< هُوشَع 3 >
وَقَالَ ٱلرَّبُّ لِي: «ٱذْهَبْ أَيْضًا أَحْبِبِ ٱمْرَأَةً حَبِيبَةَ صَاحِبٍ وَزَانِيَةً، كَمَحَبَّةِ ٱلرَّبِّ لِبَنِي إِسْرَائِيلَ وَهُمْ مُلْتَفِتُونَ إِلَى آلِهَةٍ أُخْرَى وَمُحِبُّونَ لِأَقْرَاصِ ٱلزَّبِيبِ». | ١ 1 |
१परमेश्वर मला म्हणाला, परत जा, आणि अशा स्त्रीवर प्रेम कर जी दुराचारी असूनही आपल्या पतीस प्रिय आहे. तिच्यावर प्रेम कर जसे मी इस्राएल लोकांवर करतो जरी ते इतर देवतांकडे वळले आणि त्यांना मनुक्याची ढेप प्रिय वाटली.
فَٱشْتَرَيْتُهَا لِنَفْسِي بِخَمْسَةَ عَشَرَ شَاقِلَ فِضَّةٍ وَبِحُومَرَ وَلَثَكِ شَعِيرٍ. | ٢ 2 |
२म्हणून मी पंधरा चांदीचे तुकडे व दिड मण जव देऊन तिला माझ्यासाठी विकत घेतले.
وَقُلْتُ لَهَا: «تَقْعُدِينَ أَيَّامًا كَثِيرَةً لَا تَزْنِي وَلَا تَكُونِي لِرَجُلٍ، وَأَنَا كَذَلِكَ لَكِ». | ٣ 3 |
३मी तिला म्हणालो, पुष्कळ दिवस तू माझ्यासोबत राहा; यापुढे तू वेश्या नाहीस किंवा परपुरुषाची नाहीस, त्याचप्रकारे मी पण तुझ्याशी वागेन.
لِأَنَّ بَنِي إِسْرَائِيلَ سَيَقْعُدُونَ أَيَّامًا كَثِيرَةً بِلَا مَلِكٍ، وَبِلَا رَئِيسٍ، وَبِلَا ذَبِيحَةٍ، وَبِلَا تِمْثَالٍ، وَبِلَا أَفُودٍ وَتَرَافِيمَ. | ٤ 4 |
४कारण इस्राएलचे लोक बरेच दिवस राजा, सरदार, बलीदान, दगडी खांब, एफोद आणि गृहदेवता ह्यांवाचून राहतील.
بَعْدَ ذَلِكَ يَعُودُ بَنُو إِسْرَائِيلَ وَيَطْلُبُونَ ٱلرَّبَّ إِلَهَهُمْ وَدَاوُدَ مَلِكَهُمْ، وَيَفْزَعُونَ إِلَى ٱلرَّبِّ وَإِلَى جُودِهِ فِي آخِرِ ٱلْأَيَّامِ. | ٥ 5 |
५नंतर इस्राएलाचे लोक परत येतील व आपल्या देव परमेश्वर आणि राजा दावीद यांना शोधतील आणि शेवटच्या दिवसात, ते परमेश्वराच्या समोर त्याच्या चांगुलपणात भितीने कापत येतील.