< Torati 12 >

1 Hizi ni amri na sheria ambazo mtazishika katika nchi ambayo, Yahwe Mungu wa baba zenu, amewapa kumiliki, siku zote mnazoishi kwenye ardhi.
परमेश्वर हा तुमच्या पूर्वजांचा देव आहे. त्याने दिलेल्या प्रदेशात तुम्ही हे विधी व नियम यांचे पालन काटेकोरपणे जिवंत रहाल तोपर्यंत काळजीपूर्वक पाळा.
2 Hakika mtaharibu maeneo yote ambapo mataifa mtakayofukuza miungu yao walioabudu, kwenye milima mirefu, kwenye vilima, na chini ya kila mti wa kijani.
आता तेथे असलेल्या ज्या राष्ट्रांना तुम्ही ताब्यात घेणार आहात. त्यातले लोक ज्या ठिकाणी, उंच पर्वत, टेकड्यांवर, आणि हिरवीगार झाडी अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या देवाची उपासना करीत असतील त्या सर्वांचा तुम्ही अवश्य नाश करा.
3 Na mtazivunja madhabahu zao chini, mtaharibu kwa vipandepande nguzo zao za mawe, na kuchoma ncha za Asherahi, mtazikata sanaa za kuchongwa za miungu yao na kuangamiza jina lao nje ya eneo hilo.
तुम्ही तेथील वेद्या मोडून टाका, दगडी स्मारकस्तंभांचा विध्वंस करा. अशेरा मूर्ती जाळा, त्यांच्या दैवतांच्या कोरीव मूर्तीची मोडतोड करा. म्हणजे त्याठिकाणी त्यांची नावनिशाणीही उरणार नाही.
4 Hamtamwabudu Yahwe Mungu wenu kama hivyo.
ते लोक करतात तशी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करु नका.
5 Lakini kwa eneo ambalo Yahwe Mungu wenu atachagua kutoka makabila yenu kuweka jina lake, hapo patakuwa ni eneo analoishi na huko ndiyo mtaenda.
तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वंशातून एक स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.
6 Ni huko ndiko mtaleta sadaka ya kutekeketezwa, dhabihu zenu, zaka zenu, na sadaka zinazotolewa kwa mkono wenu, sadaka zenu za viapo, sadaka za utayari na mzao wa kwanza wa mifugo na wanyama.
तेथे तुम्ही आपापले होमबली, यज्ञबली, आपल्या पिकांचा व जनावरांचा एक दशांश हिस्सा, काही खास भेटी, नवस फेडण्याच्या वस्तू, खुशीने अर्पण करायच्या वस्तू तसेच आपल्या पाळीव प्राण्यांत जन्मलेला पहिला गोऱ्हा तुम्ही आणा.
7 Ni huko mtakula mbele za Yahwe Mungu wenu na kufurahi kuhusu kila kitu ambacho mmeweka mkono, nyie na jamaa zenu, ambapo Yahwe Mungu wenu amewabariki.
आपल्या कुटुंबियासमवेत तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात तुम्ही तेथे भोजन करा. तुम्ही कष्ट करून जे मिळवलेत त्याच्या आनंदात तेथे तुम्ही सर्वजण सामील व्हा. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हास सर्व गोष्टी मनासारख्या मिळत आहेत याची आठवण ठेवा.
8 Hamtafanya mambo yote ambayo tunafanya hapa leo; sasa kila moja anafanya chochote kile kizuri machoni pake,
आतापर्यंत आपण सगळे आपल्या मनाला वाटेल तशी उपासना करत आलो तशी आता करु नका.
9 kwa kuwa bado hamjapumzika, kwa urithi ambao Yahwe Mungu wenu anawapa.
कारण तुमचा देव परमेश्वर देत असलेले हे विसाव्याचे व वतनाचे ठिकाण अजून मिळाले नाही.
10 Lakini pindi mnaenda ng'ambo ya pili ya Yordani na kuishi ndani ya nchi ambayo Yahwe Mungu wenu anasababisha ninyi kurithi, na wakati awapa pumziko kutoka kwa maadui zenu wanaowazunga karibu, ili kusudi muishi kwa usalama,
१०पण आता तुम्ही यार्देन नदीपलीकडे तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या देशात जाऊन राहणार आहात. तेथे तुम्हास सर्व शत्रूंपासून अभय मिळेल. तुम्हास स्वस्थता लाभेल.
11 kisha itakuwa eneo ambalo Yahwe Mungu wenu atachagua kusababisha jina lake kuishi, huko mtaleta yote ninayowaamuru; sadaka za kuteketezwa, dhabihu zenu, zaka zenu, sadaka zilizotolewa kwa mkono wenu, na sadaka za chaguo lenu kwa ajili ya nadhiri mtakazotoa kwa Yahwe.
११मग तुमचा देव परमेश्वर एका ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल. त्यास तो आपले नाव देईल. तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा; होमबली, यज्ञबली, धान्याचा व प्राण्यांचा दहावा हिस्सा, परमेश्वरास अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशु-पक्षी यांचा पहिला गोऱ्हा, घेऊन जा.
12 Mtafurahi mbele za Yahwe Mungu wenu-nyie, watoto wenu, binti zenu, wajakazi wa kiume, wajakazi wa kike, na Walawi walio ndani ya lango lenu, kwa sababu hana sehemu au urithi miongoni mwenu.
१२येताना आपली मुलेबाळे, दासदासी, या सर्वांना या ठिकाणी घेऊन या. तुमच्या वेशींच्या आत राहणाऱ्या लेवींनाही बरोबर आणा (कारण त्यांना जमिनीत व वतनात तुमच्याबरोबर वाटा नाही) सर्वांनी मिळून तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंदात वेळ घालवा.
13 Uwe makini mwenyewe kwamba usitoe sadaka zako za kuteketezwa kila eneo unaloona;
१३आपले होमबली वाटेल त्याठिकाणी अर्पण करु नका त्याविषयी सावध असा.
14 lakini ni katika eneo hilo ambalo Yahwe atawachagua miongoni moja kati ya makabila yenu ambalo litatoa sadaka ya kuteketezwa, na huko mtafanya kila kitu ninachokuamuru.
१४परमेश्वर तुमच्या वंशांच्या वतनात अशी एक पवित्र जागा निवडील. तेथेच तुम्ही हे होमबली अर्पण करा व ज्या ज्या इतर गोष्टीं विषयी मी तुला आज्ञा करत आहे त्या सर्व तेथे करा.
15 Hata hivyo, mtaweza kuua na kula wanyama ndani ya malango yenu, kama mnavyotaka, kupokea baraka ya Yahwe Mungu wenu kwa ajili ya yote amewapa; na watu wasio safi na safi wote wanaweza kula, wanyama kama vile paa na kulungu.
१५तथापि, तुम्ही राहता तेथे हरीण, सांबर असे कोणतेही चांगले प्राणी मारुन खाऊ शकता. तुला तुझा देव परमेश्वर याने आशीर्वाद दिल्याप्रमाणे ते हवे तितके खा. हे मांस शुद्ध, अशुद्ध अशा कोणत्याही लोकांनी खावे.
16 Lakini hamtakula damu, mtaimwaga kwenye ardhi kama maji.
१६फक्त त्यातले रक्त तेवढे खाऊ नका. ते पाण्यासारखे जमीनीवर ओतून टाका.
17 Mnaweza msile ndani ya malango kutoka kwenye zaka ya nafaka zenu, mvinyo wenu mpya, mafuta yenu au mzao wa kwanza wa mifugo au wanyama; na mnaweza msile nyama yoyote mnayoitoa dhabihu pamoja na viapo vyovyote vyenu mnafanya, wala sadaka yenu ya utayari, wala sadaka mnayotoa kwa mkono wenu.
१७आपण राहतो तेथे काही गोष्टी खाणे निषिद्ध आहे. त्या म्हणजे, देवाच्या वाट्याचे धान्य, नवीन द्राक्षरस, तेल, कळपातील पहिला गोऱ्हा, देवाला स्वखुशीने अर्पण करायच्या वस्तू नवस फेडण्याच्या गोष्टी, आणखी काही देवाला अर्पण करायच्या खास गोष्टी वगैरे.
18 Badala yake, mtakula mbele ya Yahwe Mugu wenu katika eneo ambalo Yahwe Mungu atachagua- nyie, mtoto wenu, binti yenu, mjakazi wa kiume, mjakazi wa kike, na Mlawi aliye malangoni mwenu; mtafurahi mbele ya Yahwe Mungu wenu kuhusu kila kitu ambacho mnaweka mkono wenu.
१८या गोष्टी तुमचा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच आणि त्याच्या समवेत खाव्या. आपली मुलेबाळे, दासदासी, वेशीच्या आतील लेवी यांना बरोबर घेऊन तिथे जाऊन त्या खा. जी कामे पार पाडली त्याबद्दल तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंद व्यक्त करा.
19 Muwe makini wenyewe ili kwamba msimwache Mlawi maadamu mnaishi kwenye nchi yenu.
१९या देशात रहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करून घ्या.
20 Wakati Yahwe Mungu wenu apanua mipaka yenu, kama alivyowaahidi, na kusema, “Nitakula nyama,” kwa sababu ya tamaa zenu mnakula nyama, mnaweza kula nyama, kama tanmaa za roho zenu.
२०तुमच्या देशाच्या सीमा वाढवायचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास वचन दिले आहे. तसे झाले की त्याने निवडलेली जागा तुमच्या राहत्या घरापासून लांब पडेल.
21 Kama eneo ambalo Yahwe Mungu wenu achagua kuliweka jina lake ni mbali kutoka kwenu, basi mtaua baadhi ya mifugo yenu na wanyama wenu ambao Yahwe amewapa, kama nilivyowaamuru: hivyo mnaweza kula ndani ya malango yenu, kama tamaa za roho zenu.
२१तेव्हा मांसाची गरज पडली की जे मिळेल ते मांस तुम्ही खा. तुमचा देव परमेश्वर याने दिलेल्या पशु-पक्ष्यांच्या कळपातील कोणताही प्राणी मारलात तरी चालेल. मी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही राहत्या जागी हे मांस हवे तेव्हा खा.
22 Kama paa na Kulungu wanaliwa, hivyo mtakula watu wasio safi na wasafi wanaweze kula kadhalika.
२२हरीण किंवा सांबर यांच्याप्रमाणेच हे खा. शुद्ध, अशुद्ध कोणाही व्यक्तीने ते खावे.
23 Lakini muwe na uhakika kwamba hamtumii damu, kwa kuwa damu ni uhai, hamtakula uhai pamoja na nyama.
२३पण रक्त मात्र खाण्यात येऊ देऊ नका. कारण रक्त म्हणजे जीवन आहे. ज्या मांसात जीवनाचा अंश आहे ते खाणे कटाक्षाने टाळा.
24 Hamtakula, mtaimwaga nje kwenye ardhi kama maji.
२४रक्त सेवन करु नका. ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका.
25 Hamtakula, ili kwamba iweze kuwa vizur kwenu, na watoto wenu baada yenu, wakati mtafanya kile kilicho sahihi machoni pa Yahwe.
२५परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करावे म्हणजे तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल.
26 Lakini mambo ambayo ni ya Yahwe ambayo mnayo na sadaka za viapo vyenu-mtachukua hizi na kwenda eneo ambalo Yahwe achagua.
२६देवाला काही विशेष अर्पण करायचे ठरवले तर तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या त्याच्या जागी तुम्ही जावे. नवस बोललात तर तो फेडायलाही तेथे जा.
27 Hapo mtatoa sadaka ya kuteketekezwa, nyama na damu, kwenye madhabahu ya Yahwe Mungu wenu, damu ya dhabihu zenu itamwangwa nje kwenye madhabahu ya Yahwe Mungu wenu, na mtakula nyama.
२७आपले होमबली म्हणजे मांस व रक्त तेथे तुझा देव परमेश्वर याच्या वेदीवर अर्पण करा. इतर बलीचे रक्त वेदीवर वाहा. मग त्याचे मांस खा.
28 Mchunguze na msikilize haya maneno yote ambayo - ninawaamuru, ili iwe uzuri kwenu na watoto wenu baada yenu milele, wakati mnafanya kile kilicho kizuri na sawa machoni pa Yahwe Mungu wenu.
२८मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा. जे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने चांगले व उचित आहे ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.
29 Wakati Yahwe Mungu wenu anapunguza mataifa kutoka kwenu, wakati mnaingia kuwafukuza, na mnawafukuza na kuishi katika nchi yao,
२९तुम्ही दुसऱ्यांच्या जमिनीवर ताबा मिळवणार आहात. तुमचा देव परमेश्वर तुमच्यासाठी त्या राष्ट्राचा पाडाव करील. तेव्हा तेथील लोकांस हुसकावून तुम्ही तेथे रहाल.
30 muwe makini wenyewe ili kwamba msinaswe kwa kuwafuata, baada ya kuangamizwa kutoka kwenu kunaswa katika kuchunguza miungu yao, katika kuuliza, “Kwa namna gani haya mataifa yanaabudu muingu yao? Nitafanya hivyo hivyo.
३०एवढे झाल्यावर एक खबरदारी घ्या. त्यांचा पाडाव झाल्यावर तुम्हासच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. आणि त्यांच्या देवांच्या भजनी लागाल. तेव्हा सावध राहा. त्यांच्या दैवतांच्या नादी लागू नका. या राष्ट्रानी ज्याप्रकारे सेवा केली तशीच मी आता करतो असे मनात आणू नका.
31 Hautafanya hivyo katika kumheshimu Yahwe Mungu wako, kwa kuwa kila kitu ambacho ni chukizo kwa Yahwe, mambo ambayo anayachukia- wamefanya haya na miungu yao, hata mnateketeza vijana wao na binti zao kwenye moto kwa ajili ya miungu yao.
३१तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करु नका. कारण परमेश्वरास ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते आपल्या देवाकरता आपल्या मुलाबाळांचा होमसुद्धा करतात.
32 Chochote ninakuamuru, chunguza. Usiongeze juu yake au kupunguza.
३२तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा. त्यामध्ये अधिक उणे करु नका.

< Torati 12 >