< عَزْرَا 1 >
وَفِي ٱلسَّنَةِ ٱلْأُولَى لِكُورَشَ مَلِكِ فَارِسَ عِنْدَ تَمَامِ كَلَامِ ٱلرَّبِّ بِفَمِ إِرْمِيَا، نَبَّهَ ٱلرَّبُّ رُوحَ كُورَشَ مَلِكِ فَارِسَ فَأَطْلَقَ نِدَاءً فِي كُلِّ مَمْلَكَتِهِ وَبِالْكِتَابَةِ أَيْضًا قَائِلًا: | ١ 1 |
१पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने दिलेले वचन पूर्ण व्हावे याकरीता परमेश्वराने राजा कोरेश्याच्या आत्म्याला प्रेरणा दिली. कोरेशाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली, त्याने जे सांगितले व लिहिले होते ते असे आहे.
«هَكَذَا قَالَ كُورَشُ مَلِكُ فَارِسَ: جَمِيعُ مَمَالِكِ ٱلْأَرْضِ دَفَعَهَا لِي ٱلرَّبُّ إِلَهُ ٱلسَّمَاءِ، وَهُوَ أَوْصَانِي أَنْ أَبْنِيَ لَهُ بَيْتًا فِي أُورُشَلِيمَ ٱلَّتِي فِي يَهُوذَا. | ٢ 2 |
२“पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत आणि यहूदातील यरूशलेमात त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले आहे.
مَنْ مِنْكُمْ مِنْ كُلِّ شَعْبِهِ، لِيَكُنْ إِلَهُهُ مَعَهُ، وَيَصْعَدْ إِلَى أُورُشَلِيمَ ٱلَّتِي فِي يَهُوذَا فَيَبْنِيَ بَيْتَ ٱلرَّبِّ إِلَهِ إِسْرَائِيلَ. هُوَ ٱلْإِلَهُ ٱلَّذِي فِي أُورُشَلِيمَ. | ٣ 3 |
३जो इस्राएलाचा देव परमेश्वर त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुम्हामध्ये आलेला आहे, त्याचा देव तुम्हासोबत आहे. तुम्ही यहूदातील यरूशलेमास वर जाऊन, जो इस्राएलाचा व यरूशलेमेचा देव, त्या परमेश्वर देवासाठी मंदिर बांधावे.
وَكُلُّ مَنْ بَقِيَ فِي أَحَدِ ٱلْأَمَاكِنِ حَيْثُ هُوَ مُتَغَرِّبٌ فَلْيُنْجِدْهُ أَهْلُ مَكَانِهِ بِفِضَّةٍ وَبِذَهَبٍ وَبِأَمْتِعَةٍ وَبِبَهَائِمَ مَعَ ٱلتَّبَرُّعِ لِبَيْتِ ٱلرَّبِّ ٱلَّذِي فِي أُورُشَلِيمَ». | ٤ 4 |
४तसेच राज्यातील इतर भागात जे कोणी वाचलेले लोक आहेत, त्यांनी त्या भागातून यरूशलेमेत देवाच्या मंदिरासाठी स्वखुशीचे अर्पण देऊन सोने, चांदी व धन, गुरेढोरे इत्यादी गोष्टीचा त्यांना पुरवठा करावा.”
فَقَامَ رُؤُوسُ آبَاءِ يَهُوذَا وَبَنْيَامِينَ، وَٱلْكَهَنَةُ وَٱللَّاوِيُّونَ، مَعَ كُلِّ مَنْ نَبَّهَ ٱللهُ رُوحَهُ، لِيَصْعَدُوا لِيَبْنُوا بَيْتَ ٱلرَّبِّ ٱلَّذِي فِي أُورُشَلِيمَ. | ٥ 5 |
५तेव्हा यहूदा व बन्यामिनाच्या घराण्यातील प्रमुखांनी, याजक व लेवी आणि प्रत्येकजण ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती ते उत्साहाने परमेश्वराचे मंदीर बांधण्यासाठी यरूशलेमेला जाण्यास सिद्ध झाले.
وَكُلُّ ٱلَّذِينَ حَوْلَهُمْ أَعَانُوهُمْ بِآنِيَةِ فِضَّةٍ وَبِذَهَبٍ وَبِأَمْتِعَةٍ وَبِبَهَائِمَ وَبِتُحَفٍ، فَضْلًا عَنْ كُلِّ مَا تُبُرِّعَ بِهِ. | ٦ 6 |
६जे लोक त्यांच्या सभोवती राहत होते, त्यांनी मंदिराच्या कामासाठी सोने व चांदीच्या वस्तू, धन, जनावरे, मौल्यवान वस्तू व खुशीचे अर्पण देऊन सहाय्य केले.
وَٱلْمَلِكُ كُورَشُ أَخْرَجَ آنِيَةَ بَيْتِ ٱلرَّبِّ ٱلَّتِي أَخْرَجَهَا نَبُوخَذْنَاصَّرُ مِنْ أُورُشَلِيمَ وَجَعَلَهَا فِي بَيْتِ آلِهَتِهِ. | ٧ 7 |
७यरूशलेम मधून परमेश्वराच्या मंदिरातील जी पात्रे नबुखद्नेस्सराने काढून आपल्या स्वतःच्या देव-घरात ठेवली होती, ती कोरेश राजाने बाहेर काढली.
أَخْرَجَهَا كُورَشُ مَلِكُ فَارِسَ عَنْ يَدِ مِثْرَدَاثَ ٱلْخَازِنِ، وَعَدَّهَا لِشِيشْبَصَّرَ رَئِيسِ يَهُوذَا. | ٨ 8 |
८ती पारसाचा राजा कोरेशाने, आपला खजिनदार मिथ्रदाथ याच्या हाती दिली. त्याने ती शेशबस्सर या यहूदी अधिकाऱ्याला मोजून दिली.
وَهَذَا عَدَدُهَا: ثَلَاثُونَ طَسْتًا مِنْ ذَهَبٍ، وَأَلْفُ طَسْتٍ مِنْ فِضَّةٍ، وَتِسْعَةٌ وَعِشْرُونَ سِكِّينًا، | ٩ 9 |
९त्यांची संख्या याप्रमाणे होती: तीस सोन्याच्या पराती, एक हजार चांदीच्या पराती, एकोणतीस सुऱ्या,
وَثَلَاثُونَ قَدَحًا مِنْ ذَهَبٍ، وَأَقْدَاحُ فِضَّةٍ مِنَ ٱلرُّتْبَةِ ٱلثَّانِيَةِ أَرْبَعُ مِئَةٍ وَعَشَرَةٌ، وَأَلْفٌ مِنْ آنِيَةٍ أُخْرَى. | ١٠ 10 |
१०तीस सोन्याच्या वाट्या, चारशे दहा चांदीच्या वाट्या, आणि एक हजार इतर पात्रे,
جَمِيعُ ٱلْآنِيَةِ مِنَ ٱلذَّهَبِ وَٱلْفِضَّةِ خَمْسَةُ آلَافٍ وَأَرْبَعُ مِئَةٍ. ٱلْكُلُّ أَصْعَدَهُ شِيشْبَصَّرُ عِنْدَ إِصْعَادِ ٱلسَّبْيِ مِنْ بَابِلَ إِلَى أُورُشَلِيمَ. | ١١ 11 |
११सोन्याची व चांदीची सर्व मिळून एकूण पाच हजार चारशे पात्रे होती. तेव्हा शेशबस्सराने बाबेलमधून यरूशलेमेस गेलेल्या बंदीवासातील कैद्यांसोबत ही सर्व पात्रे आणली.