< أَسْتِير 8 >
فِي ذَلِكَ ٱلْيَوْمِ أَعْطَى ٱلْمَلِكُ أَحَشْوِيرُوشُ لِأَسْتِيرَ ٱلْمَلِكَةِ بَيْتَ هَامَانَ عَدُوِّ ٱلْيَهُودِ. وَأَتَى مُرْدَخَايُ إِلَى أَمَامِ ٱلْمَلِكِ لِأَنَّ أَسْتِيرَ أَخْبَرَتْهُ بِمَا هُوَ لَهَا. | ١ 1 |
१त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा शत्रू असलेल्या हामानाच्या मालकीची सर्व मालमत्ता राणी एस्तेरला दिली. आणि मर्दखय राजाकडे आला कारण त्याचे एस्तेरशी काय नाते आहे ते तिने राजाला सांगितले.
وَنَزَعَ ٱلْمَلِكُ خَاتَمَهُ ٱلَّذِي أَخَذَهُ مِنْ هَامَانَ وَأَعْطَاهُ لِمُرْدَخَايَ. وَأَقَامَتْ أَسْتِيرُ مُرْدَخَايَ عَلَى بَيْتِ هَامَانَ. | ٢ 2 |
२राजाला आपली मुद्रा हामानाकडून परत मिळाली होती. ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयाला दिली. मग एस्तेरने मर्दखयाला हामानाच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले.
ثُمَّ عَادَتْ أَسْتِيرُ وَتَكَلَّمَتْ أَمَامَ ٱلْمَلِكِ وَسَقَطَتْ عِنْدَ رِجْلَيْهِ وَبَكَتْ وَتَضَرَّعَتْ إِلَيْهِ أَنْ يُزِيلَ شَرَّ هَامَانَ ٱلْأَجَاجِيِّ وَتَدْبِيرَهُ ٱلَّذِي دَبَّرَهُ عَلَى ٱلْيَهُودِ. | ٣ 3 |
३एस्तेर मग राजाशी पुन्हा बोलली. ती त्याच्या पाया पडून रडू लागली. अगागी हामानाने यहूद्यांचा नायनाट करण्याची आखलेली दुष्ट योजना राजाने रद्द करावी म्हणून त्यास विनंती करु लागली.
فَمَدَّ ٱلْمَلِكُ لِأَسْتِيرَ قَضِيبَ ٱلذَّهَبِ، فَقَامَتْ أَسْتِيرُ وَوَقَفَتْ أَمَامَ ٱلْمَلِكِ | ٤ 4 |
४मग राजाने आपला सोन्याचा राजदंड एस्तेरपुढे केला; एस्तेर उठली आणि राजापुढे उभी राहिली.
وَقَالَتْ: «إِذَا حَسُنَ عِنْدَ ٱلْمَلِكِ، وَإِنْ كُنْتُ قَدْ وَجَدْتُ نِعْمَةً أَمَامَهُ وَٱسْتَقَامَ ٱلْأَمْرُ أَمَامَ ٱلْمَلِكِ وَحَسُنْتُ أَنَا لَدَيْهِ، فَلْيُكْتَبْ لِكَيْ تُرَدَّ كِتَابَاتُ تَدْبِيرِ هَامَانَ بْنِ هَمَدَاثَا ٱلْأَجَاجِيِّ ٱلَّتِي كَتَبَهَا لِإِبَادَةِ ٱلْيَهُودِ ٱلَّذِينَ فِي كُلِّ بِلَادِ ٱلْمَلِكِ. | ٥ 5 |
५ती म्हणाली, “जर राजाच्या मर्जीस आल्यास, आणि मजवर तुमची कृपादृष्टी झाली असल्यास, जर राजाला ही गोष्ट योग्य वाटली आणि त्यांच्या दृष्टीने मी त्यास आवडले तर हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामान याने सर्व प्रांतातील यहूद्यांचा नायनाट करण्याचे पाठवलेले पत्रे रद्द करणारा आदेश लिहावा.
لِأَنَّنِي كَيْفَ أَسْتَطِيعُ أَنْ أَرَى ٱلشَّرَّ ٱلَّذِي يُصِيبُ شَعْبِي؟ وَكَيْفَ أَسْتَطِيعُ أَنْ أَرَى هَلَاكَ جِنْسِي؟». | ٦ 6 |
६कारण माझ्या लोकांवर आलेली आपत्ती पाहून मी कशी सहन करू? माझ्या नातेवाईकांचा नाश मी कसा सहन करू शकेन?”
فَقَالَ ٱلْمَلِكُ أَحَشْوِيرُوشُ لِأَسْتِيرَ ٱلْمَلِكَةِ وَمُرْدَخَايَ ٱلْيَهُودِيِّ: «هُوَذَا قَدْ أَعْطَيْتُ بَيْتَ هَامَانَ لِأَسْتِيرَ، أَمَّا هُوَ فَقَدْ صَلَبُوهُ عَلَى ٱلْخَشَبَةِ مِنْ أَجْلِ أَنَّهُ مَدَّ يَدَهُ إِلَى ٱلْيَهُودِ. | ٧ 7 |
७राजा अहश्वेरोशाने राणी एस्तेर आणि मर्दखय यहूदी यांना उत्तर दिले. राजा त्यांना म्हणाला, “हे, पहा, हामान यहूद्यांविरुध्द होता म्हणून त्याची मालमत्ता मी एस्तेरला दिली आणि माझ्या शिपायांनी त्यास फाशी दिले आहे. कारण तो यहूद्यांवर हल्ला करणार होता.
فَٱكْتُبَا أَنْتُمَا إِلَى ٱلْيَهُودِ مَا يَحْسُنُ فِي أَعْيُنِكُمَا بِٱسْمِ ٱلْمَلِكِ، وَٱخْتُمَاهُ بِخَاتِمِ ٱلْمَلِكِ، لِأَنَّ ٱلْكِتَابَةَ ٱلَّتِي تُكْتَبُ بِٱسْمِ ٱلْمَلِكِ وَتُخْتَمُ بِخَاتِمِهِ لَا تُرَدُّ». | ٨ 8 |
८आता राजाच्या नावाने यहूद्यांविषयी दुसरा आदेश लिहा आणि मग त्या हुकमावर राजाची मोहर उमटवा. कारण राजाच्या नावाने लिहिलेले लेख आणि त्यावर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता येत नाही.”
فَدُعِيَ كُتَّابُ ٱلْمَلِكِ فِي ذَلِكَ ٱلْوَقْتِ فِي ٱلشَّهْرِ ٱلثَّالِثِ، أَيْ شَهْرِ سِيوَانَ، فِي ٱلثَّالِثِ وَٱلْعِشْرِينَ مِنْهُ، وَكُتِبَ حَسَبَ كُلِّ مَا أَمَرَ بِهِ مُرْدَخَايُ إِلَى ٱلْيَهُودِ وَإِلَى ٱلْمَرَازِبَةِ وَٱلْوُلَاةِ وَرُؤَسَاءِ ٱلْبُلْدَانِ ٱلَّتِي مِنَ ٱلْهِنْدِ إِلَى كُوشَ، مِئَةٍ وَسَبْعٍ وَعِشْرِينَ كُورَةً، إِلَى كُلِّ كُورَةٍ بِكِتَابَتِهَا وَكُلِّ شَعْبٍ بِلِسَانِهِ، وَإِلَى ٱلْيَهُودِ بِكِتَابَتِهِمْ وَلِسَانِهِمْ. | ٩ 9 |
९राजाच्या लेखकांना ताबडतोब बोलवण्यात आले, तिसऱ्या म्हणजे शिवान महिन्याच्या तेविसाव्या दिवशी हे झाले. सर्व यहूदी आणि भारतापासून कूशपर्यंतच्या एकशेंसत्तावीस प्रांतांमधील अधिपती, अधिकारी आणि सरदार यांना उद्देशून मर्दखयाने दिलेले यहूदयांविषयी असलेले सर्व आदेश त्या लेखकांनी लिहून काढले. प्रत्येक प्रांताच्या भाषेत ते लिहिण्यात आले. प्रत्येक भाषिक गटाच्या भाषेत त्यांचा अनुवाद करण्यात आला. यहूद्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत ते आदेश लिहिले गेले.
فَكَتَبَ بِٱسْمِ ٱلْمَلِكِ أَحَشْوِيرُوشَ وَخَتَمَ بِخَاتِمِ ٱلْمَلِكِ، وَأَرْسَلَ رَسَائِلَ بِأَيْدِي بَرِيدِ ٱلْخَيْلِ رُكَّابِ ٱلْجِيَادِ وَٱلْبِغَالِ بَنِي الرَّمَكِ، | ١٠ 10 |
१०मर्दखयाने राजा अहश्वेरोशाच्या नावाने पत्रे लिहून त्यावर राजाची मोहर करून ती राजाच्या तबेल्यात वाढलेल्या सरकारी वेगवान घोडे, यांच्या स्वारांबरोबर पाठवले.
ٱلَّتِي بِهَا أَعْطَى ٱلْمَلِكُ ٱلْيَهُودَ فِي مَدِينَةٍ فَمَدِينَةٍ أَنْ يَجْتَمِعُوا وَيَقِفُوا لِأَجْلِ أَنْفُسِهِمْ، وَيُهْلِكُوا وَيَقْتُلُوا وَيُبِيدُوا قُوَّةَ كُلِّ شَعْبٍ وَكُورَةٍ تُضَادُّهُمْ حَتَّى ٱلْأَطْفَالَ وَٱلنِّسَاءَ، وَأَنْ يَسْلُبُوا غَنِيمَتَهُمْ، | ١١ 11 |
११राजाने त्या पत्रात सर्व नगरातील यहूद्यांनी एकत्र जमावे आणि स्वसंरक्षणासाठी उभे रहावे; त्यांना जे लोक व प्रांत उपद्रव करतील, त्यांच्या सर्व सैन्याचा, स्त्रियांचा, मुलांचाही नाश करावा व त्यांना ठार मारावे व त्यांना नाहीसे करावे, त्यांची लूट करून घ्यावी.
فِي يَوْمٍ وَاحِدٍ فِي كُلِّ كُوَرِ ٱلْمَلِكِ أَحَشْوِيرُوشَ، فِي ٱلثَّالِثَ عَشَرَ مِنَ ٱلشَّهْرِ ٱلثَّانِي عَشَرَ، أَيْ شَهْرِ أَذَارَ. | ١٢ 12 |
१२अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांत एकाच दिवशी, बाराव्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या, तेराव्या दिवशी यहूद्यांवर कारवाई करायची असे ठरले होते.
صُورَةُ ٱلْكِتَابَةِ ٱلْمُعْطَاةِ سُنَّةً فِي كُلِّ ٱلْبُلْدَانِ، أُشْهِرَتْ عَلَى جَمِيعِ ٱلشُّعُوبِ أَنْ يَكُونَ ٱلْيَهُودُ مُسْتَعِدِّينَ لِهَذَا ٱلْيَوْمِ لِيَنْتَقِمُوا مِنْ أَعْدَائِهِمْ. | ١٣ 13 |
१३जो लेख हुकूम म्हणून प्रत्येक प्रांतात द्यायचा होता त्याची प्रत सर्व लोकांस जाहीर झाली, की यहूद्यांनी त्या दिवशी शत्रूचा सूड उगवण्यासाठी तयार रहावे.
فَخَرَجَ ٱلبَرِيدُ رُكَّابُ ٱلْجِيَادِ وَٱلْبِغَالِ وَأَمْرُ ٱلْمَلِكِ يَحِثُّهُمْ وَيُعَجِّلُهُمْ، وَأُعْطِيَ ٱلْأَمْرُ فِي شُوشَنَ ٱلْقَصْرِ. | ١٤ 14 |
१४राजाच्या घोड्यांवर स्वार होऊन जासूद तातडीने निघाले. ते वेळ न गमावता जायला निघाले. राजाचा हाच आदेश शूशन राजधानीतही दिला गेला.
وَخَرَجَ مُرْدَخَايُ مِنْ أَمَامِ ٱلْمَلِكِ بِلِبَاسٍ مَلِكِيٍّ أَسْمَانْجُونِيٍّ وَأَبْيَضَ، وَتَاجٌ عَظِيمٌ مِنْ ذَهَبٍ، وَحُلَّةٌ مِنْ بَزٍّ وَأُرْجُوَانٍ. وَكَانَتْ مَدِينَةُ شُوشَنَ مُتَهَلِّلَةً وَفَرِحَةً. | ١٥ 15 |
१५मर्दखय राजाकडून निघाला. त्याने राजाकडचा विशेष पोषाख घातला होता. त्याची वस्त्रे निळया आणि पांढऱ्या रंगाची होती. मोठा सोन्याचा मुकुट त्याने घातला होता. तलम सणाचा जांभळा झगा त्याने वर चढवला होता. शूशन नगरामध्ये आनंदाने जयघोष करण्यात आला.
وَكَانَ لِلْيَهُودِ نُورٌ وَفَرَحٌ وَبَهْجَةٌ وَكَرَامَةٌ. | ١٦ 16 |
१६यहूद्यांच्या दृष्टीने ती पर्वणी होती. त्यामुळे त्यादिवशी जल्लोषाचे वातावरण होते.
وَفِي كُلِّ بِلَادٍ وَمَدِينَةٍ، كُلِّ مَكَانٍ وَصَلَ إِلَيْهِ كَلَامُ ٱلْمَلِكِ وَأَمْرُهُ، كَانَ فَرَحٌ وَبَهْجَةٌ عِنْدَ ٱلْيَهُودِ وَوَلَائِمُ وَيَوْمٌ طَيِّبٌ. وَكَثِيرُونَ مِنْ شُعُوبِ ٱلْأَرْضِ تَهَوَّدُوا لِأَنَّ رُعْبَ ٱلْيَهُودِ وَقَعَ عَلَيْهِمْ. | ١٧ 17 |
१७ज्या प्रांतात आणि ज्या नगरात राजाची आज्ञा पोहोचली तिथे यहूद्यांमध्ये आनंद झाला आणि त्यांनी भोजनसमारंभ करून शुभदिन म्हणून पाळला. त्या देशाचे बरेच लोकही यहूदी झाले. कारण त्यांना यहूद्यांची भीती वाटू लागली.