< عَدَد 30 >

وَقَالَ مُوسَى لِقَادَةِ أَسْبَاطِ بَنِي إِسْرَائِيلَ: «إِلَيْكُمْ مَا أَمَرَ بِهِ الرَّبُّ: ١ 1
मोशे इस्राएलाच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. तो म्हणाला, परमेश्वराने जी काही आज्ञा दिली ती ही आहे.
إِذَا نَذَرَ رَجُلٌ نَذْراً لِلرَّبِّ، أَوْ أَقْسَمَ أَنْ يَلْتَزِمَ بِأَمْرٍ مَا، فَعَلَيْهِ أَنْ يَفِيَ بِكَلامِهِ وَيُنَفِّذَ كُلَّ مَا تَعَهَّدَ بِهِ. ٢ 2
जर एखाद्याने परमेश्वरास नवस केला किंवा शपथपूर्वक स्वतःला वचनाने बंधन घालून घेतले तर त्याने ते मोडू नये. जे त्याच्या मुखातून निघाले ते सर्व वचने त्याने पाळावे.
وَلَكِنْ إِذَا نَذَرَتْ صَبِيَّةٌ نَذْراً لِلرَّبِّ وَأَلْزَمَتْ نَفْسَهَا بِأَمْرٍ، وَهِيَ مَا بَرِحَتْ فِي بَيْتِ أَبِيهَا، ٣ 3
एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात राहत असेल आणि तिने परमेश्वरास खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल.
وَسَمِعَ أَبُوهَا مَا نَذَرَتْهُ أَوْ تَعَهَّدَتْ بِهِ، وَسَكَتَ، فَإِنَّهَا تَكُونُ مُلْزَمَةً بِكُلِّ نُذُورِهَا وَتَعَهُّدَاتِهَا. ٤ 4
जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
وَلَكِنْ إِنْ مَنَعَهَا أَبُوهَا عِنْدَ سَمَاعِهِ مَا نَذَرَتْ أَوْ تَعَهَّدَتْ بِهِ، فَإِنَّهَا لَا تَكُونُ مُلْزَمَةً بِالإِيفَاءِ، وَالرَّبُّ يَصْفَحُ عَنْهَا لأَنَّ أَبَاهَا قَدْ مَنَعَهَا. ٥ 5
पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. परमेश्वर तिला क्षमा करील.
وَإذَا تَزَوَّجَتْ بَعْدَ أَنْ نَذَرَتْ أَوْ تَعَهَّدَتْ بِمَا أَلْزَمَتْ بِهِ نَفْسَهَا، ٦ 6
आणि ती नवऱ्याकडे असता जर तिचे नवस असले किंवा ज्याकडून तिच्या वडिलांनी तिला मना केले म्हणून परमेश्वर तिला माफ करील.
ثُمَّ عَرَفَ زَوْجُهَا بِنُذُورِهَا فَسَكَتَ عَنْهَا، تُصْبِحُ مُلْزَمَةً بِها. ٧ 7
तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या स्त्रीने वचनाची पूर्तता करावी.
وَإِنْ مَنَعَهَا زَوْجُهَا عِنْدَ مَعْرِفَتِهِ بِنُذُورِهَا، فَإِنَّ مَا تَعَهَّدَتْ بِهِ وَأَلْزَمَتْ نَفْسَهَا بِهِ يُصْبِحُ لاغِياً، وَالرَّبُّ يَصْفَحُ عَنْهَا. ٨ 8
पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाहीतर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले. तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
وَأَمَّا نَذْرُ الأَرْمَلَةِ وَالْمُطَلَّقَةِ فَكُلُّ مَا تَعَهَّدَتْ بِهِ يَثْبُتُ عَلَيْهَا. ٩ 9
विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वरास वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
إِنْ نَذَرَتِ امْرَأَةٌ مُتَزَوِّجَةٌ أَوْ أَقْسَمَتْ أَنْ تَلْتَزِمَ بِأَمْرٍ، وَهِيَ مَا بَرِحَتْ فِي بَيْتِ زَوْجِهَا، ١٠ 10
१०आणि जर लग्न झालेल्या स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहत असता परमेश्वरास काही नवस केला असेल,
وَسَمِعَ زَوْجُهَا وَلَمْ يَعْتَرِضْ، تُصْبِحُ مُلْزَمَةً بِكُلِّ نُذُورِهَا وَبِكُلِّ مَا تَعَهَّدَتْ بِهِ. ١١ 11
११तिच्या नवऱ्याने ते ऐकून काही बोलला नाही आणि ते पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिचे नवस कायम राहतील.
وَلَكِنْ إِنْ أَبْطَلَ زَوْجُهَا نُذُورَهَا عِنْدَ مَعْرِفَتِهِ بِها، فَإِنَّ كُلَّ مَا تَعَهَّدَتْ بِهِ مِنْ نُذُورٍ، أَوْ مَا أَلْزَمَتْ بِهِ نَفْسَهَا، يُصْبِحُ لاغِياً، لأَنَّ زَوْجَهَا قَدْ أَبْطَلَ نُذُورَهَا، وَالرَّبُّ يَصْفَحُ عَنْهَا. ١٢ 12
१२पण जर तिच्या नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि त्याने तिला त्याप्रमाणे करण्याची परवानगी दिली नाहीतर तिने वचनाप्रमाणे वागण्याची गरज नाही. तिने काय वचन दिले होते त्यास महत्व नाही. तिचा पती वचन मोडू शकतो. तिच्या नवऱ्याने वचन मोडले तर परमेश्वर तिला क्षमा करील.
كُلُّ نَذْرٍ وَكُلُّ تَعَهُّدٍ مُلْزِمٍ بِقَمْعِ النَّفْسِ، فَزَوْجُهَا يُثْبِتُهُ، وَزَوْجُهَا يُبْطِلُهُ. ١٣ 13
१३लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वरास काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल.
وَلَكِنْ إِنْ لَمْ يَعْتَرِضْ زَوْجُهَا خِلالَ يَوْمٍ مِنْ مَعْرِفَتِهِ بِهِ، فَقَدْ أَثْبَتَ عَلَيْهَا كُلَّ نُذُورِهَا وَتَعَهُّدَاتِهَا، لأَنَّهُ لَمْ يَعْتَرِضْ عَلَيْهَا عِنْدَ مَعْرِفَتِهِ بِها. ١٤ 14
१४पती यापैकी कोणत्याही वचनाला मनाई करु शकतो. किंवा त्यापैकी कोणत्याही वचनाची पूर्णता करण्याची परवानगी तो देऊ शकतो.
وَلَكِنْ إِنْ أَبْطَلَ نُذُورَهَا بَعْدَ ذَلِكَ، فَإِنَّهُ يَحْمِلُ عِقَابَ ذَنْبِهَا». ١٥ 15
१५पण त्याने ऐकल्यानंतर पुढे ती रद्द केली तर त्याच्या स्त्रीच्या अपराधांची शिक्षा त्याने भोगावी.
هَذِهِ هِيَ الْفَرَائِضُ الَّتِي أَمَرَ بِها الرَّبُّ مُوسَى بِشَأْنِ نُذُورِ الأُنْثَى، الْخَاصَّةُ بِالزَّوْجِ وَزَوْجَتِهِ، وَالأَبِ وَابْنَتِهِ الصَّبِيَّةِ الَّتِي مَا بَرِحَتْ مُقِيمَةً فِي بَيْتِهِ. ١٦ 16
१६परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. एक पुरुष आणि त्याची पत्नी यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत.

< عَدَد 30 >