< ज़बूर 6 >
1 ऐ ख़ुदा तू मुझे अपने क़हर में न झिड़क, और अपने ग़ज़बनाक ग़ुस्से में मुझे तम्बीह न दे।
१मुख्य वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस.
2 ऐ ख़ुदावन्द, मुझ पर रहम कर, क्यूँकि मैं अधमरा हो गया हूँ। ऐ ख़ुदवन्द, मुझे शिफ़ा दे, क्यूँकि मेरी हडिडयों में बेक़रारी है।
२हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.
3 मेरी जान भी बहुत ही बेक़रार है; और तू ऐ ख़ुदावन्द, कब तक?
३माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?
4 लौट ऐ ख़ुदावन्द, मेरी जान को छुड़ा। अपनी शफ़क़त की ख़ातिर मुझे बचा ले।
४हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार.
5 क्यूँकि मौत के बाद तेरी याद नहीं होती, क़ब्र में कौन तेरी शुक्रगुज़ारी करेगा? (Sheol )
५कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार? (Sheol )
6 मैं कराहते कराहते थक गया, मैं अपना पलंग आँसुओं से भिगोता हूँ हर रात मेरा बिस्तर तैरता है।
६मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.
7 मेरी आँख ग़म के मारे बैठी जाती हैं, और मेरे सब मुख़ालिफ़ों की वजह से धुंधलाने लगीं।
७शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.
8 ऐ सब बदकिरदारो, मेरे पास से दूर हो; क्यूँकि ख़ुदावन्द ने मेरे रोने की आवाज़ सुन ली है।
८अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
9 खूदावन्द ने मेरी मिन्नत सुन ली; ख़ुदावन्द मेरी दुआ क़ुबूल करेगा।
९परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे.
10 मेरे सब दुश्मन शर्मिन्दा और बहुत ही बेक़रार होंगे; वह लौट जाएँगे, वह अचानक शर्मिन्दा होंगे।
१०माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.