< नहे 10 >
1 और वह जिन्होंने मुहर लगाई ये हैं: नहमियाह बिन हकलियाह हाकिम, और सिदक़ियाह
१त्या मोहरबंद करारातील नावे पुढीलप्रमाणेः प्रांताधिपती हखल्याचा पुत्र नहेम्या आणि याजक सिदकीया यांनी सही केली,
2 सिरायाह, 'अज़रियाह, यरमियाह,
२सराया, अजऱ्या, यिर्मया,
3 फ़शहूर, अमरियाह, मलकियाह,
३पशहूर, अमऱ्या, मल्खीया.
4 हत्तूश, सबनियाह, मल्लूक,
४हत्तूश, शबन्या, मल्लूख,
5 हारिम, मरीमोत, 'अबदियाह,
५हारीम, मरेमोथ, ओबद्या,
6 दानीएल, जिन्नतून, बारूक़,
६दानीएल, गिन्नथोन, बारुख,
7 मुसल्लाम, अबियाह, मियामीन,
७मशुल्लाम, अबीया, मियामीन,
8 माज़ियाह, बिलजी, समा'याह; ये काहिन थे।
८माज्या, बिल्गई, आणि शमाया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली.
9 और लावी ये थे: यशू'अ बिन अज़नियाह, बिनवी बनी हनदाद में से क़दमीएल
९आणि लेवी: अजन्याचा पुत्र येशूवा, हेनादादच्या घराण्यातला बिन्नुई, कदमीएल,
10 और उनके भाई सबनियाह, हूदियाह, कलीताह, फ़िलायाह, हनान,
१०आणि त्यांचे भाऊ: शबन्या, होदीया, कलीता, पलाया, हानान,
12 ज़क्कूर, सरीबियाह, सबनियाह,
१२जक्कूर, शेरेब्या, शबन्या,
14 लोगों के रईस ये थे: पर'ऊस, पख़त — मोआब, 'ऐलाम, ज़त्तू, बानी,
१४लोकांचे नेते: परोश, पहथ-मवाब, एलाम, जात्तू, बानी.
16 अदूनियाह, बिगवई, 'अदीन,
१६अदोनीया, बिग्वई, आदीन,
17 अतीर, हिज़क़ियाह, 'अज़्ज़ूर,
१७आटेर, हिज्कीया, अज्जूर,
19 ख़ारीफ़, 'अन्तोत, नूबै,
१९हारिफ, अनाथोथ, नोबाई,
20 मगफ़ी'आस, मुसल्लाम, हज़ीर,
२०मप्पीयाश, मशुल्लाम, हेजीर,
21 मशेज़बेल, सदोक़, यद्दू'
२१मशेजबेल, सादोक, यद्दूवा.
22 फ़िलतियाह, हनान, 'अनायाह,
२२पलट्या, हानान, अनया,
२३होशेया, हनन्या, हश्शूब.
24 हलूहेस, फ़िलहा, सोबेक,
२४हल्लोहेश, पिल्हा, शोबेक,
25 रहूम, हसबनाह, मासियाह,
२५रहूम, हश्बना, मासेया,
२७मल्लूख, हारीम आणि बाना.
28 बाक़ी लोग, और काहिन, और लावी, और दरबान और गाने वाले और नतनीम और सब जो ख़ुदा की शरी'अत की ख़ातिर और मुल्कों की क़ौमों से अलग हो गए थे, और उनकी बीवियाँ और उनके बेटे और बेटियाँ ग़रज़ जिनमें समझ और 'अक़्ल थी
२८उरलेल्या लोकांनी जे याजक, लेवी द्वारपाळ गायक व मंदिरात काम करणारे लोक आणि देवाचे नियमशास्त्र पाळायची शपथ घेऊन देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांना, ज्यास बुद्धी व समजूत होती अशा स्त्रीयां, पुत्र व कन्या यासह वेगळे झाले.
29 वह सबके सब अपने भाई अमीरों के साथ मिलकर ला'नत ओ क़सम में शामिल हुए, ताकि ख़ुदावन्द की शरी'अत पर जो बन्दा — ए — ख़ुदावन्द मूसा के ज़रिए' मिली, चलें और यहोवाह हमारे ख़ुदावन्द के सब हुक्मों और फ़रमानों और आईन को मानें और उन पर 'अमल करें।
२९त्याचबरोबर त्यांच्या सर्व स्त्रिया, आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व पुत्र आणि कन्या. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तीसमवेत परमेश्वर देवाचे जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याकडून दिले होते ते पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासंबंधीचा शापही त्यांनी स्विकारला.
30 और हम अपनी बेटियाँ मुल्क के बाशिन्दों को न दें, और न अपने बेटों के लिए उनकी बेटियाँ लें;
३०आमच्या भोवतींच्या प्रदेशातील लोकांमध्ये आम्ही आमच्या कन्यांचे विवाह होऊ देणार नाही तसेच त्यांच्या कन्याहि आमच्या पुत्रांसाठी करून घेणार नाही असे आम्ही वचन देतो.
31 और अगर मुल्क के लोग सबत के दिन कुछ माल या खाने की चीज़ बेचने को लाएँ, तो हम सबत को या किसी पाक दिन को उनसे मोल न लें। और सातवाँ साल और हर क़र्ज़ का मुतालबा छोड़ दें।
३१शब्बाथ दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. प्रत्येक सातव्या वर्षी आम्ही जमीन पडीत ठेवू. तसेच त्यावर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करु.
32 और हम ने अपने लिए क़ानून ठहराए कि अपने ख़ुदा के घर की ख़िदमत के लिए साल — ब — साल मिस्क़ाल का तीसरा हिस्सा' दिया करें;
३२मंदिराच्या सेवेच्या सर्व आज्ञा पाळायची जबाबदारी आम्ही घेत आहोत. देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून एकतृतीयांश शेकेल आम्ही दरवर्षी देऊ.
33 या'नी सबतों और नये चाँदों की नज़्र की रोटी, और हमेशा की नज़्र की क़ुर्बानी, और हमेशा की सोख़्तनी क़ुर्बानी के लिए और मुक़र्ररा 'ईदों और पाक चीज़ों और ख़ता की क़ुर्बानियों के लिए कि इस्राईल के वास्ते कफ़्फ़ारा हो, और अपने ख़ुदा के घर के सब कामों के लिए।
३३मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या अन्नार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण यादिवशी करायची अर्पणे, इस्राएलींच्या प्रायश्चितासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च या पैशातून द्यावा.
34 और हम ने या'नी काहिनों, और लावियों, और लोगों ने, लकड़ी के हदिए के बारे में पर्ची डाली, ताकि उसे अपने ख़ुदा के घर में बाप — दादा के घरानों के मुताबिक़ मुक़र्ररा वक़्तों पर साल — ब — साल ख़ुदावन्द अपने ख़ुदा के मज़बह पर जलाने को लाया करें, जैसा शरी'अत में लिखा है।
३४मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्ठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी नियमशास्त्रात लिहिल्या प्रमाणे लाकूड आणायचे आहे.
35 और साल — ब — साल अपनी — अपनी ज़मीन के पहले फल, और सब दरख़्तों के सब मेवों में से पहले फल ख़ुदावन्द के घर में लाएँ;
३५आमच्या शेतातले पहिले पीक आणि निरनिराळ्या फळझाडांची प्रथमफळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणण्याचे हे आम्ही वचन देतो.
36 और जैसा शरी'अत में लिखा है, अपने पहलौठे बेटों को और अपनी मवाशी या'नी गाय, बैल और भेड़ — बकरी के पहलौठे बच्चों को अपने ख़ुदा के घर में काहिनों के पास जो हमारे ख़ुदा के घर में ख़िदमत करते हैं लाएँ।
३६आमचा प्रथम पुत्र आणि आमची गुरेढोरे, शेळया मेंढ्या यांचे प्रथम पिलू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याजकांकडे आणू.
37 और अपने गूँधे हुए आटे और अपनी उठाई हुई क़ुर्बानियों और सब दरख़्तों के मेवों, और मय और तेल में से पहले फल को अपने ख़ुदा के घर की कोठरियों में काहिनों के पास, और अपने खेत की दहेकी लावियों के पास लाया करें; क्यूँकि लावी सब शहरों में जहाँ हम काश्तकारी करते हैं, दसवाँ हिस्सा लेते हैं।
३७तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहर, नवीन काढलेला द्राक्षरस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी आणू. तसेच लेवींना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण आम्ही काम करत असलेल्या सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग लेवी घेतात.
38 और जब लावी दहेकी लें तो कोई काहिन जो हारून की औलाद से हो, लावियों के साथ हो, और लावी दहेकियों का दसवाँ हिस्सा हमारे ख़ुदा के बैत — उल — माल की कोठरियों में लाएँ।
३८लेवी या धान्याचा स्विकार करताना अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्याबरोबर असावा. मग लेवींनी यांच्या वंशातील लोकांनी देवाच्या, मंदिरात आणावा व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावा.
39 क्यूँकि बनी — इस्राईल और बनी लावी अनाज और मय और तेल की उठाई हुई क़ुर्बानियाँ उन कोठरियों में लाया करेंगे जहाँ हैकल के बर्तन और ख़िदमत गुज़ार काहिन और दरबान और गानेवाले हैं; और हम अपने ख़ुदा के घर को नहीं छोड़ेंगे।
३९इस्राएल लोक आणि लेवी यांच्या वंशातील लोकांनी धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते. आम्ही आपल्या देवाच्या मंदिराची उपेक्षा करणार नाही.