< عَدَد 6 >
وَقَالَ الرَّبُّ لِمُوسَى: | ١ 1 |
१परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
«أَوْصِ بَنِي إِسْرَائِيلَ وَقُلْ لَهُمْ: أَيُّ رَجُلٍ أَوِ امْرَأَةٍ تَعَهَّدَ بِنَذْرٍ خَاصٍّ يَتَنَسَّكُ فِيهِ لِلرَّبِّ، | ٢ 2 |
२इस्राएल लोकांशी बोल. त्यांना सांग, जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री आपणास परमेश्वरासाठी वेगळे होऊन नाजीराचा विशेष नवस करील,
فَلْيَمْتَنِعْ عَنِ الْخَمْرِ وَالْمُسْكِرِ، وَلا يَشْرَبْ خَلَّ الْخَمْرِ وَلا خَلَّ الْمُسْكِرِ أَوْ نَقِيعَ الْعِنَبِ، وَلا يَأْكُلْ عِنَباً رَطْباً وَلا يَابِساً. | ٣ 3 |
३त्याने मद्य किंवा मादक द्रव्यापासून दूर रहावे. त्याने मद्यापासून केलेला शिरका किंवा मादक पेय पिऊ नये. त्याने द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये किंवा ताजी द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत.
لَا يَذُقْ كُلَّ أَيَّامِ نَذْرِهِ شَيْئاً مِنْ نِتَاجِ الْكَرْمَةِ حَتَّى بُذُورِ الْعِنَبِ وَقِشْرِهِ. | ٤ 4 |
४तो माझ्यासाठी वेगळा झाला त्या सर्व दिवसात, त्याने द्राक्षापासून केलेली प्रत्येक गोष्ट, जी बियापासून ते सालपटापर्यंत समाविष्ट आहे काहीच खाऊ नये.
وَلا يَحْلِقْ رَأْسَهُ طَوَالَ مُدَّةِ نَذْرِهِ إِلَى أَنْ تَتِمَّ الأَيَّامُ الَّتِي نَذَرَ فِيهَا نَفْسَهُ لِلرَّبِّ، لأَنَّهُ مُقَدَّسٌ، فَعَلَيْهِ أَنْ يُرْخِيَ خُصَلَ شَعْرِ رَأْسِهِ. | ٥ 5 |
५त्याने परमेश्वरासाठी वेगळे राहण्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्याच्या नवसाच्या दिवसापर्यंत त्याच्या डोक्यावर वस्तऱ्याचा उपयोग करू नये. तो देवासाठी वेगळा केला आहे. त्याने आपल्या डोक्याचे केस लांब वाढू द्यावेत.
لَا يَقْرُبْ جَسَدَ مَيْتٍ كُلَّ أَيَّامِ نَذْرِهِ لِلرَّبِّ. | ٦ 6 |
६त्याने आपल्या स्वतःला परमेश्वरासाठी वेगळे केलेल्या सर्व दिवसात, त्याने प्रेताजवळ जाऊ नये.
سَوَاءٌ كَانَ الْمَيْتُ أَبَاهُ أَمْ أُمَّهُ أَمْ أَخَاهُ أَمْ أُخْتَهُ فَلا يَتَنَجَّسْ مِنْ أَجْلِهِمْ عِنْدَ مَوْتِهِمْ، لأَنَّ رَمْزَ نُسْكِ إِلَهِهِ عَلَى رَأْسِهِ. | ٧ 7 |
७त्याच्या स्वत: चा बाप, आई, भाऊ किंवा बहीण जर कोणी मरण पावले तर त्यांच्याकरिता अशुद्ध होऊ नये. कारण तो देवासाठी वेगळा केलेला आहे, जसे प्रत्येकजण त्याच्या डोक्यावरील लांब केस पाहतील.
وَيَكُونُ كُلَّ أَيَّامِ نَذْرِهِ مُقَدَّساً لِلرَّبِّ. | ٨ 8 |
८आपल्या वेगळे राहण्याच्या सर्व दिवसात तो परमेश्वरासाठी पवित्र, राखीव आहे.
وَإذَا تَنَجَّسَ شَعْرُ انْتِذَارِهِ عَلَى أَثَرِ مَوْتِ أَحَدٍ عِنْدَهُ بَغْتَةً، يَحْلِقُ شَعْرَهُ بَعْدَ ذَلِكَ بِسَبْعَةِ أَيَّامٍ فَيَطْهُرُ. | ٩ 9 |
९जर कोणी अचानक त्याच्याजवळ मरण पावला आणि त्याने वेगळा केलेला मनुष्य अशुद्ध झाला, तर त्याने आपल्या शुद्धीकरण्याच्या दिवशी डोक्याचे मुंडण करावे, म्हणजे ते सातव्या दिवसानंतर करावे. तेव्हा त्याने आपले डोके मुंडावे.
ثُمَّ فِي الْيَوْمِ الثَّامِنِ يَأْتِي بِيَمَامَتَيْنِ أَوْ فَرْخَيْ حَمَامٍ إِلَى الْكَاهِنِ عِنْدَ مَدْخَلِ خَيْمَةِ الاجْتِمَاعِ. | ١٠ 10 |
१०आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी याजकाकडे आणावीत.
فَيُقَدِّمُ الْكَاهِنُ أَحَدَهُمَا ذَبِيحَةَ خَطِيئَةٍ وَالآخَرَ مُحْرَقَةً، وَيُكَفِّرُ عَنْهُ خَطِيئَتَهُ لِوُجُودِهِ أَمَامَ جُثَّةِ مَيْتٍ، وَيُقَدِّسُ رَأْسَهُ فِي ذَلِكَ الْيَوْمِ بِعَيْنِهِ. | ١١ 11 |
११मग याजकाने एक पक्षी पापार्पण व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे त्याच्यासाठी प्रायश्चित आहे कारण प्रेताजवळ जाऊन त्याने पाप केले. त्याने त्याच दिवशी आपल्या स्वतःला पुन्हा पवित्र करावे.
وَلا تُحْسَبُ لَهُ أَيَّامُ نَذْرِهِ الَّتِي سَبَقَتْ تَنْجِيسَهُ بِسَبَبِ الْمَيْتِ، وَعَلَيْهِ أَنْ يَبْدَأَ عَدَّ أَيَّامِ فَتْرَةِ نَذْرِهِ مِنْ جَدِيدٍ، وَيَأْتِيَ بِحَمَلٍ حَوْلِيٍّ وَيُقَدِّمَهُ ذَبِيحَةَ إِثْمٍ. | ١٢ 12 |
१२त्याने परमेश्वरासाठी वेगळे होण्यासाठी स्वत: ला पुन्हा समर्पित करावे. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा. त्याने आपल्याला अशुद्ध करून घेण्याच्या पूर्वीचे दिवस मोजू नयेत. कारण तो देवासाठी वेगळा झाला तेव्हा तो अशुद्ध झाला होता.
وَهَذِهِ هِيَ شَرِيعَةُ النَّذِيرِ عِنْدَمَا يَسْتَوْفِي أَيَّامَ نَذْرِهِ: يَأْتِي إِلَى مَدْخَلِ خَيْمَةِ الاجْتِمَاعِ، | ١٣ 13 |
१३मग त्याच्या नाजीरपणाच्या नवसाचे दिवस पूर्ण झाल्यावर त्यास दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आणावे.
فَيُقَدِّمُ قُرْبَانَهُ لِلرَّبِّ حَمَلاً حَوْلِيًّا، بِلا عَيْبٍ، لِيَكُونَ مُحْرَقَةً، وَنَعْجَةً حَوْلِيَّةً، صَحِيحَةً، لِتَكُونَ ذَبِيحَةَ خَطِيئَةٍ، وَكَبْشاً سَلِيماً لِيَكُونَ ذَبِيحَةَ سَلامَةٍ. | ١٤ 14 |
१४त्याने आपले अर्पण परमेश्वरास भेट द्यावे. त्याने होमबलि म्हणून एक वर्षाचा व दोषहीन मेंढा अर्पावा. त्याने पापबलि म्हणून एक वर्षाची व दोषहीन मेंढी अर्पावी, त्याने शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा आणावा.
فَضْلاً عَنْ سَلٍّ مِنْ كَعْكِ فَطِيرٍ مَعْجُونٍ بِزَيْتٍ، وَرِقَاقٍ غَيْرِ مُخْتَمِرَةٍ مَدْهُونَةٍ بِالزَّيْتِ مَعَ تَقْدِمَةِ دَقِيقٍ وَخَمْرٍ. | ١٥ 15 |
१५त्याने तेलात मळलेल्या मैद्याच्या एक टोपलीभर बेखमीर भाकरीसुद्धा आणाव्या व तेल लावलेले बेखमीर पापड त्याबरोबर त्यांचे अन्नार्पणे व पेयार्पणे आणावीत.
فَيُقَدِّمُهَا الْكَاهِنُ أَمَامَ الرَّبِّ ذَبِيحَةَ خَطِيئَتِهِ وَمُحْرَقَتَهُ. | ١٦ 16 |
१६याजकाने ती परमेश्वरापुढे सादर करावी. त्याने त्याचे पापार्पण व होमार्पण परमेश्वरास अर्पावेत;
ثُمَّ يُقَرِّبُ كَبْشَ ذَبِيحَةِ السَّلامِ مَعَ سَلِّ كَعْكِ الْفَطِيرِ. وَأَخِيراً يَرْفَعُ الْكَاهِنُ تَقْدِمَةَ الدَّقِيقِ وَالْخَمْرَ. | ١٧ 17 |
१७त्याने बेखमीर भाकरीच्या टोपलीबरोबर, परमेश्वराकरता शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी मेंढा सादर करावा. याजकाने अन्नार्पण व पेयार्पणही सादर करावी.
ثُمَّ يَحْلِقُ النَّذِيرُ شَعْرَ انْتِذَارِهِ عِنْدَ مَدْخَلِ خَيْمَةِ الاجْتِمَاعِ، وَيُحْرِقُهُ عَلَى نَارِ ذَبِيحَةِ السَّلامِ. | ١٨ 18 |
१८मग नाजीराने आपण देवासाठी वेगळे झालेल्याचे चिन्ह म्हणून दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आपल्या डोक्याचे मुंडण करावे. त्याने त्याच्या डोक्यापासूनचे केस घ्यावे आणि शांत्यर्पणाच्या यज्ञाखाली अग्नी आहे त्याच्यावर ठेवावेत.
ثُمَّ يَأْخُذُ الْكَاهِنُ كَتِفَ الْكَبْشِ بَعْدَ سَلْقِهِ، وَكَعْكَةَ فَطِيرٍ وَاحِدَةً وَرِقَاقَةً وَاحِدَةً. وَيَضَعُهَا بَيْنَ يَدَيِ النَّذِيرِ بَعْدَ حَلْقِهِ شَعْرَ انْتِذَارِهِ. | ١٩ 19 |
१९नाजीराने आपण वेगळेपणाचे असलेले चिन्ह म्हणजे त्याने डोक्याचे मुंडण केल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजविलेला फरा, टोपलीतून एक बेखमीर भाकर व एक बेखमीर पापड घेऊन त्याच्या हातावर ठेवावी.
وَيُرَجِّحُهَا الْكَاهِنُ أَمَامَ الرَّبِّ، فَتَكُونُ نَصِيباً مُقَدَّساً لِلْكَاهِنِ مَعَ صَدْرِ التَّرْجِيحِ وَسَاقِ الذَّبِيحَةِ. وَبَعْدَ ذَلِكَ يَشْرَبُ النَّذِيرُ خَمْراً. | ٢٠ 20 |
२०मग याजकाने ते अर्पणाप्रमाणे परमेश्वरासमोर उंच करून त्यास सादर करावे. जे मेंढ्याचे ऊर व मांडीसह एकत्रित परमेश्वरापुढे उंच केलेले हे याजकासाठी राखून ठेवलेले पवित्र अन्न आहे. त्यानंतर नाजीर मद्य पिऊ शकतो.
هَذِهِ هِيَ شَرِيعَةُ النَّذِيرِ الَّذِي يَنْذُرُ تَقْدِمَةً لِلرَّبِّ وَقْتَ نُسْكِهِ، فَضْلاً عَنْ تَقْدِمَاتِهِ الطَّوْعِيَّةِ الَّتِي يَبْذُلُهَا. وَعَلَيْهِ أَنْ يَفِيَ بِمَا نَذَرَ حَسَبَ شَرِيعَةِ انْتِذَارِهِ». | ٢١ 21 |
२१“जो कोणी नाजीर आपल्या वेगळेपणाचा परमेश्वरास अर्पण करण्याचा नवस करतो त्याचा नियम हा आहे. जे काही तो देईल, त्याने आपण घेतलेल्या शपथेचे बंधन पाळावे, तो जो नवस करतो त्या त्याच्या नाजीरपणासाठी दर्शविलेल्या नियमाप्रमाणे केले पाहिजे.”
وَقَالَ الرَّبُّ لِمُوسَى: | ٢٢ 22 |
२२पुन्हा परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला,
«أَوْصِ هَرُونَ وَأَبْنَاءَهُ قَائِلاً: هَذَا مَا يُبَارِكُونَ بِهِ بَنِي إِسْرَائِيلَ قَائِلِينَ لَهُمْ: | ٢٣ 23 |
२३अहरोन व त्याच्या मुलांशी बोल. म्हण, तू इस्राएल लोकांस ह्याप्रमाणे आशीर्वाद द्या. तुम्ही त्यांना म्हणावे.
يُبَارِكُكَ الرَّبُّ وَيَحْرُسُكَ. | ٢٤ 24 |
२४परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो.
يُضِيءُ الرَّبُّ بِوَجْهِهِ عَلَيْكَ وَيَرْحَمُكَ. | ٢٥ 25 |
२५परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो, तुझ्याकडे पाहो व तुजवर दया करो.
يَلْتَفِتُ الرَّبُّ بِوَجْهِهِ إِلَيْكَ وَيَمْنَحُكَ سَلاماً. | ٢٦ 26 |
२६परमेश्वर आपल्या प्रसन्नमुखासह तुजकडे पाहो व तुला शांती देवो.
وَهَكَذَا يَجْعَلُونَ اسْمِي عَلَى بَنِي إِسْرَائِيلَ وَأَنَا أُبَارِكُهُمْ». | ٢٧ 27 |
२७याप्रमाणे त्यांनी माझे नाव इस्राएल लोकांस द्यावे. मग मी त्यांना आशीर्वाद देईन.