< 1 أخبار 7 >

وَأَنْجَبَ يَسَّاكَرُ أَرْبَعَةَ أَبْنَاءَ، هُمْ: تُولاعُ وَفُوَّةُ وَيَاشُوبُ وَشِمْرُونُ. ١ 1
इस्साखारला चार पुत्र होते. त्यांची नावे अशी, तोला, पुवा, याशूब आणि शिम्रोन.
وَأَبْنَاءُ تُولاعَ هُمْ: عُزِّي وَرَفَايَا وَيَرِيئِيلُ وَيَحَمَايُ وَيِبْسَامُ وَشَمُوئِيلُ. وَهَؤُلاءِ كَانُوا رُؤَسَاءَ الْعَائِلاتِ الَّتِي تَفَرَّعَتْ مِنْ أَبِيهِمْ تُولاعَ: وَهُمْ مُحَارِبُونَ أَشِدَّاءُ وَقَدْ بَلَغَ عَدَدُ ذُرِّيَّتِهِمْ فِي أَيَّامِ الْمَلِكِ دَاوُدَ اثْنَيْنِ وَعِشْرِينَ أَلْفاً وَسِتَّ مِئَةٍ. ٢ 2
उज्जी, रफाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे पुत्र. आपापल्या पित्याच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या दिवसापर्यंत बावीस हजार सहाशें इतकी झाली.
وَأَنْجَبَ عُزِّي يَزْرَحْيَا الَّذِي وُلِدَ لَهُ خَمْسَةُ أَبْنَاءَ، هُمْ: مِيخَائِيلُ وَعُوبَدْيَا وَيُوئِيلُ وَيِشِّيَّا، وَكُلُّهُمْ رُؤُوسُ عَائِلاتٍ. ٣ 3
इज्रह्या हा उज्जीचा पुत्र. मीखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे पाच पुत्र. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.
وَقَدْ أَكْثَرَ نَسْلُهُمْ مِنَ الزَّوَاجِ بِنِسَاءٍ كَثِيرَاتٍ، فَأَنْجَبُوا عَدَداً غَفِيراً مِنَ الأَبْنَاءِ، فَكَانَ عَدَدُهُمْ بِحَسَبِ انْتِمَائِهِمْ لِعَائِلاتِهِمْ سِتَّةً وَثَلاثِينَ أَلْفاً مِنَ الْمُنْخَرِطِينَ فِي سِلْكِ الْجَيْشِ. ٤ 4
त्यांच्या घराण्यात छत्तीस हजार सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते. कारण त्यांच्या स्त्रिया आणि पुत्र पुष्कळ होते.
أَمَّا جُمْلَةُ الْمُجَنَّدِينَ مِنْ سَائِرِ عَائِلاتِ سِبْطِ يَسَّاكَرَ وَعَشَائِرِهَا فَسَبْعَةٌ وَثَمَانُونَ أَلْفاً مِنَ الْمُحَارِبِينَ الأَشِدَّاءِ. ٥ 5
इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं हजार लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते.
وَأَنْجَبَ بَنْيَامِينُ ثَلاثَةَ أَبْنَاءَ، هُمْ: بَالَعُ وَبَاكَرُ وَيَدِيعَئِيلُ. ٦ 6
बन्यामीनाला तीन पुत्र होते. बेला, बेकर आणि यदीएल.
وَأَنْجَبَ بَالَعُ خَمْسَةَ أَبْنَاءَهُمْ: أَصْبُونُ وَعُزِّي وَعَزِّيئِيلُ وَيَرِيمُوثُ وَعَيْرِي. وَقَدْ أَصْبَحُوا رُؤَسَاءَ لِعَشَائِرِهِمْ وَمَا تَفَرَّعَ عَنْهَا مِنْ عَائِلاتٍ، بَلَغُوا فِي جُمْلَتِهِمِ اثْنَيْنِ وَعِشْرِينَ أَلْفاً وَأَرْبَعَةً وَثَلاثِينَ مِنَ الْمُحَارِبينَ الأَشِدَّاءِ حَسَبَ سِجِلاتِ الأَنْسَابِ. ٧ 7
बेलाला पाच पुत्र होते. एस्बोन, उज्जी, उज्जियेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात बावीस हजार चौतीस सैनिक होते.
أَمَّا أَبْنَاءُ بَاكَرَ فَهُمْ: زَمِيرَةُ وَيُوعَاشُ وَأَلِيعَزَرُ وَأَلْيُوعِينَايُ وَعُمْرِي، وَيَرِيمُوثُ وَأَبِيَّا وَعَنَاثُوثُ وَعَلامَثُ، وَجَمِيعُهُمْ أَبْنَاءُ بَاكَرَ. ٨ 8
जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेरचे पुत्र.
وَقَدْ بَلَغَ عَدَدُهُمْ وَفْقاً لاِنْتِمَائِهِمْ لِعَشَائِرِهِمْ وَعَائِلاتِهِمْ عِشْرِينَ أَلْفاً وَمِئَتَيْنِ مِنَ الْمُحَارِبِينَ الأَشِدَّاءِ حَسَبَ مَا وَرَدَ فِي سِجِلاتِ الأَنْسَابِ. ٩ 9
आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. वीस हजार दोनशे सैनिक होते.
وَأَنْجَبَ يَدِيعَئِيلُ بَلْهَانَ الَّذِي وَلَدَ يَعِيشَ وَبَنْيَامِينَ وَأَهُودَ وَكَنْعَنَةَ وَزَيْتَانَ وَتَرْشِيشَ وَأَخِيشَاحَرَ. ١٠ 10
१०यदीएलचा पुत्र बिल्हान. बिल्हानचे पुत्र, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
وَجَمِيعُهُمْ رُؤُوسُ عَشَائِرَ تَفَرَّعَتْ مِنْ يَدِيعَئِيلَ. وَقَدْ بَلَغَ عَدَدُ ذُرِّيَّتِهِمْ سَبْعَةَ عَشَرَ أَلْفاً وَمِئَتَيْنِ مِنَ الْمُحَارِبِينَ الأَشِدَّاءِ الْمُجَنَّدِينَ فِي الْجَيْشِ. ١١ 11
११यदीएलचे पुत्र हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते.
وَأَنْجَبَ عَيْرُ شُفِّيمَ وَحُفِّيمَ، كَمَا وُلِدَ لِعَيْرَ حُوشِيمُ. ١٢ 12
१२शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम.
وَأَنْجَبَ نَفْتَالِي ابْنُ بِلْهَةَ، مَحْظِيَّةِ يَعْقُوبَ، يَحْصِيئِيلَ وَجُونِي وَيَصَرَ وَشَلُّومَ. ١٣ 13
१३यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे पुत्र. हे सर्व बिल्हेचे वंशज.
وَأَنْجَبَ مَنَسَّى مِنْ مَحْظِيَّتِهِ الأَرَامِيَّةِ ابْنَيْنِ، هُمَا: إِشْرِيئِيلُ وَمَاكِيرُ وَالِدُ جِلْعَادَ. ١٤ 14
१४मनश्शेचे पुत्र, अस्रियेल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादाचा पिता.
وَتَزَوَّجَ مَاكِيرُ مِنْ أُخْتِ حُفِّيمَ وَشُفِّيمَ وَتُدْعَى مَعْكَةَ وَكَانَ اسْمُ ابْنِ مَاكِيرَ الثَّانِي صَلُفْحَادَ، وَلَمْ يُنْجِبْ سِوَى بَنَاتٍ. ١٥ 15
१५हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका स्त्रीशी माखीरने लग्न केले. त्या बहिणीचे नाव माका होते. मनश्शेच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्यास फक्त कन्याच होत्या.
وَوَلَدَتْ مَعْكَةُ زَوْجَةُ مَاكِيرَ ابْنَيْنِ دَعَتْ أَحَدَهُمَا فَرَشَ وَالثَّانِي شَارَشَ، وَأَنْجَبَ فَرَشُ ابْنَيْنِ، هُمَا: أُولامُ وَرَاقَمُ. ١٦ 16
१६माखीरची पत्नी माका हिला पुत्र झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे पुत्र ऊलाम आणि रेकेम.
وَكَانَ لأُولامَ ابْنٌ يُدْعَى بَدَانَ. هَؤُلاءِ هُمْ ذُرِّيَّةُ جِلْعَادَ بْنِ مَاكِيرَ بْنِ مَنَسَّى. ١٧ 17
१७ऊलामचा पुत्र बदान. हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनश्शेचा पुत्र.
وَأَنْجَبَتْ هَمُّولَكَةُ أُخْتُ مَاكِيرَ إِيشْهُودَ وَأَبِيعَزَرَ وَمَحْلَةَ. ١٨ 18
१८माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे पुत्र झाले.
وَكَانَ لِشَمِيدَاعَ أَرْبَعَةُ أَبْنَاءَهُمْ: أَخِيَانُ، وَشَكِيمُ، وَلِقْحِي وَأَنِيعَامُ. ١٩ 19
१९अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे पुत्र.
وَأَنْجَبَ أَفْرَايِمُ ابْنَهُ شُوتَالَحَ، وَشُوتَالَحُ وَلَدَ بَرَدَ، وَبَرَدُ تَحَثَ، وَتَحَثُ أَلِعَادَا، وَأَلِعَادَا تَحَثَ. ٢٠ 20
२०एफ्राईमाची वंशावळ पुढीलप्रमाणेः एफ्राईमाचा पुत्र शूथेलाह. शुथेलहचा पुत्र बेरेद. बेरेदाचा पुत्र तहथ. तहथाचा पुत्र एलादा. एलादाचा पुत्र तहथ.
وَتَحَثُ زَابَادَ، وَزَابَادُ شُوتَالَحَ، وَشُوتَالَحُ عَزَرَ، وَعَزَرُ أَلِعَادَ، وَقَدْ قَتَلَ أَهْلُ جَتَّ عَزَرَ وَأَلِعَادَ عِنْدَمَا حَاوَلا أَنْ يُغِيرَا عَلَى مَاشِيَتِهِمْ، ٢١ 21
२१तहथचा पुत्र जाबाद. जाबादचा पुत्र शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते.
فَنَدَبَهُمَا أَبُوهُمَا أَفْرَايِمُ أَيَّاماً كَثِيرَةً، وَأَقْبَلَ إِخْوَتُهُ لِتَعْزِيَتِهِ. ٢٢ 22
२२एजेर आणि एलद हे एफ्राईमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.
وَعَاشَرَ بَعْدَ ذَلِكَ زَوْجَتَهُ فَحَمَلَتْ وَأَنْجَبَتْ لَهُ ابْناً، سَمَّاهُ بَرِيعَةَ، لأَنَّ بَلِيَّةً أَصَابَتْ بَيْتَهُ. ٢٣ 23
२३मग एफ्राईमाचा पत्नीशी संबंध येऊन त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरीया ठेवले. कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती.
وَكَانَتْ لأَفْرَايِمَ ابْنَةٌ اسْمُهَا شِيرَةُ، وَقَدْ بَنَتْ بَيْتَ حُورُونَ السُّفْلَى وَالْعُلْيَا وَأُزَّيْنَ شِيرَةَ. ٢٤ 24
२४त्याची कन्या शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि उज्जन-शेरा ही बांधली.
وَمِنْ أَبْنَاءِ أَفْرَايِمَ رَفَحُ الَّذِي أَنْجَبَ رَشَفَ، وَرَشَفُ تَلَحَ، وَتَلَحُ تَاحَنَ، ٢٥ 25
२५रेफह हा एफ्राईमाचा पुत्र. रेफहचा पुत्र रेशेफ. रेशेफचा पुत्र तेलह. तेलहचा पुत्र तहन.
وَتَاحَنُ لَعْدَانَ، وَلَعْدَانُ عَمِّيهُودَ، وَعَمِّيهُودُ أَلِيشَمَعَ، ٢٦ 26
२६तहनचा पुत्र लादान. लादानचा पुत्र अम्मीहूद. आम्मीहूदचा अलीशामा.
وَأَلِيشَمَعُ نُوناً، وَنُونٌ يَهُوشُوعَ. ٢٧ 27
२७त्याचा पुत्र नून आणि नूनचा पुत्र यहोशवा.
وَقَدِ اسْتَوْطَنُوا وَتَمَلَّكُوا فِي بَيْتِ إِيلَ وَضِيَاعِهَا حَتَّى نَعَرَانَ شَرْقاً، وَجَازَرَ وَضِيَاعِهَا وَشَكِيمَ وَضِيَاعِهَا حَتَّى غَزَّةَ وَضِيَاعِهَا غَرْباً. ٢٨ 28
२८एफ्राईमाच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्याठिकाणी ते राहत होते. बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान, पश्चिमेस गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी सरळ अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत.
وَقَامَتْ عَلَى مُحَاذَاةِ أَرْضِ مَنَسَّى مَدِينَةُ بَيْتِ شَانَ وَضِيَاعُهَا، وَتَعْنَكُ وَضِيَاعُهَا، وَمَجِدُّو وَضِيَاعُهَا، وَدُورُ وَضِيَاعُهَا. وَقَدْ سَكَنَ بَنُو يُوسُفَ بْنِ إِسْرَائِيلَ فِي هَذِهِ الْمُدُنِ. ٢٩ 29
२९मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते.
وَأَنْجَبَ أَشِيرُ يَمْنَةَ وَيِشْوَةَ وَيِشْوِي وَبَرِيعَةَ وَأُخْتَهُمْ سَارَحَ. ٣٠ 30
३०इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे पुत्र. त्यांची बहीण सेराह.
وَكَانَ لِبَرِيعَةَ ابْنَانِ، هُمَا: حَابِرُ وَمَلْكِيئِيلُ الَّذِي كَانَ وَالِداً لِبِرْزَاوَثَ. ٣١ 31
३१हेबेर, मलकीएल, हे बरीयाचे पुत्र. मालकीएलचा पुत्र बिर्जाविथ.
وَأَنْجَبَ حَابِرُ يَفْلِيطَ وَشُومَيْرَ وَحُوثَامَ وَأُخْتَهُمْ شُوعَا. ٣٢ 32
३२यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता.
أَمَّا أَبْنَاءُ يَفْلِيطَ فَهُمْ: فَاسَكُ وَبِمْهَالُ وَعَشْوَةُ. هَؤُلاءِ هُمْ أَبْنَاءُ يَفْلِيطَ. ٣٣ 33
३३पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे पुत्र.
وَأَنْجَبَ شَامِرُ (شُومَيْرُ) آخِي وَرُهْجَةَ وَيَحُبَّةَ وَأَرَامَ. ٣٤ 34
३४अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेराचे पुत्र.
أَمَّا أَبْنَاءُ أَخِيهِ هِيلامَ (حُوثَامَ) فَهُمْ: صُوفَحُ وَيَمْنَاعُ وَشَالَشُ وَعَامَالُ. ٣٥ 35
३५शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.
وَأَنْجَبَ صُوفَحُ: سُوحَ وَحَرَنْفَرَ وَشُوعَالَ وَبِيرِي وَيَمْرَةَ، ٣٦ 36
३६सोफहचे पुत्र सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना,
وَبَاصِرَ وَهُودَ وَشَمَّا وَشِلْشَةَ وَيِثْرَانَ وَبَئِيرَا. ٣٧ 37
३७बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा.
وَأَبْنَاءُ يَثَرَ هُمْ: يَفُنَّةُ وَفِسْفَةُ وَأَرَا. ٣٨ 38
३८यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे पुत्र.
أَمَّا أَبْنَاءُ عُلَّا فَهُمْ: آرَحُ وَحَنِيئِيلُ وَرَصِيَا. ٣٩ 39
३९आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे पुत्र.
كُلُّ هَؤُلاءِ مِنْ ذُرِّيَّةِ أَشِيرَ، رُؤَسَاءُ عَائِلاتٍ فِي عَشَائِرِهِمْ مِنْ خِيرَةِ الْمُحَارِبِينَ الأَشِدَّاءِ، وَقَادَةٌ بَارِزُونَ. وَقَدْ بَلَغَ عَدَدُ الْمُنْخَرِطِينَ مِنْهُمْ فِي الْجَيْشِ سِتَّةً وَعِشْرِينَ أَلْفاً. ٤٠ 40
४०हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले असे ते सव्वीस हजार लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.

< 1 أخبار 7 >