< إِشَعْيَاءَ 23 >
وَحْيٌ مِنْ جِهَةِ صُورَ: وَلْوِلِي يَاسُفُنَ تَرْشِيشَ، لِأَنَّهَا خَرِبَتْ حَتَّى لَيْسَ بَيْتٌ حَتَّى لَيْسَ مَدْخَلٌ. مِنْ أَرْضِ كِتِّيمَ أُعْلِنَ لَهُمْ. | ١ 1 |
१सोर विषयी देववाणी, तार्शीशच्या जहाजानों, आक्रोश करा कारण तुमच्या जहाजासाठी बंदर व तुमच्यासाठी घर नाही, असे कित्तीमच्या देशापासून त्यांना प्रगट करण्यात आले आहे.
اِنْدَهِشُوا يَا سُكَّانَ ٱلسَّاحِلِ. تُجَّارُ صِيدُونُ ٱلْعَابِرُونَ ٱلْبَحْرَ مَلَأُوكِ. | ٢ 2 |
२समुद्रतीरीच्या रहिवाश्यांनों, आश्चर्यचकित व्हा, तुम्ही सीदोनाचे व्यापारी, जे तुम्ही समुद्रावरून प्रवास करता, ज्यांच्या प्रतिनीधींनी तुझ्या गरजा पूरवल्या.
وَغَلَّتُهَا، زَرْعُ شِيحُورَ، حَصَادُ ٱلنِّيلِ، عَلَى مِيَاهٍ كَثِيرَةٍ فَصَارَتْ مَتْجَرَةً لِأُمَمٍ. | ٣ 3 |
३आणि महान जलांवरून नाईल नदीकाठी पिकलेले सर्व पीक, समुद्रा पलीकडून आणलेले सीहोर या भागातले धान्य ते सोर याकरीता आणले; ती राष्ट्रांची बाजारपेठ होती.
اِخْجَلِي يَا صِيدُونُ لِأَنَّ ٱلْبَحْرَ، حِصْنَ ٱلْبَحْرِ، نَطَقَ قَائِلًا: «لَمْ أَتَمَخَّضْ وَلَا وَلَدْتُ وَلَا رَبَّيْتُ شَبَابًا وَلَا نَشَّأْتُ عَذَارَى». | ٤ 4 |
४हे सीदोना लज्जीत हो, कारण समुद्र, समुद्रातील पराक्रमी, बोलला आहे, तो म्हणतो, “मी प्रसुती वेदना दिल्या नाहीत व मी प्रसवलेहि नाही, मी तरूण पुरूष वाढवले नाहीत व तरूणींना लहाण्याच्या मोठ्या केल्या नाहीत.”
عِنْدَ وُصُولِ ٱلْخَبَرِ إِلَى مِصْرَ، يَتَوَجَّعُونَ، عِنْدَ وُصُولِ خَبَرِ صُورَ. | ٥ 5 |
५मिसर देशात हे वर्तमान कळेल तेव्हा तेथे सोर निवासिया साठी मोठा शोक केला जाईल.
اُعْبُرُوا إِلَى تَرْشِيشَ. وَلْوِلُوا يَا سُكَّانَ ٱلسَّاحِلِ. | ٦ 6 |
६तार्शीशास पार जा, समुद्रतीरी राहणाऱ्यांनो तुम्ही आकांत करा.
أَهَذِهِ لَكُمُ ٱلْمُفْتَخِرَةُ ٱلَّتِي مُنْذُ ٱلْأَيَّامِ ٱلْقَدِيمَةِ قِدَمُهَا؟ تَنْقُلُهَا رِجْلَاهَا بَعِيدًا لِلتَّغَرُّبِ. | ٧ 7 |
७अति आनंदी, सुखी व वैभवशाली नगरी, हे तुमच्या बाबतीत घडले आहे, पूर्वीच्या काळापासून ती प्रसिध्द व नावजलेली होती, पण आता तीचेच पाय तिला परदेशात घेऊन जात आहेत.
مَنْ قَضَى بِهَذَا عَلَى صُورَ ٱلْمُتَوِّجَةِ ٱلَّتِي تُجَّارُهَا رُؤَسَاءُ؟ مُتَسَبِّبُوهَا مُوَقَّرُو ٱلْأَرْضِ. | ٨ 8 |
८मुकुट देणार हे सोर, ज्याचे व्यापारी अधिकारी आहेत, ज्याचे वाणी पृथ्वीतले प्रतिष्ठीत आहेत, त्या विषयी हे कोणी योजीले?
رَبُّ ٱلْجُنُودِ قَضَى بِهِ لِيُدَنِّسَ كِبْرِيَاءَ كُلِّ مَجْدٍ، وَيَهِينَ كُلَّ مُوَقَّرِي ٱلْأَرْضِ. | ٩ 9 |
९सर्व शोभेच्या वैभवाला डाग लावण्यासाठी व पृथ्वीतल्या सर्व प्रतिष्ठांना अप्रतिष्ठीत करण्यासाठी सेनाधीश परमेश्वराने हे योजिले आहे.
اِجْتَازِي أَرْضَكِ كَٱلنِّيلِ يَابِنْتَ تَرْشِيشَ. لَيْسَ حَصْرٌ فِي مَا بَعْدُ. | ١٠ 10 |
१०हे तार्शीशच्या कन्ये नील नदीप्रमाणे आपली भूमी नांगर. सोर मध्ये तुला व्यापारी ठिकाण नाही.
مَدَّ يَدَهُ عَلَى ٱلْبَحْرِ. أَرْعَدَ مَمَالِكَ. أَمَرَ ٱلرَّبُّ مِنْ جِهَةِ كَنْعَانَ أَنْ تُخْرَبَ حُصُونُهَا. | ١١ 11 |
११परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे आणि त्याने राज्ये हालवून टाकली. त्याने कनानाचे सर्व दुर्ग नष्ट करण्याची आज्ञा दिलेली आहे.
وَقَالَ: «لَا تَعُودِينَ تَفْتَخِرِينَ أَيْضًا أَيَّتُهَا ٱلْمُنْهَتِكَةُ، ٱلْعَذْرَاءُ بِنْتُ صِيْدُونَ. قُومِي إِلَى كِتِّيمَ. ٱعْبُرِي. هُنَاكَ أَيْضًا لَا رَاحَةَ لَكِ». | ١٢ 12 |
१२तो म्हणतो, “हे कलंकीत भ्रष्ट झालेली सीदोन कन्ये तू येथून पुढे आनंदीत होणार नाहीस, उठ, सायप्रस पार कर, पण तेथेही तुला आराम मिळणार नाही.”
هُوَذَا أَرْضُ ٱلْكَلْدَانِيِّينَ. هَذَا ٱلشَّعْبُ لَمْ يَكُنْ. أَسَّسَهَا أَشُّورُ لِأَهْلِ ٱلْبَرِّيَّةِ. قَدْ أَقَامُوا أَبْرَاجَهُمْ. دَمَّرُوا قُصُورَهَا. جَعَلَهَا رَدْمًا. | ١٣ 13 |
१३खास्दयांचा देश पाहा तो आता नामशेष आहे, अश्शूर देशातील लोकांनी त्यास ओसाड करण्यासाठी जंगली पशुच्या स्वाधिन केले आहे त्यांनी त्यांचे बूरूज वेढा देण्यासाठी स्थापले आहेत व त्याचे ढीगारे बनवतील, समुद्रावर संचार करणाऱ्यानो रडा शोक करा कारण तुमच्या बंदराचा नाश झाला आहे त्याचा पुर्ण विध्वंस केलेला आहे.
وَلْوِلِي يَا سُفُنَ تَرْشِيشَ لِأَنَّ حِصْنَكِ قَدْ أُخْرِبَ. | ١٤ 14 |
१४तार्शीशच्या जहाजांनो हाय हाय करा विलाप करा कारण तुमचे बंदर पूर्ण पणे नाश पावलेले आहे.
وَيَكُونُ فِي ذَلِكَ ٱلْيَوْمِ أَنَّ صُورَ تُنْسَى سَبْعِينَ سَنَةً كَأَيَّامِ مَلِكٍ وَاحِدٍ. مِنْ بَعْدِ سَبْعِينَ سَنَةً يَكُونُ لِصُورَ كَأُغْنِيَّةِ ٱلزَّانِيَةِ: | ١٥ 15 |
१५त्या दिवसात असे घडेल की सर्व जगाला सोराची विस्मृती सतर वर्षेपर्यंत पडेल, सोर प्रदेशाची कोणालाच आठवण राहणार नाही तो पर्यंत एका राजाची कारकिर्द संपेल.
«خُذِي عُودًا. طُوفِي فِي ٱلْمَدِينَةِ أَيَّتُهَا ٱلزَّانِيَةُ ٱلْمَنْسِيَّةُ. أَحْسِنِي ٱلْعَزْفَ، أَكْثِرِي ٱلْغِنَاءَ لِكَيْ تُذْكَرِي». | ١٦ 16 |
१६हे विसरलेल्या वेश्ये, वीणा घे आणि नगरात फिर, ती छान प्रकारे वाजव, तुझी आठवण व्हावी म्हणून खुप गाणी गा.
وَيَكُونُ مِنْ بَعْدِ سَبْعِينَ سَنَةً أَنَّ ٱلرَّبَّ يَتَعَهَّدُ صُورَ فَتَعُودُ إِلَى أُجْرَتِهَا، وَتَزْنِي مَعَ كُلِّ مَمَالِكِ ٱلْبِلَادِ عَلَى وَجْهِ ٱلْأَرْضِ. | ١٧ 17 |
१७सत्तर वर्षाच्या शेवटी असे होईल की परमेश्वर देव सोराची मदत करील, तेव्हा ते आपल्या वेतनाकडे फिरेल, आणि भूमीच्या सर्व पाठीवर पृथ्वीतल्या सर्व राज्यांशी व्यभिचार करेल.
وَتَكُونُ تِجَارَتُهَا وَأُجْرَتُهَا قُدْسًا لِلرَّبِّ. لَا تُخْزَنُ وَلَا تُكْنَزُ، بَلْ تَكُونُ تِجَارَتُهَا لِلْمُقِيمِينَ أَمَامَ ٱلرَّبِّ، لِأَكْلٍ إِلَى ٱلشِبَعِ وَلِلِبَاسٍ فَاخِرٍ. | ١٨ 18 |
१८तिच्या व्यापाराचा माल व त्याचे वतन परमेश्वरास पवित्र होईल, ते वतन साठवले जाणार नाही व राखून ठेवले जाणार नाही, तर जे परेश्वरासमोर राहतात त्यांनी भरपूर खावे व टिकाऊ वस्त्र घालावे म्हणून त्यांच्यासाठी त्याचा व्यापाऱ्याचा माल येईल.