< हिज़ि 42 >

1 फिर वह मुझे उत्तरी रास्ते से बैरूनी सहन में ले गया, और उस कोठरी में जो अलग जगह और 'इमारत के सामने उत्तर की तरफ़ थी ले आया।
नंतर त्या मनुष्याने मला उत्तरेकडून बाहेरच्या अंगणात आणले आणि मग त्याने मला ती सोडलेली जागा आणि उत्तरेकडील इमारत यासमोरील खोल्या असलेल्या इमारतीत आणले.
2 सौ हाथ की लम्बाई की जगह के सामने उत्तरी दरवाज़ा था, और उसकी चौड़ाई पचास हाथ थी।
शंभर हात लांबीच्यासमोर तिच्या उत्तरेकडचा प्रवेश होता आणि इमारतीची रुंदी पन्नास हात होती.
3 बीस हाथ के सामने जो अन्दरूनी सहन के लिए थे, और बैरूनी सहन के फ़र्श के सामने कोठरियाँ तीन तबक़ों में एक दूसरे के सामने थीं।
आंतील अंगणासमोर वीस हात व बाहेरील अंगणाच्या इमारतीसमोर तिसऱ्या मजल्याला समोरासमोर सज्जे होते.
4 और कोठरियों के सामने अन्दर की तरफ़ दस हाथ चौड़ा रास्ता था, और एक रास्ता एक हाथ का और उनके दरवाज़े उत्तर की तरफ़ थे।
खोल्यासमोर दहा हात रुंद व शंभर हात लांब असा एक रस्ता होता; त्याचे दरवाजे उत्तरेकडे होते.
5 ऊपर की कोठरियाँ छोटी थीं, क्यूँकि उनके बरामदों ने 'इमारत की निचली और बीच की मंज़िल के सामने इनसे ज़्यादा जगह रोक ली थी।
पण या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील जागा सज्ज्यात गुंतली होती म्हणून तेथल्या खोल्या, मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा लहान होत्या.
6 क्यूँकि वह तीन दर्जों की थीं, लेकिन उनके सुतून सहन के सुतूनों की तरह न थे; इसलिए वह निचली और बीच मंज़िन्ल से तंग थीं।
कारण त्या खोल्यांचे तीन मजले होते. त्यांना अंगणातल्या खांबासारखे खांब नव्हते. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या मधल्या व खालच्या मजल्यापेक्षा लहान होत्या.
7 और कोठरियों के पास की बैरूनी सहन की तरफ़, कोठरियों के सामने की बैरूनी दीवार पचास हाथ लम्बी थी।
आणि त्या खोल्यांशी समांतर अशी खोल्यांसमोरील बाहेरच्या बाजूला, खोल्यांना समांतर अशी भिंत होती. ती बाहेरच्या अंगणापर्यंत गेलेली एक भिंत होती; तिची लांबी पन्नास हात होती.
8 क्यूँकि बैरूनी सहन की कोठरियों की लम्बाई पचास हाथ थी, और हैकल के सामने सौ हाथ की लम्बाई थी।
कारण बाहेरच्या अंगणाच्या खोल्यांची लांबी पन्नास हात होती. मंदिराच्या समोर शंभर हात होती.
9 और उन कोठरियों के नीचे पूरब की तरफ़ वह मदख़ल था, जहाँ से बैरूनी सहन से दाख़िल होते थे।
या खोल्यांच्या खालून पूर्वेस प्रवेशद्वार होते, त्यातून बाहेरच्या अंगणातून येणारे त्या खोल्यांत जात असत.
10 पूरबी सहन की चौड़ी दीवार में और अलग जगह और उस 'इमारत के सामने कोठरियाँ थीं।
१०अंगणाच्या भिंतीला लागून पूर्वेकडे, सोडलेल्या जागेसमोर व मंदिराच्या अंगणासमोर बाहेरच्या बाजूलाही खोल्या होत्या.
11 और उनके सामने एक ऐसा रास्ता था, जैसा उत्तर की तरफ़ की कोठरियों के सामने था; उनकी लम्बाई और चौड़ाई बराबर थी, और उनके तमाम मख़रज उनकी तरतीब और उनके दरवाज़ों के मुताबिक़ थे।
११उत्तरेकडील खोल्यासमोर जसा रस्ता होता तसा त्याच्या समोरही रस्ता होता. त्यांची लांबी-रुंदी, त्यांच्या बाहेर जाण्याच्या सर्व वाटा व त्यांची एकंदर व्यवस्था त्यांच्याप्रमाणेच होती.
12 और दक्खिन की तरफ़ की कोठरियों के दरवाज़ों के मुताबिक़ एक दरवाज़ा रास्ते के सिरे पर था, या'नी सीधी दीवार के रास्ते पर पूरब की तरफ़ जहाँ से उनमें दाख़िल होते थे।
१२उत्तरेकडील दारांसारखेच दक्षिणेकडे असलेल्या खोल्यांचे दारे होती; रहदारीच्या तोंडाजवळ म्हणजे उजव्या भिंतीजवळील रस्त्यावरून त्या दारातून पूर्वेकडून येणारे लोक प्रवेश करीत असत.
13 और उसने मुझ से कहा, कि “उत्तरी और दक्खिनी कोठरियाँ जो अलग जगह के मुक़ाबिल हैं पाक कोठरियाँ हैं जहाँ काहिन जो ख़ुदावन्द के सामने जाते हैं अक़दस चीजें खायेंगे और अक़दस चीज़ें और नज़र की क़ुर्बानी और ख़ता की क़ुर्बानी और जुर्म की क़ुर्बानी वहाँ रख्खेंगे, क्यूँकि वह मकान पाक है।
१३मग तो मनुष्य मला म्हणाला, “अंगणाच्या समोर असलेल्या उत्तर व दक्षिणेकडील खोल्या या पवित्र असून त्यामध्ये परमेश्वराजवळ जाणारे याजक परमपवित्र पदार्थ खातील. तेथे ते परमपवित्र पदार्थ, अन्नार्पण, पापार्पण व दोषार्पण ठेवतील, कारण ते स्थान पवित्र आहे.
14 जब काहिन दाख़िल हों तो वह हैकल से बैरूनी सहन में न जाएँ, बल्कि अपनी ख़िदमत के लिबास वहीं उतार दें क्यूँकि वह पाक हैं, और वह दूसरे कपड़े पहन कर 'आम मकान में जाएँ।”
१४जेव्हा याजक तेथे प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी पवित्रस्थानातून बाहेरच्या अंगणात जाऊ नये तर ज्या वस्त्रांनी ते सेवा करतात ती त्यांनी बाजूला तेथेच उतरवून ठेवावी कारण ती वस्त्रे पवित्र आहेत. म्हणून त्यांनी लोकांपुढे जाण्याआधी दुसरी वस्रे घालावी.”
15 फिर जब वह अन्दरूनी घर को नाप चुका, तो मुझे उस फाटक के रास्ते से लाया जिसका रुख़ पूरब की तरफ़ है और घर को चारों तरफ़ से नापा।
१५आतील मंदिराचे मोजमाप करून झाल्यावर त्या मनुष्याने मला पूर्वेकडच्या दारातून बाहेर आणले आणि तेथे त्यांने सर्व सभोवतालच्या बाजूंचे मोजमाप केले.
16 उसने पैमाइश के सरकण्डे से पूरब की तरफ़ चारो तरफ़ पाँच सौ सरकण्डे नापे।
१६त्याने ते मापावयाच्या काठीने मापले, पूर्वेकडे मापण्याच्या काठीने पांचशे हात मापले.
17 उसने पैमाइश के सरकण्डे से उत्तर की तरफ़ चारो तरफ़ पाँच सौ सरकण्डे नापे।
१७त्याने उत्तरेची बाजू मोजली. ती मापण्याच्या काठीने पाचशे हात भरली.
18 उसने पैमाइश के सरकण्डे से दक्खिन की तरफ़ भी पाँच सौ सरकण्डे नापे।
१८त्याने दक्षिणेची बाजू सुद्धा मोजली. ती मापण्याच्या काठीने पांचशे हात भरली.
19 उसने पच्छिम की तरफ़ मुड़ कर पैमाइश के सरकण्डे से पाँच सौ सरकण्डे नापे।
१९मग तो वळला आणि पश्चिमेची बाजू मोजली, मापण्याच्या काठीने पांचशे हात भरली.
20 उसने उसको चारों तरफ़ से नापा, उसकी चारों तरफ़ एक दीवार पाँच सौ सरकण्डे लम्बी और पाँच सौ चौड़ी थी, ताकि पाक को 'आम से जुदा करे।
२०त्याने चारी बाजूंनी मोजमाप केले. पवित्रस्थळे व अपवित्र स्थळे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यासाठी त्यास सभोवती भिंत होती. तिची लांबी पांचशे हात व रुंदी पांचशे हात होती.

< हिज़ि 42 >