< Izaija 60 >
1 Vstani, zasij, kajti tvoja svetloba je prišla in Gospodova slava je vstala nad teboj.
१“उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे.”
2 Kajti glej, tema bo prekrila zemljo in velika tema ljudstva, toda Gospod bo vstal nad teboj in njegova slava bo vidna na tebi.
२जरी अंधार पृथ्वीला आणि निबीड काळोख लोकांस झाकेल, तरी परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल आणि, त्याचे तेज तुझ्यावर येईल.
3 Pogani bodo prišli k tvoji svetlobi in kralji k siju tvojega vzhajanja.
३राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, आणि राजे तुझ्या उगवत्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
4 Dvigni svoje oči naokoli in poglej. Vsi se zbirajo skupaj, prihajajo k tebi. Tvoji sinovi bodo prišli od daleč in tvoje hčere bodo negovane ob tvoji strani.
४तुझ्या सभोवती पाहा! ते सर्व एकत्र जमतात आणि तुझ्याकडे येतात. तुझी मुले दूरुन येतील आणि तुझ्या मुलींना कडेवर बसून आणतील.
5 Takrat boš videla in tekla skupaj in tvoje srce se bo balo in bo povečano, ker bo obilje morja obrnjeno k tebi, sile poganov bodo prišle k tebi.
५तेव्हा तू हे पाहशील आणि आनंदाने उल्हासीत होशील, आणि तुझे हृदय हर्षाने भरून वाहेल. कारण समुद्रातील भरपूर संपत्ती तुझ्यापुढे ओतली जाईल, राष्ट्रांचे सर्व धन तुझ्याकडे येईल.
6 Pokrila te bo množica kamel, [enogrbi] velblodi iz Midjána in Efe, vsi tisti iz Sabe bodo prišli. Prinesli bodo zlato in kadilo in naznanjali bodo Gospodove hvalnice.
६मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुला झाकतील, शेबातले सर्व येतील, ते सोने आणि धूप आणतील आणि परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
7 Vsi kedárski tropi bodo zbrani skupaj k tebi, Nebajótovi ovni ti bodo služili. Na moj oltar bodo prišli s sprejetjem in jaz bom proslavil hišo svoje slave.
७केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुझ्याकडे एकत्र केल्या जातील. नबायोथचे मेंढे तुझी सेवा करतील. ते माझ्या वेदीवर स्विकार्य असे अर्पण होतील, आणि मी माझ्या तेजस्वी घराला आणखी गौरवीत करीन.
8 Kdo so ti, ki letijo kakor oblak in kakor golobice k svojim oknom?
८हे कोण आहेत जे मेघाप्रमाणे उडतात, आणि कबुतराप्रमाणे आपल्या आश्रयस्थानाकडे उडत येतात?
9 Otoki bodo zagotovo čakali name in spredaj ladje iz Taršíša, da privedejo tvoje sinove od daleč, njihovo srebro in njihovo zlato z njimi, k imenu Gospoda, tvojega Boga in k Svetemu Izraelovemu, ker te je proslavil.
९द्वीपे माझी वाट पाहतात, आणि परमेश्वर तुझा देव याच्या नावासाठी, आणि इस्राएलाच्या पवित्रासाठी तुझ्या मुलांना आपले सोने व रुपे यांसहीत दुरुन आणावे, म्हणून पहिल्याने तार्शीशाची जहाजे वाट पाहतील, कारण त्याने तुला शोभविले आहे.
10 Sinovi tujcev bodo zgradili tvoja obzidja in njihovi kralji ti bodo služili, kajti v svojem besu sem te udaril, toda v svoji naklonjenosti sem imel usmiljenje nad teboj.
१०विदेश्यांची मुले तुझ्या भींती पुन्हा बांधतील, आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील. “जरी रागात मी तुला शिक्षा केली, परंतु आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे.”
11 Zato bodo tvoja velika vrata nenehno odprta; ne podnevi ne ponoči ne bodo zaprta, da ti bodo ljudje lahko prinašali sile poganov in da bodo lahko privedeni njihovi kralji.
११तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. ह्यासाठी की राष्ट्रे व त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे.
12 Kajti narod in kraljestvo, ki ti ne bo služilo, bo propadlo; da, ti narodi bodo popolnoma opustošeni.
१२खचित, जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करतील नाही त्याचा नाश होईल, ती राष्ट्रे पुर्णपणे विनाश पावतील.
13 Slava Libanona bo prišla k tebi, cipresa, bor in pušpan skupaj, da olepšajo kraj mojega svetišča in kraj svojih stopal bom naredil veličasten.
१३माझ्या पवित्र जागेला सुंदर करायला लबानोनाचे वैभव म्हणजे सरू, देवदारू आणि भद्रदारू हे तुझ्याकडे येतील, आणि मी माझे पायाचे स्थान गौरवशाली करील.
14 Tudi sinovi tistih, ki so te prizadeli, bodo prišli, upogibajoč se k tebi in vsi, ki so te prezirali, se bodo priklonili pri podplatih tvojih stopal in imenovali te bodo: › Gospodovo mesto, Sion Svetega Izraelovega.‹
१४ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील.
15 Kakor si bila zapuščena in osovražena, tako da noben človek ni šel skozi tebe, te bom naredil za večno odličnost, radost mnogih rodov.
१५“तू टाकलेली आणि तिरस्कारयुक्त होतीस, तुझ्यातून कोणीही जात नसे, मी तुला चिरकालासाठी गौरवाची एक गोष्ट करीन, एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन.”
16 Prav tako boš sesala mleko poganov in sesala prsi kraljev in vedela boš, da sem jaz, Gospod, tvoj Odrešenik in tvoj Odkupitelj, Mogočni Jakobov.
१६तू राष्ट्रांचे दुध पिणार आणि राजांचे स्तन चोखणार, मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव, तुला सोडवणारा आणि तारणारा, याकोबाचे सामर्थ्य आहे.
17 Za bron bom prinesel zlato in za železo bom prinesel srebro in za les bron in za kamne železo. Prav tako bom postavil [za] tvoje častnike mir in tvoje priganjače pravičnost.
१७“मी पितळेच्या ऐवजी सोने आणि लोखंडाच्या ठिकाणी चांदी आणीन, आणि लाकडाच्या ऐवजी, पितळे व दगडांच्या ऐवजी लोखंड आणील. तुझे अधिकारी शांती व तुझे कर घेणारे न्याय असे मी करीन.”
18 Nasilja ne bo več slišati v tvoji deželi niti pustošenja niti uničenja znotraj tvojih meja, temveč boš svoja obzidja imenovala Odrešenje in svoja velika vrata Hvala.
१८तुझ्या भूमीत पुन्हा कधीही हिंसेची वार्ता आणि नासधूस किंवा उजाडी ऐकू येणार नाही, परंतु तू तुझ्या वेशीला तारण आणि तुझ्या दरवाजांना स्तुती म्हणशील.
19 Sonce ne bo več tvoja svetloba podnevi niti ti za sijaj luna ne bo dajala svetlobe, temveč ti bo Gospod večna svetloba in tvoj Bog tvoja slava.
१९“दिवसा सुर्य तुझा प्रकाश असणार नाही, आणि चंद्राचा उजेडही तुझ्यावर चमकणार नाही. पण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश होईल, आणि तुझा देवच तुझे वैभव असणार.”
20 Tvoje sonce ne bo več zašlo niti se tvoja luna ne bo umaknila, kajti Gospod bo tvoja večna svetloba in dnevi tvojega žalovanja bodo končani.
२०“तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही. कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल, आणि तुझ्या शोकाचे दिवस संपतील.”
21 Prav tako tvoje ljudstvo – vsi bodo pravični. Podedovali bodo deželo na veke, mladiko mojega sajenja, delo mojih rok, da bom lahko proslavljen.
२१“तुझे सर्व लोक नितीमान असतील, आणि माझा महिमा व्हावा म्हणून मी लावलेले रोप, माझ्या हाताचे कृत्य असे ते सर्वकाळपर्यंत भूमी वतन करून घेतील.”
22 Najmanjši bo postal tisoč in malček mogočen narod. Jaz, Gospod, bom to pospešil ob svojem času.
२२“जो लहान तो हजार होईल, आणि जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. मी, परमेश्वर, त्या समयी हे लवकर घडवून आणणार.”