< حِزْقِيَال 10 >
ثُمَّ نَظَرْتُ وَإِذَا عَلَى ٱلْمُقَبَّبِ ٱلَّذِي عَلَى رَأْسِ ٱلْكَرُوبِيمِ شَيْءٌ كَحَجَرِ ٱلْعَقِيقِ ٱلْأَزْرَقِ، كَمَنْظَرِ شِبْهِ عَرْشٍ. | ١ 1 |
१मग मी पाहिले की करुबीम दुताच्या चार पंख असलेल्या जीवांच्या डोक्याच्या माथ्यावर जे घुमटाच्या आकारासारखे काही होते त्याच्यावर नीलमण्याच्या राजासनाच्या आकृतीसारखे काही माझ्या दृष्टीस पडले.
وَكَلَّمَ ٱلرَّجُلَ ٱللَّابِسَ ٱلْكَتَّانِ وَقَالَ: «ٱدْخُلْ بَيْنَ ٱلْبَكَرَاتِ تَحْتَ ٱلْكَرُوبِ وَٱمْلَأْ حَفْنَتَيْكَ جَمْرَ نَارٍ مِنْ بَيْنِ ٱلْكَرُوبِيمِ، وَذَرِّهَا عَلَى ٱلْمَدِينَةِ». فَدَخَلَ قُدَّامَ عَيْنَيَّ. | ٢ 2 |
२मग परमेश्वर देव तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाशी बोलला आणि म्हणाला, “करुबाच्या खालील चाकाच्या मध्य भागात जा, व आपल्या दोन्ही हातात जळते करुबांच्या मधून कोलीत घे आणि ते शहरावर पसरवून टाक” मग तो पुरुष मी पाहत असताना गेला.
وَٱلْكَرُوبِيمُ وَاقِفُونَ عَنْ يَمِينِ ٱلْبَيْتِ حِينَ دَخَلَ ٱلرَّجُلُ، وَٱلسَّحَابَةُ مَلَأَتِ ٱلدَّارَ ٱلدَّاخِلِيَّةَ. | ٣ 3 |
३करुब घराच्या उजव्या बाजूला उभा राहिला जेव्हा तो पुरुष आत गेली, तेव्हा ढगांनी आतल्या वेशी भरुन गेल्या.
فَٱرْتَفَعَ مَجْدُ ٱلرَّبِّ عَنِ ٱلْكَرُوبِ إِلَى عَتَبَةِ ٱلْبَيْتِ. فَٱمْتَلَأَ ٱلْبَيْتُ مِنَ ٱلسَّحَابَةِ، وَٱمْتَلَأَتِ ٱلدَّارُ مِنْ لَمَعَانِ مَجْدِ ٱلرَّبِّ. | ٤ 4 |
४परमेश्वर देवाचे गौरव करुबावर उठून घराच्या उंबरठ्यावर आले, आणि वेशी परमेश्वर देवाच्या प्रकाशाने चमकू लागल्या. त्याने घर भरुन गेले आणि वेशी देवाच्या गौरवाने प्रकाशू लागल्या.
وَسُمِعَ صَوْتُ أَجْنِحَةِ ٱلْكَرُوبِيمِ إِلَى ٱلدَّارِ ٱلْخَارِجِيَّةِ كَصَوْتِ ٱللهِ ٱلْقَدِيرِ إِذَا تَكَلَّمَ. | ٥ 5 |
५मग बाहेरील अंगणात करुबाच्या पंखांचा आवाज मी ऐकला, तो सर्वसामर्थी परमेश्वर देवाच्या वाणीसारखा होता.
وَكَانَ لَمَّا أَمَرَ ٱلرَّجُلَ ٱللَّابِسَ ٱلْكَتَّانِ قَائِلًا: «خُذْ نَارًا مِنْ بَيْنِ ٱلْبَكَرَاتِ، مِنْ بَيْنِ ٱلْكَرُوبِيمِ» أَنَّهُ دَخَلَ وَوَقَفَ بِجَانِبِ ٱلْبَكَرَةِ. | ٦ 6 |
६मग असे झाले की, तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाला देवाने आज्ञा केली आणि म्हणाला, “करुबांच्या मध्ये असलेल्या चाकांच्या मध्यभागी असलेला विस्तव घे” मग तो पुरुष चाकाच्या बाजूला जाऊन उभा राहीली.
وَمَدَّ كَرُوبٌ يَدَهُ مِنْ بَيْنِ ٱلْكَرُوبِيمِ إِلَى ٱلنَّارِ ٱلَّتِي بَيْنَ ٱلْكَرُوبِيمِ، فَرَفَعَ مِنْهَا وَوَضَعَهَا فِي حَفْنَتَيِ ٱللَّابِسِ ٱلْكَتَّانِ، فَأَخَذَهَا وَخَرَجَ. | ٧ 7 |
७एका करुबाने इतर करुबीमांच्यामध्ये जेथे आग आहे, तेथे आपला हात लांब केला आणि ती आग उचलून तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाच्या हाती दिली. तो पुरुष ती आग घेवून तेथून निघून गेला.
فَظَهَرَ فِي ٱلْكَرُوبِيمِ شِبْهُ يَدِ إِنْسَانٍ مِنْ تَحْتِ أَجْنِحَتِهَا. | ٨ 8 |
८मी करुबाला पाहिले तो पहा, मनुष्याच्या हातासारखे हात त्याच्या पंखांच्या खाली होते.
وَنَظَرْتُ وَإِذَا أَرْبَعُ بَكَرَاتٍ بِجَانِبِ ٱلْكَرُوبِيمِ. بَكَرَةٌ وَاحِدَةٌ بِجَانِبِ ٱلْكَرُوبِ ٱلْوَاحِدِ، وَبَكَرَةٌ أُخْرَى بِجَانِبِ ٱلْكَرُوبِ ٱلْآخَرِ. وَمَنْظَرُ ٱلْبَكَرَاتِ كَشِبْهِ حَجَرِ ٱلزَّبَرْجَدِ. | ٩ 9 |
९मग मी पाहिले तेव्हा पहा! करुबाच्या बाजूला चार चाके होती, एकेक चाक एकेका करुबीमाच्या शेजारी होते, आणि ती चाके वैडूर्यमण्यांसारखी दिसत होती.
وَمَنْظَرُهُنَّ شَكْلٌ وَاحِدٌ لِلْأَرْبَعِ. كَأَنَّهُ كَانَ بَكْرَةٌ وَسْطِ بَكْرَةٍ. | ١٠ 10 |
१०ती चारही चाके एकसारखीच दिसत होते, एक चाक दुसऱ्यात असल्यासारखी ती चाके होती.
لَمَّا سَارَتْ، سَارَتْ عَلَى جَوَانِبِهَا ٱلْأَرْبَعَةِ. لَمْ تَدُرْ عِنْدَ سَيْرِهَا، بَلْ إِلَى ٱلْمَوْضِعِ ٱلَّذِي تَوَجَّهَ إِلَيْهِ ٱلرَّأْسُ ذَهَبَتْ وَرَاءَهُ. لَمْ تَدُرْ عِنْدَ سَيْرِهَا. | ١١ 11 |
११जेव्हा ते चालत ते कोणत्याही एका दिशेला चालत असत; ते चालत असतांना वळण घेत नव्हते, त्यांचे तोंड ज्या दिशेला होते त्याच दिशेने ते सरळ चालत होते.
وَكُلُّ جِسْمِهَا وَظُهُورِهَا وَأَيْدِيهَا وَأَجْنِحَتِهَا وَٱلْبَكَرَاتِ مَلْآنَةٌ عُيُونًا حَوَالَيْهَا لِبَكَرَاتِهَا ٱلْأَرْبَعِ. | ١٢ 12 |
१२त्यांची सर्व शरीरे; त्यांचे हात, पाठ, आणि त्यांचे पंखदेखील डोळ्यांनी झाकलेले होते आणि त्यांच्या सभोवतालची चाकेही डोळ्यांनी झाकलेली होती.
أَمَّا ٱلْبَكَرَاتُ فَنُودِيَ إِلَيْهَا فِي سَمَاعِي: «يَا بَكْرَةُ». | ١٣ 13 |
१३जसे मी ऐकले तो त्या चाकांना “गरगर फिरणारी चाके” असे म्हटले गेले.
وَلِكُلِّ وَاحِدٍ أَرْبَعَةُ أَوْجُهٍ: ٱلْوَجْهُ ٱلْأَوَّلُ وَجْهُ كَرُوبٍ، وَٱلْوَجْهُ ٱلثَّانِي وَجْهُ إِنْسَانٍ، وَٱلثَّالِثُ وَجْهُ أَسَدٍ، وَٱلرَّابِعُ وَجْهُ نَسْرٍ. | ١٤ 14 |
१४त्यांना प्रत्येकाला चार तोंडे होती; पहिले तोंड करुबाच्या तोंडासारखे होते, दुसरे तोंड मानवाच्या तोंडासारखे होते, तिसरे तोंड सिंहाच्या तोंडासारखे, चौथे तोंड गरुडाच्या तोंडासारखे होते.
ثُمَّ صَعِدَ ٱلْكَرُوبِيمُ. هَذَا هُوَ ٱلْحَيَوَانُ ٱلَّذِي رَأَيْتُهُ عِنْدَ نَهْرِ خَابُورَ. | ١٥ 15 |
१५मग करुब प्राणी हे मी खबार नदी शेजारी पाहिले ते उभे झाले.
وَعِنْدَ سَيْرِ ٱلْكَرُوبِيمِ سَارَتِ ٱلْبَكَرَاتُ بِجَانِبِهَا، وَعِنْدَ رَفْعِ ٱلْكَرُوبِيمِ أَجْنِحَتَهَا لِلِٱرْتِفَاعِ عَنِ ٱلْأَرْضِ لَمْ تَدُرِ ٱلْبَكَرَاتُ أَيْضًا عَنْ جَانِبِهَا. | ١٦ 16 |
१६जेव्हा करुब चालत होते, चाके त्याच्या बाजूला चालत होती; आणि जेव्हा करुब उंच उडत होते, चाके पंखांसोबत पृथ्वीच्या वर घेतले जात होते, त्याची चाके हालत नव्हती तर ती स्थिर अशी त्यांच्यासोबत राहत होती.
عِنْدَ وُقُوفِهَا وَقَفَتْ هَذِهِ، وَعِنْدَ ٱرْتِفَاعِهَا ٱرْتَفَعَتْ مَعَهَا، لِأَنَّ فِيهَا رُوحَ ٱلْحَيَوَانِ. | ١٧ 17 |
१७जेव्हा करुब उडत होते, ते चाके बाजूला राहत होती आणि जेव्हा ते उभे राहत चाके उभे राहत होती, त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांत होता.
وَخَرَجَ مَجْدُ ٱلرَّبِّ مِنْ عَلَى عَتَبَةِ ٱلْبَيْتِ وَوَقَفَ عَلَى ٱلْكَرُوبِيمِ. | ١٨ 18 |
१८मग घराच्या उंबरठ्यावरुन परमेश्वर देवाचे गौरव बाहेर करुबावर जाऊन राहीले,
فَرَفَعَتِ ٱلْكَرُوبِيمُ أَجْنِحَتَهَا وَصَعِدَتْ عَنِ ٱلْأَرْضِ قُدَّامَ عَيْنَيَّ. عِنْدَ خُرُوجِهَا كَانَتِ ٱلْبَكَرَاتُ مَعَهَا، وَوَقَفَتْ عِنْدَ مَدْخَلِ بَابِ بَيْتِ ٱلرَّبِّ ٱلشَّرْقِيِّ، وَمَجْدُ إِلَهِ إِسْرَائِيلَ عَلَيْهَا مِنْ فَوْقُ. | ١٩ 19 |
१९तेव्हा करुबाने त्याचे पंख उंच केले आणि माझ्या देखत ते पृथ्वीवरून उडाले, त्यांची चाकेही त्यांच्या बाजूला होती. परमेश्वर देवाच्या पूर्व प्रवेशव्दाराजवळ येऊन उभे झाले आणि मग इस्राएलाच्या देवाचे गौरव त्यांच्यावर वरुन खाली आले.
هَذَا هُوَ ٱلْحَيَوَانُ ٱلَّذِي رَأَيْتُهُ تَحْتَ إِلَهِ إِسْرَائِيلَ عِنْدَ نَهْرِ خَابُورَ. وَعَلِمْتُ أَنَّهَا هِيَ ٱلْكَرُوبِيمُ. | ٢٠ 20 |
२०मी खबार नदीच्या तीरी इस्राएलाच्या देवाच्या आसनाखाली ज्याला पाहिले तो हाच जिवंत प्राणी होता. मग ते करुब आहेत असे मला कळाले
لِكُلِّ وَاحِدٍ أَرْبَعَةُ أَوْجُهٍ، وَلِكُلِّ وَاحِدٍ أَرْبَعَةُ أَجْنِحَةٍ، وَشِبْهُ أَيْدِي إِنْسَانٍ تَحْتَ أَجْنِحَتِهَا. | ٢١ 21 |
२१त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते. पंखांच्या खाली मनुष्याच्या हातासारखे हात होते
وَشَكْلُ وُجُوهِهَا هُوَ شَكْلُ ٱلْوُجُوهِ ٱلَّتِي رَأَيْتُهَا عِنْدَ نَهْرِ خَابُورَ مَنَاظِرُهَا وَذَوَاتُهَا. كُلُّ وَاحِدٍ يَسِيرُ إِلَى جِهَةِ وَجْهِهِ. | ٢٢ 22 |
२२खबार नदी जवळ मी पाहिलेल्या दृष्टांतात होती तसेच त्यांचे चेहरे होते आणि ते प्रत्येक आपापल्या समोर सरळ चालत होते.