< Luke 21 >

1 Yesu zu ya da toh indji bi nklen ba si sru baiko ba,
येशूने दृष्टी वर करून श्रीमंत लोकांस दानपेटीत दान टाकतांना पाहीले.
2 Wa a toh iwa u kbo ani tiya kpukpu me, wa ji bubu ba ye ka you ni kagi.
त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी म्हणजे एक दमडी टाकताना पाहिले.
3 A tre njanji mi hla yu'u, iwa u koh a zan yi.
तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले.
4 indji biyi ba yo ni mi gbugbu u ba. Naki iwa u koh ni miyah ma ayo wawu ikpe di a he niwu.
कारण या सर्वांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु हिने गरीब असूनही आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”
5 Bari ba tre ni tu tra Irji, yada ba mla tie bi ni tita ni baiko, A tre.
शिष्यातील काहीजण परमेश्वराच्या भवनाविषयी असे बोलत होते की, “ते सुंदर दगडांनी आणि अर्पणांनी सुशोभित केले आहे.” येशू म्हणाला,
6 Ikpi bi yi wa bi si toh, ivi ri ni ye wa tita ri na sun nitu ri na ba na grji ye ni meme'a na.
“असे दिवस येतील की, हे जे तुम्ही पाहता त्यांतून जो पाडून टाकला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही.”
7 Ba mye, mala, kpi biyi ba ye ni tan? A ngye ni tsro ta inton wa kpi'a ba ti'a?
त्यांनी त्यास प्रश्न विचारला, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?”
8 Yesu ka hla ni bawu, mla ya, na du indrjo ye gyru yi na, gbugbu ba ye ninde mu, da tre ndi ame yi me wawu, u inton a tie whewhre, na hu ba na.
येशू म्हणाला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि ‘तो मी आहे’ असे म्हणतील आणि ते म्हणतील, ‘वेळ जवळ आली आहे. त्यांच्यामागे जाऊ नका!’
9 Inde bi woh ba taku da ni tsi bi kana klu sissri na, ni mumla se kpi bi yi ba ye, u kle, gbugblu na ye zizan na.
जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.”
10 Wa a hla ni bawu, gbugblu ni lu ni tu gbugblu, mulki ni lu nitu mulki.
१०मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल.
11 Meme u gbugblu yi ani grju kagon, iyon ni tie ni gbugblu wawu, lilo ni ka gbugblu'a wawu. Ikpi bari ba grji rji shu da no sissri.
११मोठे भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.
12 Naki kpi biyi du ba ye, ba tsi yi da ti meme kpe ni yiwu, da zu yi ni tra Irji, ba vu yi sru ni brusuna, ba gbi yi hi ni ba chu, baba ngona, nitu inde mu.
१२परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हास सभास्थानासमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हास राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील.
13 Ani he ijou tre.
१३यामुळे तुम्हास माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल.
14 Na ri mre kpi wa bi tre ni koshi na,
१४तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही अशी मनाची तयारी करा,
15 Me mi no yi trre wa bi tre, di no imrre ndindi wa bi kra yi banaya krie ni yi na.
१५कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही.
16 Ba ti bi, mri vayi, mla bi baba kpukpa bi ba tiyi yah da wu bari bi.
१६परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हापैकी काही जणांना ठार मारतील.
17 Ndji ba wawu bbawu ba kran yi ni tu inde mu.
१७माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील.
18 Naki ko futu riri ni tubi na joku na.
१८परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही.
19 Ni mi vu suron bi bi kpa re bi.
१९तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवून घ्याल.
20 I hi toh soja ba kru wurushelima you ni tsutsu, bika toh ndi joku ma tie whewhre.
२०तुम्ही जेव्हा यरूशलेम शहरास सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हास कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे.
21 Biwa ba he ni Judiya du ba tsutsu hi ni gblu u bi wa ba he ni mi gbu ba ka don gbu'a u bi wa ba he ni ko rah gbu'a baka ba ri nimi gbu'a na.
२१जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये.
22 Bi yi ba vi u rju hla, du kpe wa ba han duba kle.
२२ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत.
23 Iyah ba bi wa ba hei ne, ni bi no mri sisan ni toh kima, iya nihe ni gbu'a ni nfu ni tu ndji ba.
२३त्या दिवसात ज्या गरोदर स्त्रिया आहेत व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर क्रोध येईल.
24 Inji gban ni kaba hle, ba vu ba kma tie gran ni gbungblu, biwa bana toh Irji na ba chan Wurushelima ni zah, se ivi u bi wa bana toh Irji na nikle
२४ते तलवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना कैद करून राष्ट्रांत नेतील आणि परराष्ट्रीय लोकांचा काळ संपेपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेम शहरास पायाखाली तुडवतील.
25 Igban ni tsro ni Irji, ni wha kpan baba tsitsen, ni meme. Iya ni shu ni gbungblu, ni wrji kpukpa don yi man ni ne.
२५सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील.
26 Indji ba tie sissri da ta kukmo da ni gbie kpe wa basi ye ni gbungblu, gbengblen bi shu ba ta chu.
२६भीतीमुळे व जगावर कोसळणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मरणोन्मुख होतील व आकाशातील बळे डळमळतील.
27 U ba toh vren ndji ni ye ni mi kpalu ni gbengblen ni kikle daukaka ma.
२७नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने ढगांत येताना पाहतील.
28 Inde kpi bi yi basi ye, lunde krikrie ni nzu tumbi. Du ndji wa ni ye kpa yi chuwo a ye whewhre.
२८परंतु या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा आणि तुमचे डोके वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”
29 Yesu tre nda ka yiyi ni bawu, yah kunkro indhu baba mbru kunkro ba.
२९नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “अंजिराचे झाड व इतर दुसऱ्या झाडांकडे पाहा.
30 Biyi ni tu bi bika toh ndi iga ati whewhre.
३०त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे.
31 Inde bi toh kpe biyi ba he na yi bi toh ndi iye Irji a tie whiwhre.
३१त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे.
32 Njanji mi hla ni yiwu, i zan bi bana kle na se kpi bi yi ba ye.
३२मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
33 Shulu ni meme ba kle, ama itre ma na kle na.
३३आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही.
34 Sun ni ya cheme, na du suron mbi ni titan hi na so di wah du na he ni mre u tu mbina kana ye ka yi na troko na.
३४परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा, दारुबाजी आणि अधाशीपणा व या हल्लीच्या जीवनासंबंधीच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊ नये, तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल.
35 A ni ye ni tu ndji bi gbungblu wawu
३५खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोकांवर येईल.
36 Sun ni wri di ta bre chachu du yi he ni gbengblen ndi nawo ni kpi bi wa ba ye'a, wa bi kri ni kbu Vren Indji
३६यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा.”
37 Ni nton kima, a si hla tre ni bawu ni tra Irji, ka rju nichu da ka sun ni bubu ri wa ba you ndi Olivet.
३७प्रत्येक दिवशी तो परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असे आणि रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर राहत असे.
38 Indji ba rju gbugbun ni bubu ble ye ni woh wu ni tra Irji.
३८सर्व लोक भवनात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे येत असत.

< Luke 21 >