< اَلتَّكْوِينُ 36 >
وَهَذِهِ مَوَالِيدُ عِيسُوَ، ٱلَّذِي هُوَ أَدُومُ. | ١ 1 |
१एसाव म्हणजे अदोम याची वंशावळ ही,
أَخَذَ عِيسُو نِسَاءَهُ مِنْ بَنَاتِ كَنْعَانَ: عَدَا بِنْتَ إِيلُونَ ٱلْحِثِّيِّ، وَأُهُولِيبَامَةَ بِنْتَ عَنَى بِنْتِ صِبْعُونَ ٱلْحِوِّيِّ، | ٢ 2 |
२एसावाने कनानी मुलींतून स्त्रिया करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा
وَبَسْمَةَ بِنْتَ إِسْمَاعِيلَ أُخْتَ نَبَايُوتَ. | ٣ 3 |
३आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.
فَوَلَدَتْ عَدَا لِعِيسُو أَلِيفَازَ، وَوَلَدَتْ بَسْمَةُ رَعُوئِيلَ، | ٤ 4 |
४एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रगुवेल होते.
وَوَلَدَتْ أُهُولِيبَامَةُ: يَعُوشَ وَيَعْلَامَ وَقُورَحَ. هَؤُلَاءِ بَنُو عِيسُو ٱلَّذِينَ وُلِدُوا لَهُ فِي أَرْضِ كَنْعَانَ. | ٥ 5 |
५आणि अहलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे पुत्र त्यास कनान देशात झाले.
ثُمَّ أَخَذَ عِيسُو نِسَاءَهُ وَبَنِيهِ وَبَنَاتِهِ وَجَمِيعَ نُفُوسِ بَيْتِهِ وَمَوَاشِيَهُ وَكُلَّ بَهَائِمِهِ وَكُلَّ مُقْتَنَاهُ ٱلَّذِي ٱقْتَنَى فِي أَرْضِ كَنْعَانَ، وَمَضَى إِلَى أَرْضٍ أُخْرَى مِنْ وَجْهِ يَعْقُوبَ أَخِيهِ، | ٦ 6 |
६एसाव आपल्या स्त्रिया, आपली मुले, आपल्या मुली आणि आपल्या घरातील सर्व माणसे, आपली गुरेढोरे, आपली सर्व जनावरे, आणि आपली सर्व मालमत्ता जी त्याने कनान देशात जमा केली होती हे सर्व घेऊन आपला भाऊ याकोब ह्याच्या पूर्वेकडील देशात गेला.
لِأَنَّ أَمْلَاكَهُمَا كَانَتْ كَثِيرَةً عَلَى ٱلسُّكْنَى مَعًا، وَلَمْ تَسْتَطِعْ أَرْضُ غُرْبَتِهِمَا أَنْ تَحْمِلَهُمَا مِنْ أَجْلِ مَوَاشِيهِمَا. | ٧ 7 |
७कारण त्यांची मालमत्ता इतकी वाढली होती की त्यांना एकत्र राहता येईना. ज्या देशात ते राहत होते त्यामध्ये त्यांच्या गुरांढोरांचा निर्वाह होईना.
فَسَكَنَ عِيسُو فِي جَبَلِ سَعِيرَ. وَعِيسُو هُوَ أَدُومُ. | ٨ 8 |
८एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसावाला अदोमसुद्धा म्हणतात.
وَهَذِهِ مَوَالِيدُ عِيسُو أَبِي أَدُومَ فِي جَبَلِ سَعِيرَ. | ٩ 9 |
९सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अदोमी लोकांचा पूर्वज एसाव याची ही वंशावळ:
هَذِهِ أَسْمَاءُ بَنِي عِيسُو: أَلِيفَازُ ٱبْنُ عَدَا ٱمْرَأَةِ عِيسُو، وَرَعُوئِيلُ ٱبْنُ بَسْمَةَ ٱمْرَأَةِ عِيسُو. | ١٠ 10 |
१०एसावाच्या मुलांची नावे: एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमथ यांचा मुलगा रगुवेल.
وَكَانَ بَنُو أَلِيفَازَ: تَيْمَانَ وَأَوْمَارَ وَصَفْوًا وَجَعْثَامَ وَقَنَازَ. | ١١ 11 |
११अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज.
وَكَانَتْ تِمْنَاعُ سُرِّيَّةً لِأَلِيفَازَ بْنِ عِيسُو، فَوَلَدَتْ لِأَلِيفَازَ عَمَالِيقَ. هَؤُلَاءِ بَنُو عَدَا ٱمْرَأَةِ عِيسُو. | ١٢ 12 |
१२अलीपाज याची तिम्ना नावाची एक उपपत्नी होती, तिला अलीपाजापासून अमालेक झाला. ही एसावाची पत्नी आदा हिची नातवंडे होती.
وَهَؤُلَاءِ بَنُو رَعُوئِيلَ: نَحَثُ وَزَارَحُ وَشَمَّةُ وَمِزَّةُ. هَؤُلَاءِ كَانُوا بَنِي بَسْمَةَ ٱمْرَأَةِ عِيسُو. | ١٣ 13 |
१३रगुवेलाचे हे पुत्र होते: नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमथ हिची नातवंडे होती.
وَهَؤُلَاءِ كَانُوا بَنِي أُهُولِيبَامَةَ بِنْتِ عَنَى بِنْتِ صِبْعُونَ ٱمْرَأَةِ عِيسُو، وَلَدَتْ لِعِيسُو: يَعُوشَ وَيَعْلَامَ وَقُورَحَ. | ١٤ 14 |
१४सिबोनाची मुलगी अना याची मुलगी व सिबोनाची नात अहलीबामा ही एसावाची पत्नी होती. यऊश, यालाम व कोरह हे तिला एसावापासून झाले.
هَؤُلَاءِ أُمَرَاءُ بَنِي عِيسُو: بَنُو أَلِيفَازَ بِكْرِ عِيسُو: أَمِيرُ تَيْمَانَ وَأَمِيرُ أُومَارَ وَأَمِيرُ صَفْوٍ وَأَمِيرُ قَنَازَ | ١٥ 15 |
१५एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे पुत्र: तेमान, ओमार, सपो, कनाज,
وَأَمِيرُ قُورَحَ وَأَمِيرُ جَعْثَامَ وَأَمِيرُ عَمَالِيقَ. هَؤُلَاءِ أُمَرَاءُ أَلِيفَازَ فِي أَرْضِ أَدُومَ. هَؤُلَاءِ بَنُو عَدَا. | ١٦ 16 |
१६कोरह, गाताम व अमालेक. आपापल्या कुळांचे हे सरदार अलीपाजला अदोम देशात झाले. ही आदेची नातवंडे होती.
وَهَؤُلَاءِ بَنُو رَعُوئِيلَ بْنِ عِيسُو: أَمِيرُ نَحَثَ وَأَمِيرُ زَارَحَ وَأَمِيرُ شَمَّةَ وَأَمِيرُ مِزَّةَ. هَؤُلَاءِ أُمَرَاءُ رَعُوئِيلَ فِي أَرْضِ أَدُومَ. هَؤُلَاءِ بَنُو بَسْمَةَ ٱمْرَأَةِ عِيسُو. | ١٧ 17 |
१७एसावाचा मुलगा रगुवेल याचे पुत्र हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावाची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती.
وَهَؤُلَاءِ بَنُو أُهُولِيبَامَةَ ٱمْرَأَةِ عِيسُو: أَمِيرُ يَعُوشَ وَأَمِيرُ يَعْلَامَ وَأَمِيرُ قُورَحَ. هَؤُلَاءِ أُمَرَاءُ أُهُولِيبَامَةَ بِنْتِ عَنَى ٱمْرَأَةِ عِيسُو. | ١٨ 18 |
१८एसावाची पत्नी अहलीबामा हिचे पुत्र: यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले.
هَؤُلَاءِ بَنُو عِيسُو ٱلَّذِي هُوَ أَدُومُ، وَهَؤُلَاءِ أُمَرَاؤُهُمْ. | ١٩ 19 |
१९हे एसावाचे पुत्र होते, आणि हे त्यांचे वंश होते.
هَؤُلَاءِ بَنُو سَعِيرَ ٱلْحُورِيِّ سُكَّانُ ٱلْأَرْضِ: لُوطَانُ وَشُوبَالُ وَصِبْعُونُ وَعَنَى | ٢٠ 20 |
२०त्या देशात सेईर नावाच्या होरी मनुष्याचे पुत्र हे: लोटान, शोबाल, सिबोन, अना,
وَدِيشُونُ وَإِيصَرُ وَدِيشَانُ. هَؤُلَاءِ أُمَرَاءُ ٱلْحُورِيِّينَ بَنُو سَعِيرَ فِي أَرْضِ أَدُومَ. | ٢١ 21 |
२१दीशोन, एसर व दिशान. हे अदोम देशात सेईराचे पुत्र होरी वंशातील आपापल्या कुळांचे सरदार झाले.
وَكَانَ ٱبْنَا لُوطَانَ: حُورِيَ وَهَيْمَامَ. وَكَانَتْ تِمْنَاعُ أُخْتَ لُوطَانَ. | ٢٢ 22 |
२२लोटानाचे पुत्र होते होरी व हेमाम, आणि तिम्ना ही लोटानाची बहीण होती.
وَهَؤُلَاءِ بَنُو شُوبَالَ: عَلْوَانُ وَمَنَاحَةُ وَعَيْبَالُ وَشَفْوٌ وَأُونَامُ. | ٢٣ 23 |
२३शोबालाचे पुत्र: अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम.
وَهَذَانِ ٱبْنَا صِبْعُونَ: أَيَّةُ وَعَنَى. هَذَا هُوَ عَنَى ٱلَّذِي وَجَدَ ٱلْحَمَائِمَ فِي ٱلْبَرِّيَّةِ إِذْ كَانَ يَرْعَى حَمِيرَ صِبْعُونَ أَبِيهِ. | ٢٤ 24 |
२४सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.
وَهَذَا ٱبْنُ عَنَى: دِيشُونُ. وَأُهُولِيبَامَةُ هِيَ بِنْتُ عَنَى. | ٢٥ 25 |
२५अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.
وَهَؤُلَاءِ بَنُو دِيشَانَ: حَمْدَانُ وَأَشْبَانُ وَيِثْرَانُ وَكَرَانُ. | ٢٦ 26 |
२६दीशोनाचे हे पुत्र होते: हेम्दान, एश्बान, यित्रान व करान.
هَؤُلَاءِ بَنُو إِيصَرَ: بِلْهَانُ وَزَعْوَانُ وَعَقَانُ. | ٢٧ 27 |
२७एसराला बिल्हान, जावान व अकान हे पुत्र होते.
هَذَانِ ٱبْنَا دِيشَانَ: عُوصٌ وَأَرَانُ. | ٢٨ 28 |
२८दीशानाला ऊस व अरान हे पुत्र होते.
هَؤُلَاءِ أُمَرَاءُ ٱلْحُورِيِّينَ: أَمِيرُ لُوطَانَ وَأَمِيرُ شُوبَالَ وَأَمِيرُ صِبْعُونَ وَأَمِيرُ عَنَى | ٢٩ 29 |
२९होरी कुळांचे जे सरदार झाले त्यांची नावे अशी: लोटान, शोबाल, सिबोन, अना,
وَأَمِيرُ دِيشُونَ وَأَمِيرُ إِيصَرَ وَأَمِيرُ دِيشَانَ. هَؤُلَاءِ أُمَرَاءُ ٱلْحُورِيِّينَ بِأُمَرَائِهِمْ فِي أَرْضِ سَعِيرَ. | ٣٠ 30 |
३०दीशोन, एसर व दीशान, सेईर प्रदेशात राहणाऱ्या होरींच्या कुळांचे हे वंशज झाले.
وَهَؤُلَاءِ هُمُ ٱلْمُلُوكُ ٱلَّذِينَ مَلَكُوا فِي أَرْضِ أَدُومَ، قَبْلَمَا مَلَكَ مَلِكٌ لِبَنِي إِسْرَائِيلَ. | ٣١ 31 |
३१इस्राएलावर कोणी राजा राज्य करण्यापूर्वी अदोम देशात जे राजे राज्य करीत होते ते हेच:
مَلَكَ فِي أَدُومَ بَالَعُ بْنُ بَعُورَ، وَكَانَ ٱسْمُ مَدِينَتِهِ دِنْهَابَةَ. | ٣٢ 32 |
३२बौराचा मुलगा बेला याने अदोमावर राज्य केले, आणि त्याच्या नगराचे नाव दिन्हाबा होते.
وَمَاتَ بَالَعُ، فَمَلَكَ مَكَانَهُ يُوبَابُ بْنُ زَارَحَ مِنْ بُصْرَةَ. | ٣٣ 33 |
३३बेला मरण पावल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब ह्याने राज्य केले.
وَمَاتَ يُوبَابُ، فَمَلَكَ مَكَانَهُ حُوشَامُ مِنْ أَرْضِ ٱلتَّيْمَانِيِّ. | ٣٤ 34 |
३४योबाब मरण पावल्यावर, तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने राज्य केले.
وَمَاتَ حُوشَامُ، فَمَلَكَ مَكَانَهُ هَدَادُ بْنُ بَدَادَ ٱلَّذِي كَسَّرَ مِدْيَانَ فِي بِلَادِ مُوآبَ، وَكَانَ ٱسْمُ مَدِينَتِهِ عَوِيتَ. | ٣٥ 35 |
३५हुशाम मरण पावल्यावर, बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. यानेच मवाब देशात मिद्यानांचा पराभव केला. त्याच्या नगराचे नाव अवीत होते.
وَمَاتَ هَدَادُ، فَمَلَكَ مَكَانَهُ سَمْلَةُ مِنْ مَسْرِيقَةَ. | ٣٦ 36 |
३६हदाद मरण पावल्यावर मास्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले.
وَمَاتَ سَمْلَةُ، فَمَلَكَ مَكَانَهُ شَأُولُ مِنْ رَحُوبُوتِ ٱلنَّهْرِ. | ٣٧ 37 |
३७साम्ला मरण पावल्यावर फरात नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले.
وَمَاتَ شَأُولُ، فَمَلَكَ مَكَانَهُ بَعْلُ حَانَانَ بْنُ عَكْبُورَ. | ٣٨ 38 |
३८शौल मरण पावल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान याने त्या देशावर राज्य केले.
وَمَاتَ بَعْلُ حَانَانَ بْنُ عَكْبُورَ، فَمَلَكَ مَكَانَهُ هَدَارُ وَكَانَ ٱسْمُ مَدِينَتِهِ فَاعُوَ، وَٱسْمُ ٱمْرَأَتِهِ مَهِيطَبْئِيلُ بِنْتُ مَطْرِدَ بِنْتِ مَاءِ ذَهَبٍ. | ٣٩ 39 |
३९बाल-हानान मरण पावल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते. त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल होते. ही मात्रेद हिची मुलगी मेजाहाब हिची नात होती.
وَهَذِهِ أَسْمَاءُ أُمَرَاءِ عِيسُو، حَسَبَ قَبَائِلِهِمْ وَأَمَاكِنِهِمْ بِأَسْمَائِهِمْ: أَمِيرُ تِمْنَاعَ وَأَمِيرُ عَلْوَةَ وَأَمِيرُ يَتِيتَ | ٤٠ 40 |
४०एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या सरदारांची नावे: तिम्ना, आल्वा, यतेथ,
وَأَمِيرُ أُهُولِيبَامَةَ وَأَمِيرُ إِيلَةَ وَأَمِيرُ فِينُونَ | ٤١ 41 |
४१अहलीबामा, एला, पीनोन,
وَأَمِيرُ قَنَازَ وَأَمِيرُ تَيْمَانَ وَأَمِيرُ مِبْصَارَ | ٤٢ 42 |
४२कनाज, तेमान, मिब्सार,
وَأَمِيرُ مَجْدِيئِيلَ وَأَمِيرُ عِيرَامَ. هَؤُلَاءِ أُمَرَاءُ أَدُومَ حَسَبَ مَسَاكِنِهِمْ فِي أَرْضِ مُلْكِهِمْ. هَذَا هُوَ عِيسُو أَبُو أَدُومَ. | ٤٣ 43 |
४३माग्दीएल, व ईराम. ह्यातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले. अदोमी यांचा बाप एसाव याचा हा विस्तार आहे.