nda ri ni nzuhon ma na?”
२६ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?”
27 Niki rji ni Musa, zu ni anabawa wawu, Yesu a mla bla ni bawu ikpi nitu kpama nimi nvunvu tre Irji.
२७आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्टयापर्यंत सांगून, शास्त्रलेखात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले.
28 Ni ba tie whiwhre ni vi gbu wa bata hi niwu'a, Yesu a ti to ani zren hi guchi.
२८ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे.
29 Mle ba bre u ndi, “Son nita, yalu si tie, i ivi'a ti wiewiere wu kle ye. Mle Yesu a kpanyime nda ka son niba.
२९परंतु जास्त आग्रह करून ते म्हणाले, “आमच्याबरोबर राहा कारण संध्याकाळ झालीच आहे आणि दिवसही मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर रहावयास आत गेला.
30 Niwa a kuson nda ni rhi niba, a ban bredi'a, yo lulu niwu, nda nziga nu ba.
३०जेव्हा तो त्यांच्याबरोबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला.
31 Shishi mba a kri bwu i baka mla toh wu, wa kri kado ni shishi mba.
३१तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यास ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला.
32 Ba hla ni kpamba, “Suron mbu ana si'a gon ni mi-mbu niwa a si tre ni nkon, nda tsro ta nimi nvunvu tre Irji na?”
३२मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व शास्त्रलेखाचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”
33 Ba kri lunde ni ton kima nda vu nkon kma hi ni Urushelima. Ba ka ri ni wlon don ri ba, nda toh ba baba bi wa bana he ni ba'a,
३३मग ते लगेच उठले व यरूशलेम शहरास परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले.
34 nda hla ndi “A njanji, Bachi mbu lunde, nda tsro tuma ni Siman,”
३४प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभू उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”
35 Niki ba vu kpi wa ba toh ninkon mba wa ba mla toh Yesu ni andi a ban bredi si ga nuba a.
३५नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्यांना सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्यास कसे ओळखले ते सांगितले.
36 Niwa basi tre kpi biyi, Yesu kima, a rju kri ni mimba nda tre ndi, “Si suron son niyi.”
३६ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, “तुम्हास शांती असो.”
37 Ba ti gbri me i sissri a vu ba. Ba ban ndi ba toh ibrji ma mu.
३७ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत.
38 Yesu a hla bawu ndi, “A ngye du yi ni tie sissri? A hi ngye ni lo yi ni suron?
३८तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या?
39 Toh iwo mba iza mu. A hi me kimu. Sa wo nitu mu ni toh. Ibrji na he ni nma kpa mba ququ na wandi bisi to mi he niwu na.”
३९माझे हात व पाय पाहा तुम्हास मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भूताला नसते.”
40 Niwa a kle tre toyi a tsro ba iwo mba iza ma.
४०असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना.
41 Niki me, bana kpanyime na, nitu ngyiri ni sissri. Yesu a mye ba ndi, “Bi he ni ikpe wu rhi?”
४१तरी आनंदामुळे विश्वास न धरता आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?”
42 Ba nu vi lambe wa ba sron'a.
४२मग त्यांनी त्यास भाजलेला माशाचा तुकडा दिला.
43 Akpa nda rhi ni shishi mba.
४३त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला.
44 A hla bawu ndi, “Biyi yi ba lan tre mu, wandi mi hla ni yiwu niwa mi he ni yi, ndi ikpi wa ba nha ba ni nvunvu doka Musa baba anabawa ni Zabura ba wrhu he toki.
४४तो त्यांना म्हणाला, “याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हाबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे यामध्ये माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”
45 Alu bwu mre suron mba du ba mla to nvunvu tre Irji.
४५नंतर शास्त्रलेख समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.
46 A hla bawu ndi, toki ba nha ndi Kristi ni shaya nda lunde rji ni qu ni vi wu tra.
४६मग तो त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मरण पावलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे,
47 Kma suron wrhu ni la tre ni kpa wrehle lah tre ma. Hi bla ni ndi kagon ngbungblu rhi ni Urushelima, ni ndema.
४७आणि यरूशलेम शहरापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा घोषित करण्यात यावी.
48 Bi toh ikpi biyi ni shishi-mbi.
४८या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात.
49 Ya, mi si ton yi nitu ikpe wa Timu a rhentse ni tuma. Bi gben ni mi gbuyi nitu ba kayi ni nklon gbengblen rji ni shulu ri.
४९पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा.”
50 Niki Yesu a wrhu ni ba nda hi wiewiere ni Betani, nda nzu wo ma nda yo lulu ni bawu.
५०नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करून आशीर्वाद दिला.
51 Ni wa a ta yo lulu ni bawu, ba kri ban'u hi ni shulu.
५१तो आशीर्वाद देत असतानाच तोपर्यंत आकाशात घेतला गेला.
52 Mle ba ku nzu ndema, nda k'ma yi ni Urushelima kikle ngyiri.
५२नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरूशलेम शहरास परतले.
53 Ba si'a ki chachu ni tra Irji nda ni tie lulu niwu.
५३आणि ते परमेश्वराच्या भवनात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले.