< إِرْمِيَا 30 >
اَلْكَلَامُ ٱلَّذِي صَارَ إِلَى إِرْمِيَا مِنْ قِبَلِ ٱلرَّبِّ قَائِلًا: | ١ 1 |
१यिर्मयाला परमेश्वरापासून जे वचन आले ते हे आहे आणि म्हणाले,
«هَكَذَا تَكَلَّمَ ٱلرَّبُّ إِلَهُ إِسْرَائِيلَ قَائِلًا: ٱكْتُبْ كُلَّ ٱلْكَلَامِ ٱلَّذِي تَكَلَّمْتُ بِهِ إِلَيْكَ فِي سِفْرٍ، | ٢ 2 |
२परमेश्वर, इस्राएलाचा देव, जे काही बोलला, तो म्हणतो, “मी तुझ्याशी बोललेले सर्व वचने आपणासाठी पुस्तकात लिहून ठेव.
لِأَنَّهُ هَا أَيَّامٌ تَأْتِي، يَقُولُ ٱلرَّبُّ، وَأَرُدُّ سَبْيَ شَعْبِي إِسْرَائِيلَ وَيَهُوذَا، يَقُولُ الرَّبُّ، وَأُرْجِعُهُمْ إِلَى ٱلْأَرْضِ ٱلَّتِي أَعْطَيْتُ آبَاءَهُمْ إِيَّاهَا فَيَمْتَلِكُونَهَا». | ٣ 3 |
३कारण पाहा, परमेश्वराचे हे निवेदन आहे, असे दिवस येतील की, ज्यात मी आपल्या लोकांचे इस्राएल आणि यहूदा यांचे भविष्य प्रस्थापित करील. कारण मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशात त्यांना परत आणीन आणि ते त्याचा ताबा घेतील.” असे मी परमेश्वर म्हणत आहे.
فَهَذَا هُوَ ٱلْكَلَامُ ٱلَّذِي تَكَلَّمَ بِهِ ٱلرَّبُّ عَنْ إِسْرَائِيلَ وَعَنْ يَهُوذَا: | ٤ 4 |
४इस्राएलाविषयी व यहूदाविषयी ही परमेश्वराने जाहीर केलेली वचने आहेत.
«لِأَنَّهُ هَكَذَا قَالَ ٱلرَّبُّ: صَوْتَ ٱرْتِعَادٍ سَمِعْنَا. خَوْفٌ وَلَا سَلَامٌ. | ٥ 5 |
५कारण परमेश्वर हे म्हणाला, “आम्ही दहशतीने थरथर कापणाऱ्याची वाणी ऐकली आहे शांतीची नाही.
اِسْأَلُوا وَٱنْظُرُوا إِنْ كَانَ ذَكَرٌ يَضَعُ! لِمَاذَا أَرَى كُلَّ رَجُلٍ يَدَاهُ عَلَى حَقْوَيْهِ كَمَاخِضٍ، وَتَحَوَّلَ كُلُّ وَجْهٍ إِلَى صُفْرَةٍ؟ | ٦ 6 |
६विचारा व पाहा जर पुरुष बालकाला जन्म देईल. प्रत्येक तरुण पुरुषाचा हात प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याच्या कमरेवर दिला आहे हे मी का पाहत आहे? त्या सर्वांची चेहरे फिक्के का पडली आहेत?
آهِ! لِأَنَّ ذَلِكَ ٱلْيَوْمَ عَظِيمٌ وَلَيْسَ مِثْلُهُ. وَهُوَ وَقْتُ ضِيقٍ عَلَى يَعْقُوبَ، وَلَكِنَّهُ سَيُخَلَّصُ مِنْهُ. | ٧ 7 |
७हायहाय! तो दिवस महान आहे, त्याच्यासारखा कोणताही नाही. तो याकोबासाठी चिंतेचा समय आहे, पण त्यातून त्यांचे रक्षण होईल.
وَيَكُونُ فِي ذَلِكَ ٱلْيَوْمِ، يَقُولُ رَبُّ ٱلْجُنُودِ، أَنِّي أَكْسِرُ نِيرَهُ عَنْ عُنُقِكَ، وَأَقْطَعُ رُبُطَكَ، وَلَا يَسْتَعْبِدُهُ بَعْدُ ٱلْغُرَبَاءُ، | ٨ 8 |
८सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्या दिवशी असे होईल की, मी तुमच्या मानेवरील जोखड मोडीन आणि तुमची बंधने तोडीन, यापुढे परके तुला गुलाम करणार नाहीत.
بَلْ يَخْدِمُونَ ٱلرَّبَّ إِلَهَهُمْ وَدَاوُدَ مَلِكَهُمُ ٱلَّذِي أُقِيمُهُ لَهُمْ. | ٩ 9 |
९पण परमेश्वर त्यांचा देव याची आणि दावीद त्यांचा राजा ज्याला मी त्यांच्यावर स्थापीन त्याची ते सेवा करतील.
«أَمَّا أَنْتَ يَا عَبْدِي يَعْقُوبَ فَلَا تَخَفْ، يَقُولُ ٱلرَّبُّ، وَلَا تَرْتَعِبْ يَا إِسْرَائِيلُ، لِأَنِّي هَأَنَذَا أُخَلِّصُكَ مِنْ بَعِيدٍ، وَنَسْلَكَ مِنْ أَرْضِ سَبْيِهِ، فَيَرْجِعُ يَعْقُوبُ وَيَطْمَئِنُّ وَيَسْتَرِيحُ وَلَا مُزْعِجَ. | ١٠ 10 |
१०परमेश्वर असे म्हणतो, म्हणून तू याकोबा, माझ्या सेवका, घाबरु नकोस, आणि इस्राएला, हिंमत खचू नको. कारण पाहा, मी तुला दूर स्थानातून परत आणीन आणि तुझ्या वंशजांना बंदिवासाच्या देशातून तारीन. याकोब पुन्हा येईल आणि शांती असेल; तो सुरक्षित राहील आणि तेथे कोणी दहशत घालणार नाही.
لِأَنِّي أَنَا مَعَكَ، يَقُولُ ٱلرَّبُّ، لِأُخَلِّصَكَ. وَإِنْ أَفْنَيْتُ جَمِيعَ ٱلْأُمَمِ ٱلَّذِينَ بَدَّدْتُكَ إِلَيْهِمْ، فَأَنْتَ لَا أُفْنِيكَ، بَلْ أُؤَدِّبُكَ بِٱلْحَقِّ، وَلَا أُبَرِّئُكَ تَبْرِئَةً. | ١١ 11 |
११कारण परमेश्वर असे म्हणतो, मी तुला तारायला तुम्हाबरोबर आहे. मग मी ज्या राष्ट्रातून तुझी पांगापांग केली आहे. त्या सर्वांचा मी पूर्ण शेवट करीन, पण मी खात्रीने तुझा शेवट करणार नाही, तरी मी तुला न्यायाने शासन करीन आणि खचीत तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.
لِأَنَّهُ هَكَذَا قَالَ ٱلرَّبُّ: كَسْرُكِ عَدِيمُ ٱلْجَبْرِ وَجُرْحُكِ عُضَالٌ. | ١٢ 12 |
१२कारण परमेश्वर असे म्हणतो, तुझी जखम बरी न होऊ शकणारी आहे; तुझा घाय संसर्गजन्य आहे.
لَيْسَ مَنْ يَقْضِي حَاجَتَكِ لِلْعَصْرِ. لَيْسَ لَكِ عَقَاقِيرُ رِفَادَةٍ. | ١٣ 13 |
१३तुझा वाद चालवणारा कोणीही नाही; तुझा घाय बरा करण्यासाठी कोणताही उपाय नाही.
قَدْ نَسِيَكِ كُلُّ مُحِبِّيكِ. إِيَّاكِ لَمْ يَطْلُبُوا. لِأَنِّي ضَرَبْتُكِ ضِرْبَةَ عَدُوٍّ، تَأْدِيبَ قَاسٍ، لِأَنَّ إِثْمَكِ قَدْ كَثُرَ، وَخَطَايَاكِ تَعَاظَمَتْ. | ١٤ 14 |
१४तुझे सर्व प्रियकर तुला विसरले आहेत. ते तुला शोधत नाहीत, कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे आणि अगणित पापांमुळे, मी तुला शत्रूप्रमाणे जखम करून आणि क्रूर धन्याप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.
مَا بَالُكِ تَصْرُخِينَ بِسَبَبِ كَسْرِكِ؟ جُرْحُكِ عَدِيمُ ٱلْبَرْءِ، لِأَنَّ إِثْمَكِ قَدْ كَثُرَ، وَخَطَايَاكِ تَعَاظَمَتْ، قَدْ صَنَعْتُ هَذِهِ بِكِ. | ١٥ 15 |
१५तुझ्या जखमेमुळे तू मदतीसाठी का ओरडतो? तुझ्या यातना बऱ्या न होऊ शकणाऱ्या आहेत. कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे, तुझ्या असंख्य पापामुळे मी तुला या गोष्टी केल्या आहेत.
لِذَلِكَ يُؤْكَلُ كُلُّ آكِلِيكِ، وَيَذْهَبُ كُلُّ أَعْدَائِكِ قَاطِبَةً إِلَى ٱلسَّبْيِ، وَيَكُونُ كُلُّ سَالِبِيكِ سَلْبًا، وَأَدْفَعُ كُلَّ نَاهِبِيكِ لِلنَّهْبِ. | ١٦ 16 |
१६म्हणून जे प्रत्येकजण तुला खाऊन टाकतील ते खाऊन टाकले जातील, आणि तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. कारण ज्या कोणी तुला लुटले त्यांची लूट होईल आणि तुला लुटणाऱ्या सर्वांना मी लुटीस देईन.
لِأَنِّي أَرْفُدُكِ وَأَشْفِيكِ مِنْ جُرُوحِكِ، يَقُولُ ٱلرَّبُّ. لِأَنَّهُمْ قَدْ دَعَوْكِ مَنْفِيَّةَ صِهْيَوْنَ ٱلَّتِي لَا سَائِلَ عَنْهَا. | ١٧ 17 |
१७कारण मी तुला आरोग्य देईन; मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. हे परमेश्वराचे निवेदन आहे. मी हे करीन कारण की, त्यांनी तुला टाकून दिलेले म्हटले आहे. कोणीही या सियोनेची काळजी घेत नाही.
«هَكَذَا قَالَ ٱلرَّبُّ: هَأَنَذَا أَرُدُّ سَبْيَ خِيَامِ يَعْقُوبَ، وَأَرْحَمُ مَسَاكِنَهُ، وَتُبْنَى ٱلْمَدِينَةُ عَلَى تَلِّهَا، وَٱلْقَصْرُ يُسْكَنُ عَلَى عَادَتِهِ. | ١٨ 18 |
१८परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी याकोबाच्या डेऱ्याचे भविष्य परत फिरवीन आणि त्याच्या घराण्यावर दया करीन. मग नगर नाशाच्या ढिगाऱ्यावर बांधण्यात येईल आणि ज्याठिकाणी किल्ले होते त्याच जागी पुन्हा होतील.
وَيَخْرُجُ مِنْهُمُ ٱلْحَمْدُ وَصَوْتُ ٱللَّاعِبِينَ، وَأُكَثِّرُهُمْ وَلَا يَقِلُّونَ، وَأُعَظِّمُهُمْ وَلَا يَصْغُرُونَ. | ١٩ 19 |
१९नंतर त्यांच्यामधून उपकारस्तुती आणि आनंदोत्सव करणाऱ्यांचा आवाज निघेल, कारण मी त्यांची वाढ करीन आणि ती कमी होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते हलके होणार नाहीत.
وَيَكُونُ بَنُوهُمْ كَمَا فِي ٱلْقَدِيمِ، وَجَمَاعَتُهُمْ تَثْبُتُ أَمَامِي، وَأُعَاقِبُ كُلَّ مُضَايِقِيهِمْ. | ٢٠ 20 |
२०मग त्यांचे लोक पूर्वीच्या सारखे होतील आणि त्यांची मंडळी माझ्यासमोर प्रस्थापित होईल जेव्हा त्यांच्या सर्व लोकांना जे कोणी त्यांना आता पीडा देतील त्यांना मी शिक्षा करीन.
وَيَكُونُ حَاكِمُهُمْ مِنْهُمْ، وَيَخْرُجُ وَالِيهِمْ مِنْ وَسْطِهِمْ، وَأُقَرِّبُهُ فَيَدْنُو إِلَيَّ، لِأَنَّهُ مَنْ هُوَ هَذَا ٱلَّذِي أَرْهَنَ قَلْبَهُ لِيَدْنُوَ إِلَيَّ، يَقُولُ ٱلرَّبُّ؟ | ٢١ 21 |
२१त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल. तो त्यांच्यामधूनच निघेल जेव्हा मी त्यास जवळ येऊ देईन आणि जेव्हा तो माझ्याजवळ येईल. कारण जो माझ्याजवळ यायला कोणाची हिंमत आहे? हे परमेश्वराचे निवेदन आहे.
وَتَكُونُونَ لِي شَعْبًا وَأَنَا أَكُونُ لَكُمْ إِلَهًا». | ٢٢ 22 |
२२मग तुम्ही लोक माझे व्हाल आणि मी तुमचा देव होईन.”
هُوَذَا زَوْبَعَةُ ٱلرَّبِّ تَخْرُجُ بِغَضَبٍ، نَوْءٌ جَارِفٌ. عَلَى رَأْسِ ٱلْأَشْرَارِ يَثُورُ. | ٢٣ 23 |
२३पाहा, परमेश्वराचे क्रोधरूप तुफान सुटले आहे. ते तुफान निरंतर आहे. ते धुव्वा उडविणारी वावटळ दुष्ट लोकांच्या डोक्यावर आदळेल.
لَا يَرْتَدُّ حُمُوُّ غَضَبِ ٱلرَّبِّ حَتَّى يَفْعَلَ، وَحَتَّى يُقِيمَ مَقَاصِدَ قَلْبِهِ. فِي آخِرِ ٱلْأَيَّامِ تَفْهَمُونَهَا. | ٢٤ 24 |
२४परमेश्वर आपल्या हृदयाचे उद्देश पूर्ण करून सिद्धीस नेईपर्यंत त्याचा संतप्त क्रोध परत जाणार नाही. अंतीम दिवसात, तुम्हास ते समजतील.