< 5 Mojzes 25 >
1 Če je polemika med ljudmi in pridejo na sodbo, da bi jim sodniki lahko sodili, potem bodo opravičili pravičnega in obsodili zlobnega.
१लोकांमध्ये वाद झाल्यास ते न्याय मागण्यासाठी आले तर न्यायाधीशांनी त्यांचा न्याय करावा. निर्दोष्याला निर्दोष ठरवावे आणि दोष्याला दोषी ठरवावे.
2 Zgodilo se bo, če bo zloben človek vreden, da bi bil pretepen, da mu bo sodnik povzročil, da se uleže in da bo z določenim številom udarcev pretepen pred njegovim obrazom, glede na njegovo krivdo.
२दोषी व्यक्ती फटक्यांच्या शिक्षेला पात्र ठरल्यास न्यायाधीशाने त्यास पालथे पाडावे व आपल्या समक्ष त्यास फटके मारुन घ्यावेत. फटक्यांची संख्या गुन्ह्याच्या प्रमाणात असावी.
3 Štirideset udarcev mu lahko naloži in ne več, da se ti tvoj brat ne bi zdel onečaščen, če bi prekoračil in ga pretepel z mnogimi udarci nad temi.
३चाळीस फटक्यांच्यावर कोणालाही शिक्षा होऊ नये. त्याच्यापेक्षा अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्या देखत अप्रतिष्ठा होईल.
4 Ne boš zavezal gobca volu, kadar mane žito.
४धान्याची मळणी करताना बैलाला मुसके बांधू नका.
5 Če bratje prebivajo skupaj in eden izmed njih umre in nima otroka, se žena mrtvega ne bo poročila zunaj, s tujcem. Njen svak bo šel noter k njej in jo vzel k sebi za ženo in ji izpolnil dolžnost soprogovega brata.
५दोन भाऊ एकत्र राहत असले आणि त्यातला एक मूलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या पत्नीने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करु नये. दिरानेच तिच्याशी लग्न करावे व दिराचे कर्तव्य बजावावे.
6 Zgodilo se bo, da bo prvorojenec, ki ga ona rodi, nasledil ime njegovega brata, ki je mrtev, da njegovo ime ne bo izbrisano iz Izraela.
६यानंतर तिला जो पहिला मुलगा होईल त्याने तिच्या मृत पतीचे नाव पुढे चालवावे. म्हणजे त्याचे नाव इस्राएलातून पुसले जाऊ नये.
7 Če pa mož ne mara vzeti svakinje, potem naj gre žena njegovega brata gor k velikim vratom do starešin in reče: ›Brat mojega soproga odklanja, da bi svojemu bratu vzdignil ime v Izraelu; noče izpolniti dolžnosti brata mojega soproga.‹
७त्या मृत व्यक्तीच्या भावाने आपल्या विधवा भावजयीशी लग्न करण्याचे नाकारले तर तिने गावाच्या वेशीपाशी वडीलधाऱ्या पंचांकडे जावे व सांगावे की “आपला दिर त्याच्या भावाचे नाव इस्राएलामध्ये राखायला राजी दिसत नाही. दिराच्या कर्तव्याला अनुसरुन तो माझ्याशी वागत नाही.”
8 Potem ga bodo starešine njegovega mesta poklicali in mu govorili. Če pa se temu zoperstavi in reče: ›Ne maram je vzeti, ‹
८अशावेळी वडिलांनी त्याच्या नगराच्या लोकांस बोलावून त्याच्याशी बोलावे. यावरही तो ऐकायला तयार नसेल, तिच्याशी लग्न करायला तयार नसेल
9 potem bo žena njegovega brata prišla k njemu v prisotnosti starešin in sezula njegov čevelj iz njegovega stopala in pljunila v njegov obraz in odgovorila ter rekla: ›Tako bo storjeno tistemu možu, ki noče graditi hiše svojega brata.‹
९तर सर्व वडिलांसमोर त्याच्यापुढे येऊन तिने त्याच्या पायातला जोडा काढावा. त्याच्या तोंडावर थुकावे आणि म्हणावे, “जो कोणी आपल्या भावाचा वंश वाढवत नाही त्याचे असेच करावे.”
10 Njegovo ime bo v Izraelu imenovano: ›Hiša tistega, ki je sezut.‹
१०जोडा काढून घेतलेल्याचे घराणे, असे मग त्याचे इस्राएलात सर्वत्र नाव होईल.
11 Kadar se možje skupaj prepirajo drug z drugim in se žena enega približa, da bi svojega soproga osvobodila iz roke tistega, ki ga udarja in iztegne svojo roko, da ga zgrabi za njegove genitalije,
११दोन पुरुषांच्या मारामारीमध्ये त्यातील एकाची पत्नी आपल्या नवऱ्याच्या मदतीसाठी मध्ये पडली असता तिने आपला हात पुढे करून मारणाऱ्याचे जननेंद्रिय पकडले,
12 potem boš odsekal njeno roko, tvoje oko se je ne bo usmililo.
१२तर दयामाया न दाखवता त्या स्त्रीचा हात तोडावा.
13 V svoji torbi ne boš imel različnih uteži, velike in male.
१३बनावट तराजू वापरुन लोकांची फसवणूक करु नये. वजने अति जड किंवा अति हलकी अशी तुझ्या पिशवीत नसावीत.
14 V svoji hiši ne boš imel različnih mer, velike in male.
१४आपल्या घरात मापे फार मोठी किंवा फार लहान असू नयेत.
15 Temveč boš imel popolno in pravično utež, popolno in pravično mero boš imel, da bodo tvoji dnevi lahko podaljšani v deželi, ki ti jo daje Gospod, tvoj Bog.
१५आपली वजने मापे अचूक आणि योग्य असावीत. म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही दीर्घकाळ रहाल.
16 Kajti vsi, ki počno takšne stvari, in vsi, ki počno nepravično, so ogabnost Gospodu, tvojemu Bogu.
१६खोट्या वजनमापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव ह्याला वीट आहे.
17 Spomni se kaj ti je po poti storil Amálek, ko ste izšli iz Egipta,
१७तुम्ही मिसरमधून येत असताना अमालेक येथील लोक तुमच्याशी कसे वागले ते आठवा.
18 kako te je srečal po poti in udaril najbolj zadnje od tebe, torej vse, kar je bilo slabotno za teboj, ko si bil ti slaboten in utrujen, on pa se ni bal Boga.
१८त्यांना देवाविषयी भीती नव्हती. तुम्ही दमले भागलेले असताना त्यांनी तुमच्यावर हल्ला केला. दमून मागे पडलेल्या तुमच्यातील दुर्बळांना त्यांनी ठार केले.
19 Zato bo, ko ti bo Gospod, tvoj Bog, dal počitek pred vsemi tvojimi sovražniki naokoli, v deželi, ki ti jo daje Gospod, tvoj Bog, za dediščino, da jo vzameš v last, da boš izpod neba izbrisal spomin na Amáleka. Tega ne boš pozabil.
१९म्हणून अमालेकांची आठवण सुद्धा तुम्ही पृथ्वीच्या पाठीवरुन पुसून टाकली पाहिजे. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्हास शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुम्हास विश्राम दिल्यावर हे अंमलात आणा. विसरू नका.