< मार्क 7 >
1 मंग परूशी अनं शास्त्री लोके यरूशलेमवरतीन ईसन येशुजोडे गोया व्हयनात.
2 त्यासनी त्याना काही शिष्यसले अशुध्द हाततीन म्हणजे परूशीसना नियमना मायक हात नही धोता जेवण करतांना दखेल व्हतं.
3 कारण परूशी अनी यहूदी लोके पुर्वजसंना परंपरानुसार हात निट धवाशिवाय जेयेत नही.
4 त्या बाजार मातीन जे लयेत ते धवाशिवाय खायेत नही. अनी जसं कटोरा, घडा, तांबाना भांडा घशेत अनं धोयेत असा बराच नियम त्यासनी स्विकारेल व्हतात.
5 यावरतीन परूशीसनी अनी शास्त्रीसनी येशुले ईचारं, “तुमना शिष्य अशुध्द हातघाई जेवतस, त्या पुर्वजसंना रितीरिवाजाप्रमाणे का बरं नही चालतस?”
6 येशुनी उत्तर दिधं, “तुमना मायक ढोंगीसबद्दल यशया संदेष्टानी चांगलाच संदेश देयल शे, तो असा शे की, या लोके तोंडघाई मना सन्मान करतस पण त्यासनं मन मनापाईन दुर शे?
7 त्या स्वतःना नियमसले देवना नियम बनाडीन शिकाडतस अनी वायफळ मनी भक्ती करतस.”
8 “तुम्हीन देवनी आज्ञा बाजुले करीसन माणससनी बनाडेल रितीरिवाजले चिटकी राहतस.”
9 आखो येशु त्यासले बोलना, “तुम्हीन आपला रितीरिवाज पाळाकरता देवनी आज्ञा मोडाना चांगलाच मार्ग शोधी काढेल शे!
10 कारण मोशेनी अशी आज्ञा देयेल शे की, ‘आपला बाप अनी माय यासना मान राख,’ अनी, ‘जो कोणी बाप किंवा मायनी निंदा करी त्याले मारी टाका.’
11 पण तुम्हीन म्हणतस जर कोणी आपला माय बापले अस सांगतस की, मी तुमले मदत करतु पण जे मनाकडे शे, ‘ते मी देवले अर्पण कराले ठेयेल शे.’
12 तर त्याले आपला माय किंवा बापले मदत नही करानं कारण भेटी जास.
13 तसच तुम्हीन आपला रितीरिवाज चालु ठेवाकरता देवनं वचन मोडतसं अनी असा बऱ्याच गोष्टी करतस.”
14 तवय येशुनी परत लोकसनी गर्दीले बलाईन सांगं, “तुम्हीन सर्व, मनं ऐकी ल्या, अनं समजी ल्या.”
15 “अशी कोणतीच वस्तु नही जी बाहेरतीन माणुसमा जास अनी त्याले अपवित्र करस, तर जे माणुस मातीन निंघस ते त्याले अशुध्द करस,
16 ज्यासले कान शेतस त्यासनी निट ऐकी ल्या.”
17 लोकसनी गर्दीले सोडीन जवय येशु घर गया, तवय शिष्यसनी त्यानी सांगेल दृष्टांतना अर्थ ईचारा.
18 येशु त्यासले बोलना, “तुम्हीन पण इतला आडानी शेतस का? जे काही बाहेरतीन माणुसमा जास ते त्याले अशुध्द करू शकस नही हाई तुमले समजत नही का?
19 ते मनमा नही जास तर ते पोटमा जास अनी ते शरिरमातीन बाहेर पडस.” अस सांगीसन त्यानी सर्व प्रकारनं अन्न शुध्द ठरावं.
20 आखो तो बोलना, “जे माणुस माईन निंघस तेच माणुसले अशुध्द करस.
21 कारण मझारतीन म्हणजे माणुसना मनमातीन दुष्ट ईचार निंघतस. अनैतीक कार्य, खुन, चोरी,
22 व्यभिचार, लोभ, दुष्टता, कपटपणा, जळाऊपणा, चुगलीखोर, गर्विष्टपणा, मुर्खपणा.
23 ह्या सर्व वाईट गोष्टी माणुस मातीन बाहेर निंघतस त्याच त्याले अशुध्द करतस.”
24 मंग येशु तठेन ऊठीसन सोर प्रांतना सिमावरला परीसरमा गया. तठे तो एक घरमा गया हाई कोणलेच समजाले नको अस त्यानी ईच्छा व्हती, पण त्याले लपीन राहता वनं नही.
25 तवय एक बाईनी येशुबद्दल ऐकं, तिना धाकली पोरले दुष्ट आत्मा लागेल व्हता, ती बाई लगेच ईसन त्याना पाया पडनी.
26 ती गैरयहूदी बाई व्हती, सिरियाना फेनीके प्रांतमा तिना जन्म व्हयेल व्हता. तिनी येशुले ईनंती करीसन सांगं, मनी पोर माधला दुष्ट आत्मा काढा.
27 तवय येशुनी उत्तर दिधं, “पहिले पोऱ्यासले तृप्त होऊ दे. त्यासनं जेवण काढीसन कुत्रासले देनं बराबर नही शे.”
28 तवय ती त्याले बोलनी, हाई खरं शे, “गुरजी, तरी कुत्रा पण पोऱ्यासना हातमाईन मेजनाखाल पडेल उष्ट खातस.”
29 तवय येशुनी तिले सांगं, “तुनं बोलनं पटनं, शांतीमा जाय तुना पोर मधला दुष्ट आत्मा निंघी गया!”
30 मंग ती घर गई; तिले दखायनं की, पोर आंथरून वर निजेल शे अनं तिना मधला दुष्ट आत्मा निंघी जायेल शे.
31 तवय येशु सोर प्रांतमाईन निंघीसन सिदोनना रस्तावरतीन गालीलना समुद्रकडतीन दकापलीस म्हणजे दहा गावसना शहरले वना.
32 तठे काही लोकसनी येशुकडे एक मुका बहिरा माणुसले आनं अनी तुम्हीन त्यानावर हात ठेवा, अशी त्यासनी त्याले ईनंती करी.
33 तवय येशु त्याले गर्दी माईन बाजुले लई गया त्याना कानमा बोटे टाकात नंतर तो थुंकना अनी त्या थुंकीना त्याना जिभले स्पर्श करा.
34 अनं येशु स्वर्गकडे दखीसन दम लाईन, त्या माणुसले बोलना, “इफ्फाता” म्हणजे “मोकळा व्हय!”
35 तवय त्याना कान मोकळा व्हयना अनं त्यानी जिभनी गाठ मोकळी व्हईन तो स्पष्ट बोलाले लागना.
36 तवय हाई कोणलेच सांगानं नही अस येशुनी त्याले बजाईन सांगं पण त्यानी हाई गोष्ट सर्वासले सांगी दिधी.
37 तवय ज्यासनी ऐकं त्या भलताच चकित व्हईसन बोलनात की, “हाऊ सर्वकाही कितलं चांगलं करी लेस!” अनं “हाऊ बहिरासले ऐकानी अनं मुकासले बोलानी शक्ती देस!”