< نَشِيدُ ٱلْأَنْشَادِ 1 >
نَشِيدُ ٱلْأَنْشَادِ ٱلَّذِي لِسُلَيْمَانَ: | ١ 1 |
१हे शलमोनाचे गीतरत्न आहे:
لِيُقَبِّلْنِي بِقُبْلَاتِ فَمِهِ، لِأَنَّ حُبَّكَ أَطْيَبُ مِنَ ٱلْخَمْرِ. | ٢ 2 |
२(तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे, कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे.
لِرَائِحَةِ أَدْهَانِكَ ٱلطَّيِّبَةِ. ٱسْمُكَ دُهْنٌ مُهْرَاقٌ، لِذَلِكَ أَحَبَّتْكَ ٱلْعَذَارَى. | ٣ 3 |
३तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे, तुझे नाव दरवळणाऱ्या सुवासासारखे आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
اُجْذُبْنِي وَرَاءَكَ فَنَجْرِيَ. أَدْخَلَنِي ٱلْمَلِكُ إِلَى حِجَالِهِ. نَبْتَهِجُ وَنَفْرَحُ بِكَ. نَذْكُرُ حُبَّكَ أَكْثَرَ مِنَ ٱلْخَمْرِ. بِٱلْحَقِّ يُحِبُّونَكَ. | ٤ 4 |
४मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ. (तरुणी स्वतःशीच बोलते) राजाने मला त्याच्या अंतःपुरात आणले आहे. (तरुणी तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) मी आनंदीत आहे. मी तुझ्याविषयी आनंदीत आहे. मला तुझे प्रेम साजरे करू दे. ते द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.
أَنَا سَوْدَاءُ وَجَمِيلَةٌ يَا بَنَاتِ أُورُشَلِيمَ، كَخِيَامِ قِيدَارَ، كَشُقَقِ سُلَيْمَانَ. | ٥ 5 |
५(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते) अहो, यरूशलेमेच्या कन्यांनो, मी काळीसावळी पण सुंदर आहे. मी केदारच्या तंबूसारखी काळी आणि शलमोनाच्या पडद्यासारखी सुंदर आहे.
لَا تَنْظُرْنَ إِلَيَّ لِكَوْنِي سَوْدَاءَ، لِأَنَّ ٱلشَّمْسَ قَدْ لَوَّحَتْنِي. بَنُو أُمِّي غَضِبُوا عَلَيَّ. جَعَلُونِي نَاطُورَةَ ٱلْكُرُومِ. أَمَّا كَرْمِي فَلَمْ أَنْطُرْهُ. | ٦ 6 |
६मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका. कारण सूर्याने मी होरपळले आहे. माझे स्वतःचे भाऊ माझ्यावर रागावले होते. त्यांनी मला द्राक्षांच्या मळ्याची राखण करण्यास ठेवले. परंतु मी आपल्या स्वत: च्या द्राक्षमळ्याची काळजी घेतली नाही.
أَخْبِرْنِي يَا مَنْ تُحِبُّهُ نَفْسِي، أَيْنَ تَرْعَى، أَيْنَ تُرْبِضُ عِنْدَ ٱلظَّهِيرَةِ. لِمَاذَا أَنَا أَكُونُ كَمُقَنَّعَةٍ عِنْدَ قُطْعَانِ أَصْحَابِكَ؟ | ٧ 7 |
७(ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) माझ्या जीवाच्या प्रियकरा, मला सांग: तो तू तुझा कळप कोठे चारतोस? तू तुझ्या कळपाला दुपारी कोठे विसावा देतोस? तुझ्या सोबत्यांच्या कळपाजवळ भटकणाऱ्यांसारखी मी का व्हावे?
إِنْ لَمْ تَعْرِفِي أَيَّتُهَا ٱلْجَمِيلَةُ بَيْنَ ٱلنِّسَاءِ، فَٱخْرُجِي عَلَى آثَارِ ٱلْغَنَمِ، وَٱرْعَيْ جِدَاءَكِ عِنْدَ مَسَاكِنِ ٱلرُّعَاةِ. | ٨ 8 |
८(तिचा प्रियकर तिला उत्तर देतो) हे परम सुंदरी, जर तुला काय करायचे ते माहीत नाही तर माझ्या कळपाच्या मागे जा. तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूजवळच्या कुरणात चार.
لَقَدْ شَبَّهْتُكِ يَا حَبِيبَتِي بِفَرَسٍ فِي مَرْكَبَاتِ فِرْعَوْنَ. | ٩ 9 |
९माझ्या प्रिये, फारोच्या रथाच्या घोड्यांतल्या एका घोडीशी मी तुझी तुलना करतो.
مَا أَجْمَلَ خَدَّيْكِ بِسُمُوطٍ، وَعُنُقَكِ بِقَلَائِدَ! | ١٠ 10 |
१०तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत. तुझी मान मोत्यांच्या हारांनी सुंदर दिसत आहे.
نَصْنَعُ لَكِ سَلَاسِلَ مِنْ ذَهَبٍ مَعَ جُمَانٍ مِنْ فِضَّةٍ. | ١١ 11 |
११मी तुझ्यासाठी चांदीचे टिके लाविलेले सोन्याचे दागिने करेन.
مَا دَامَ ٱلْمَلِكُ فِي مَجْلِسِهِ أَفَاحَ نَارِدِينِي رَائِحَتَهُ. | ١٢ 12 |
१२(ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.
صُرَّةُ ٱلْمُرِّ حَبِيبِي لِي. بَيْنَ ثَدْيَيَّ يَبِيتُ. | ١٣ 13 |
१३माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला, माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे.
طَاقَةُ فَاغِيَةٍ حَبِيبِي لِي فِي كُرُومِ عَيْنِ جَدْيٍ. | ١٤ 14 |
१४माझा प्रियकर एन-गेदीमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे.
هَا أَنْتِ جَمِيلَةٌ يَا حَبِيبَتِي، هَا أَنْتِ جَمِيلَةٌ. عَيْنَاكِ حَمَامَتَانِ. | ١٥ 15 |
१५(तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो) पाहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस! तू फारच सुंदर आहेस. तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.
هَا أَنْتَ جَمِيلٌ يَا حَبِيبِي وَحُلْوٌ، وَسَرِيرُنَا أَخْضَرُ. | ١٦ 16 |
१६(तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
جَوَائِزُ بَيْتِنَا أَرْزٌ، وَرَوَافِدُنَا سَرْوٌ. | ١٧ 17 |
१७आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत. आणि छताचे वासे देवदारुच्या लाकडाचे आहे.