< Esdras 3 >
1 Y llegado el mes séptimo, y los hijos de Israel en las ciudades, juntóse el pueblo, como un varón, en Jerusalem.
१इस्राएली लोक बंदिवासातून परतल्यानंतर आपापल्या नगरात सातवा महिना सुरु झाल्यावर, ते सर्वजण एकमनाने यरूशलेमेत एकत्र जमले.
2 Y levantóse Jesuá, hijo de Josedec, y sus hermanos los sacerdotes, y Zorobabel, hijo de Salatiel, y sus hermanos, y edificaron el altar del Dios de Israel, para ofrecer sobre él holocaustos, como está escrito en la ley de Moisés varón de Dios.
२योसादाकाचा मुलगा येशूवा आणि त्याचे भाऊ याजक व शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि त्याचे भाऊ यांनी उठून इस्राएलाच्या देवाला होमार्पणे अर्पिण्यासाठी, देवाचा मनुष्य मोशे याच्या नियमशास्त्रात आज्ञापिल्याप्रमाणे वेदी बांधली.
3 Y asentaron el altar sobre sus basas, porque tenían miedo de los pueblos de las tierras: y ofrecieron sobre él holocaustos a Jehová, holocaustos a la mañana y a la tarde.
३मग त्यांनी जुना पाया तसाच ठेवून त्यावर वेदीची स्थापना केली कारण त्यांना देशातील लोकांची खूप भीती वाटत होती. तिच्यावर ते परमेश्वरास सकाळ संध्याकाळ होमार्पणे अर्पण करू लागले.
4 E hicieron la solemnidad de las cabañas, como está escrito, y holocaustos cada día por cuenta, conforme al rito, cada cosa en su día.
४मग त्यांनी मंडपाचा सण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळला आणि प्रत्येक दिवसाची होमार्पणे त्याच्या विधीप्रमाणे जशी नेमलेली होती तशी रोज अर्पण केली.
5 Y además de esto el holocausto continuo, y las nuevas lunas, y todas las fiestas santificadas de Jehová, y todo sacrificio espontáneo de voluntad a Jehová.
५त्यानंतर दररोजचे होमार्पण, चंद्रदर्शन याप्रकारे परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे होमार्पण त्याबरोबर स्वखुशीने करायचे सर्व अर्पण केले.
6 Desde el primero día del mes séptimo comenzaron a ofrecer holocaustos a Jehová, mas el templo de Jehová no era aun fundado.
६अशाप्रकारे, अजून मंदिराचा पाया बांधून झालेला नसतांनाही सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून परमेश्वरास होमार्पण अर्पण करायला सुरुवात केली.
7 Y dieron dinero a los carpinteros y oficiales; comida, y bebida, y aceite a los Sidonios y Tirios, para que trajesen madera de cedro del Líbano a la mar de Joppe, conforme a la voluntad de Ciro rey de Persia acerca de esto.
७त्यांनी दगडकाम करणाऱ्यांना आणि सुतारांना चांदी दिली आणि त्यांना पारसाचा राजा कोरेश याच्या परवानगीने गंधसरूची लाकडे लबानोनातून याफोच्या समुद्रास आणावी म्हणून सोरी आणि सीदोनाच्या लोकांस अन्न, पेय व तेलही दिले.
8 Y en el año segundo de su venida a la casa de Dios en Jerusalem, en el mes segundo, comenzaron Zorobabel, hijo de Salatiel, y Jesuá, hijo de Josedec, y los otros sus hermanos, los sacerdotes y los Levitas, y todos los que habían venido de la cautividad a Jerusalem; y pusieron a los Levitas de veinte años y arriba para que tuviesen cargo de la obra de la casa de Jehová.
८शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकाचा मुलगा येशूवा व त्याचे भाऊ, जे याजक व लेवी होते त्यांनी व बंदीवासातून परत यरूशलेमेस आले होते त्या सर्वांनी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्यात कामाला सुरुवात केली. जे लेवी वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांना परमेश्वराच्या मंदीराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले होते.
9 Y estuvo Jesuá, sus hijos, y sus hermanos, Cadmiel y sus hijos, hijos de Judá, como un varón, para dar priesa a los que hacían la obra en la casa de Dios: los hijos de Henadad, sus hijos, y sus hermanos, Levitas.
९येशूवा आपले मुले आणि त्याचे भाऊ, कदमीएल आणि त्याची मुले, यहूदाचे वंशज हेनादाद आणि त्याचे मुले व त्याचे भाऊ जे लेवी त्यांच्यासहीत देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले.
10 Y los albañiles del templo de Jehová echaron los cimientos, y pusieron a los sacerdotes vestidos con trompetas, y a los Levitas, hijos de Asaf, con címbalos, para que alabasen a Jehová por mano de David rey de Israel.
१०जेव्हा बांधणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्राएलचा राजा दावीद याच्या आज्ञेप्रमाणे याजकांनी आपला याजकीय पोषाख घालून हाती कर्णे घेतले व झांजा वाजवणारे लेवी, आसाफाची मुले परमेश्वराच्या स्तवनासाठी आपापल्या जागी उभे राहिले.
11 Y cantaban alabando, y glorificando a Jehová: Porque es bueno, porque para siempre es su misericordia sobre Israel. Y todo el pueblo jubilaba, con grande júbilo, alabando a Jehová porque la casa de Jehová era acimentada.
११“तो चांगला आहे! इस्राएलावर त्याची दया सर्वकाळ आहे.” स्तुती आणि उपकार मानत अशी गीते त्यांनी गाईली. मंदिराचा पाया घातला गेला म्हणून त्यांनी परमेश्वराचा जयजयकार केला. त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या.
12 Y muchos de los sacerdotes, y de los Levitas, y de las cabezas de los padres, viejos, que habían visto la casa primera, viendo fundar esta casa lloraban a gran voz: y muchos otros daban grita de alegría a alta voz:
१२पण यावेळी वृद्ध याजक, लेवी आणि वडिलांच्या घराण्यांतील मुख्य मंडळी यांच्यातले पुष्कळजण जेव्हा या मंदिराचा पाया त्याच्या डोळ्यासमोर घातला गेला तेव्हा ते मोठ्याने रडू लागले, कारण पहिले घर त्यांनी पाहिले होते. इतर लोकांचा आनंदाने जयघोष चालू होता.
13 Y el pueblo no podía discernir la voz del júbilo de alegría, de la voz del lloro del pueblo: porque el pueblo jubilaba con gran júbilo, y la voz se oía hasta lejos.
१३हा आवाज बऱ्याच दूरपर्यंत ऐकू जात होता. एकंदर आवाज एवढा मोठा होता की, त्यातला रडण्याचा आवाज कोणता व आनंदाचा आवाज कोणता हे ओळखू येत नव्हते.