< حِزْقِيَال 38 >
وَكَانَ إِلَيَّ كَلَامُ ٱلرَّبِّ قَائِلًا: | ١ 1 |
१परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
«يَا ٱبْنَ آدَمَ، ٱجْعَلْ وَجْهَكَ عَلَى جُوجٍ، أَرْضِ مَاجُوجَ رَئِيسِ رُوشٍ مَاشِكَ وَتُوبَالَ، وَتَنَبَّأْ عَلَيْهِ | ٢ 2 |
२“मानवाच्या मुला, मागोग देशातील, गोग, जो रोश, मेशेख व तुबाल यांचा अधिपती याजकडे तोंड कर. आणि त्याच्याविरुध्द भविष्य सांग.
وَقُلْ: هَكَذَا قَالَ ٱلسَّيِّدُ ٱلرَّبُّ: هَأَنَذَا عَلَيْكَ يَا جُوجُ رَئِيسُ رُوشٍ مَاشِكَ وَتُوبَالَ. | ٣ 3 |
३म्हण, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, ‘अरे गोगा, मेशेख व तुबाल यांच्या अधिपती, पाहा! मी तुझ्याविरूद्ध आहे.
وَأُرْجِعُكَ، وَأَضَعُ شَكَائِمَ فِي فَكَّيْكَ، وَأُخْرِجُكَ أَنْتَ وَكُلَّ جَيْشِكَ خَيْلًا وَفُرْسَانًا كُلَّهُمْ لَابِسِينَ أَفْخَرَ لِبَاسٍ، جَمَاعَةً عَظِيمَةً مَعَ أَتْرَاسٍ وَمَجَانَّ، كُلَّهُمْ مُمْسِكِينَ ٱلسُّيُوفَ. | ٤ 4 |
४म्हणून मी तुला पाठमोरा करीन आणि तुझ्या जाभाडात आकडा घालीन; तुझे सर्व सैन्य, घोडे व घोडेस्वार यास बाहेर काढीन; ते सर्वजण पूर्ण चिलखत घालून, मोठ्या व लहान ढाली धारण केलेला, त्यासर्वांनी तलवारी धरलेला असा मोठा समुदाय मी पाठवीन.
فَارِسَ وَكُوشَ وَفُوطَ مَعَهُمْ، كُلَّهُمْ بِمِجَنٍّ وَخُوذَةٍ، | ٥ 5 |
५पारस, कूश व पूट हे सर्व त्यांच्या ढाली व शिरस्राणे धारण करून त्यांच्याबरोबर आहेत.
وَجُومَرَ وَكُلَّ جُيُوشِهِ، وَبَيْتَ تُوجَرْمَةَ مِنْ أَقَاصِي ٱلشِّمَالِ مَعَ كُلِّ جَيْشِهِ، شُعُوبًا كَثِيرِينَ مَعَكَ. | ٦ 6 |
६त्याचप्रमाणे गोमर आणि त्याचा सेनासमूह, अगदी उत्तरेचा देश तोगार्माचे घराणे व त्याचा सेनासमूह, तसेच अनेक लोक तुजसह बाहेर काढीन.
اِسْتَعِدَّ وَهَيِّئْ لِنَفْسِكَ أَنْتَ وَكُلُّ جَمَاعَاتِكَ ٱلْمُجْتَمِعَةِ إِلَيْكَ، فَصِرْتَ لَهُمْ مُوَقَّرًا. | ٧ 7 |
७“सज्ज व्हा! हो! तुम्ही स्वत: आणि तुम्हास येऊन मिळालेली सैन्य ह्यांनी तयार राहा. आणि तू त्यांचा सेनापती हो.
بَعْدَ أَيَّامٍ كَثِيرَةٍ تُفْتَقَدُ. فِي ٱلسِّنِينَ ٱلْأَخِيرَةِ تَأْتِي إِلَى ٱلْأَرْضِ ٱلْمُسْتَرَدَّةِ مِنَ ٱلسَّيْفِ ٱلْمَجْمُوعَةِ مِنْ شُعُوبٍ كَثِيرَةٍ عَلَى جِبَالِ إِسْرَائِيلَ ٱلَّتِي كَانَتْ دَائِمَةً خَرِبَةً، لِلَّذِينَ أُخْرِجُوا مِنَ ٱلشُّعُوبِ وَسَكَنُوا آمِنِينَ كُلُّهُمْ. | ٨ 8 |
८पुष्कळ दिवसानंतर तुम्हास बोलविण्यात येईल. जो देश तलवारीपासून घेतलेला आहे व पुष्कळ राष्ट्रांतील लोकांपासून मिळवलेला आहे, त्यामध्ये इस्राएलाचे पर्वत सर्वदा ओसाड होत असत त्यावर तू शेवटल्या वर्षामध्ये येशील; तथापि तो देश लोकांतून काढून घेतलेला आहे आणि ते सर्व निर्भय राहतील
وَتَصْعَدُ وَتَأْتِي كَزَوْبَعَةٍ، وَتَكُونُ كَسَحَابَةٍ تُغَشِّي ٱلْأَرْضَ أَنْتَ وَكُلُّ جُيُوشِكَ وَشُعُوبٌ كَثِيرُونَ مَعَكَ. | ٩ 9 |
९म्हणून तू चढून येशील, तू वादळासारखा येशील. देशाला झाकणाऱ्या ढगासारखा तू होशील, तू आणि तुझ्याबरोबरचे सैन्य व तुजसह अनेक राष्ट्रांचे लोक असे तुम्ही त्यासारखे व्हाल.”
هَكَذَا قَالَ ٱلسَّيِّدُ ٱلرَّبُّ: وَيَكُونُ فِي ذَلِكَ ٱلْيَوْمِ أَنَّ أُمُورًا تَخْطُرُ بِبَالِكَ فَتُفَكِّرُ فِكْرًا رَدِيئًا، | ١٠ 10 |
१०प्रभू परमेश्वर असे म्हणतो, त्या दिवसात असे होईल की, तुझ्या मनात योजना येतील, तू वाईट युक्तिचा नवीन मार्ग आखशील.
وَتَقُولُ: إِنِّي أَصْعَدُ عَلَى أَرْضٍ أَعْرَاءٍ. آتِي ٱلْهَادِئِينَ ٱلسَّاكِنِينَ فِي أَمْنٍ، كُلُّهُمْ سَاكِنُونَ بِغَيْرِ سُورٍ وَلَيْسَ لَهُمْ عَارِضَةٌ وَلَا مَصَارِيعُ، | ١١ 11 |
११मग तू म्हणशील, मी उघड्या देशापर्यंत जाईन; ज्या देशांच्या नगराला तटबंदी नाही त्यांच्यावर मी हल्ला करीन. ते लोक सुरक्षित शांतीने राहतात, ते सर्वजण जेथे कोठे राहतात तेथे भिंती, अडसर, वेशी नाहीत त्यावर मी चालून जाईन.
لِسَلْبِ ٱلسَّلْبِ وَلِغُنْمِ ٱلْغَنِيمَةِ، لِرَدِّ يَدِكَ عَلَى خِرَبٍ مَعْمُورَةٍ وَعَلَى شَعْبٍ مَجْمُوعٍ مِنَ ٱلْأُمَمِ، ٱلْمُقْتَنِي مَاشِيَةً وَقُنْيَةً، ٱلسَّاكِنُ فِي أَعَالِي ٱلْأَرْضِ. | ١٢ 12 |
१२अशासाठी की, तू लूट करावी व शिकार धरावी, आणि जी उजाड स्थाने वसली आहेत त्यावर, व जे लोक राष्ट्रांमधून एकवटलेले आहेत, ज्यांनी गुरे व धन ही प्राप्त करून घेतली आहेत, जे पृथ्वीच्या मध्यभागी वसतात त्यांच्यावरही तू आपला हात चालवावा.
شَبَا وَدَدَانُ وَتُجَّارُ تَرْشِيشَ وَكُلُّ أَشْبَالِهَا يَقُولُونَ لَكَ: هَلْ لِسَلْبِ سَلْبٍ أَنْتَ جَاءٍ؟ هَلْ لِغُنْمِ غَنِيمَةٍ جَمَعْتَ جَمَاعَتَكَ، لِحَمْلِ ٱلْفِضَّةِ وَٱلذَّهَبِ، لِأَخْذِ ٱلْمَاشِيَةِ وَٱلْقُنْيَةِ، لِنَهْبِ نَهْبٍ عَظِيمٍ؟ | ١٣ 13 |
१३“शबा आणि ददान आणि तार्शीशाचे व्यापारी, त्यांच्याबरोबरचे सर्व तरुण सिंह ते सर्व तुम्हास तुला म्हणतील, ‘तू लूट करायला आलास काय? सोने व चांदी, गुरेढोरे आणि मालमत्ता, चोरून लुटून नेण्यासाठी, मोठी लूट हस्तगत करण्यासाठी तू आपली सेना जमवली आहेस का?”
«لِذَلِكَ تَنَبَّأْ يَا ٱبْنَ آدَمَ، وَقُلْ لِجُوجٍ: هَكَذَا قَالَ ٱلسَّيِّدُ ٱلرَّبُّ: فِي ذَلِكَ ٱلْيَوْمِ عِنْدَ سُكْنَى شَعْبِي إِسْرَائِيلَ آمِنِينَ، أَفَلَا تَعْلَمُ؟ | ١٤ 14 |
१४म्हणून हे मानवाच्या मुला, गोगाला भविष्य सांग, “प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ‘त्या दिवसात जेव्हा माझे इस्राएल लोक सुरक्षीत राहतील, तेव्हा तुला हे कळणार नाही का?
وَتَأْتِي مِنْ مَوْضِعِكَ مِنْ أَقَاصِي ٱلشِّمَالِ أَنْتَ وَشُعُوبٌ كَثِيرُونَ مَعَكَ، كُلُّهُمْ رَاكِبُونَ خَيْلًا، جَمَاعَةٌ عَظِيمَةٌ وَجَيْشٌ كَثِيرٌ. | ١٥ 15 |
१५तू आपल्या स्थानातून अगदी उत्तरेकडच्या दूरच्या प्रदेशातून मोठ्या सैन्याने, त्यातील सर्व घोड्यांवर स्वार होऊन मोठा समुदाय व विशाल सैन्य असे येतील.
وَتَصْعَدُ عَلَى شَعْبِي إِسْرَائِيلَ كَسَحَابَةٍ تُغَشِّي ٱلْأَرْضَ. فِي ٱلْأَيَّامِ ٱلْأَخِيرَةِ يَكُونُ. وَآتِي بِكَ عَلَى أَرْضِي لِكَيْ تَعْرِفَنِي ٱلْأُمَمُ، حِينَ أَتَقَدَّسُ فِيكَ أَمَامَ أَعْيُنِهِمْ يَاجُوجُ. | ١٦ 16 |
१६“तू माझ्या लोकांशी, इस्राएलशी, लढण्यास येशील. तू देशाला व्यापणाऱ्या व प्रचंड गर्जना करणाऱ्या ढगाप्रमाणे येशील. शेवटच्या दिवसात माझ्या देशाशी लढावयास मी तुला आणिन. मग, गोग, राष्ट्रांना माझे सामर्थ्य कळून येईल. ते मला मान देतील. त्यांना कळून चुकेल की मी पवित्र आहे.”
«هَكَذَا قَالَ ٱلسَّيِّدُ ٱلرَّبُّ: هَلْ أَنْتَ هُوَ ٱلَّذِي تَكَلَّمْتُ عَنْهُ فِي ٱلْأَيَّامِ ٱلْقَدِيمَةِ عَنْ يَدِ عَبِيدِي أَنْبِيَاءِ إِسْرَائِيلَ، ٱلَّذِينَ تَنَبَّأُوا فِي تِلْكَ ٱلْأَيَّامِ سِنِينًا أَنْ آتِيَ بِكَ عَلَيْهِمْ؟ | ١٧ 17 |
१७परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्यावेळी, मी पूर्वी जे तुझ्याजवळ बोललो होतो, ते लोकांस आठवेल. मी माझ्या सेवकांचा, इस्राएलाच्या संदेष्ट्यांचा उपयोग केला हेही त्यांना आठवेल ‘मी तुला त्यांच्याविरुद्ध लढावयास आणिन असे इस्राएलाच्या संदेष्ट्यांनी, माझ्यावतीने, पूर्वीच सांगितल्याचे त्यांना स्मरेल.”
وَيَكُونُ فِي ذَلِكَ ٱلْيَوْمِ، يَوْمَ مَجِيءِ جُوجٍ عَلَى أَرْضِ إِسْرَائِيلَ، يَقُولُ ٱلسَّيِّدُ ٱلرَّبُّ، أَنَّ غَضَبِي يَصْعَدُ فِي أَنْفِي. | ١٨ 18 |
१८म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जेव्हा गोग इस्राएल देशावर हल्ला करील त्या दिवसात असे होईल की माझ्या नाकपुड्या क्रोधाने फुरफुरतील.
وَفِي غَيْرَتِي، فِي نَارِ سَخَطِي تَكَلَّمْتُ، أَنَّهُ فِي ذَلِكَ ٱلْيَوْمِ يَكُونُ رَعْشٌ عَظِيمٌ فِي أَرْضِ إِسْرَائِيلَ. | ١٩ 19 |
१९कारण मी आपल्या रागाच्या भरात आवेशाने व आपल्या क्रोधाग्नीने तप्त होऊन बोललो आहे. इस्राएल देशामध्ये त्या दिवशी खचित मोठा भूकंप होईल.
فَتَرْعَشُ أَمَامِي سَمَكُ ٱلْبَحْرِ وَطُيُورُ ٱلسَّمَاءِ وَوُحُوشُ ٱلْحَقْلِ وَٱلدَّابَّاتُ ٱلَّتِي تَدُبُّ عَلَى ٱلْأَرْضِ، وَكُلُّ ٱلنَّاسِ ٱلَّذِينَ عَلَى وَجْهِ ٱلْأَرْضِ، وَتَنْدَكُّ ٱلْجِبَالُ وَتَسْقُطُ ٱلْمَعَاقِلُ وَتَسْقُطُ كُلُّ ٱلْأَسْوَارِ إِلَى ٱلْأَرْضِ. | ٢٠ 20 |
२०त्यावेळी सर्व सजीव भीतीने कापतील. समुद्रातील मासे, हवेत भराऱ्या मारणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे सर्व छोटे जीव आणि सर्व माणसे ह्यांच्या भीतीने थरकाप उडेल. पर्वत व कडे कोसळतील. प्रत्येक भिंत जमीनदोस्त होईल.”
وَأَسْتَدْعِي ٱلسَّيْفَ عَلَيْهِ فِي كُلِّ جِبَالِي، يَقُولُ ٱلسَّيِّدُ ٱلرَّبُّ، فَيَكُونُ سَيْفُ كُلِّ وَاحِدٍ عَلَى أَخِيهِ. | ٢١ 21 |
२१कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपल्या सर्व पर्वतावर त्याच्याविरुध्द तलवार बोलावीन. प्रत्येक मनुष्याची तलवार आपल्या भावाविरूद्ध चालेल.
وَأُعَاقِبُهُ بِٱلْوَبَإِ وَبِالدَّمِ، وَأُمْطِرُ عَلَيْهِ وَعَلَى جَيْشِهِ وَعَلَى ٱلشُّعُوبِ ٱلْكَثِيرَةِ ٱلَّذِينَ مَعَهُ مَطَرًا جَارِفًا وَحِجَارَةَ بَرَدٍ عَظِيمَةً وَنَارًا وَكِبْرِيتًا. | ٢٢ 22 |
२२आणि मरी व रक्ताने मी त्याजबरोबर वाद मांडीन. त्याजवर, त्यांच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर जे पुष्कळ प्रकारचे लोक असतील त्यांच्यावर पुराचा पाऊस व मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांचा वर्षाव करीन.
فَأَتَعَظَّمُ وَأَتَقَدَّسُ وَأُعْرَفُ فِي عُيُونِ أُمَمٍ كَثِيرَةٍ، فَيَعْلَمُونَ أَنِّي أَنَا ٱلرَّبُّ. | ٢٣ 23 |
२३मग मी आपला महिमा व पवित्रता दाखवून देईन आणि माझी ओळख पुष्कळ राष्ट्रांना करून देईन; तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे.