< Przysłów 12 >
1 Kto miłuje ćwiczenie, miłuje umiejętność; a kto ma w nienawiści karność, głupim jest.
१ज्याला शिक्षण प्रिय त्यास ज्ञान प्रिय, परंतु जो कोणी शासनाचा द्वेष करतो तो मूर्ख आहे.
2 Dobry odniesie łaskę od Pana; ale męża który złe myśli, Bóg potępi.
२परमेश्वर चांगल्या मनुष्यास कृपा देतो, पण वाईट योजना करणाऱ्याला तो दोषी ठरवतो.
3 Nie zmocni się człowiek z niezbożności; ale korzeń sprawiedliwych nie będzie poruszony.
३दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही, पण नीतिमानाचे उच्चाटण होणार नाही.
4 Żona stateczna koroną jest męża swego; ale która go do hańby przywodzi, jest jako zgniłość w kościach jego.
४सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे, परंतु जी कोणी लाज आणणारी ती त्याची हाडे सडविणाऱ्या रोगासारखी आहे.
5 Myśli sprawiedliwych są prawe: ale rady niepobożnych zdradliwe.
५नीतिमानाच्या योजना यथान्याय असतात, पण दुष्टांचा सल्ला कपटाचा असतो.
6 Słowa niepobożnych czyhają na krew; ale usta sprawiedliwych wybawiają ich.
६दुष्टांचे शब्द रक्तपात घडून आणण्यासाठी दबा धरून थांबतात, परंतु न्यायीचे शब्द त्यास सुरक्षित ठेवतात.
7 Niepobożni podwróceni bywają, tak, że ich niestaje; ale dom sprawiedliwych zostaje.
७दुर्जन उलथून टाकले जातात आणि नाहीसे होतात, पण नीतिमानाचे घर टिकते.
8 Z rozumu swego mąż chwalony bywa; ale kto jest przewrotnego serca, wzgardzony będzie.
८मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण जो विकृत निवड करतो त्याचा तिरस्कार होतो.
9 Lepszy jest człowiek podły, który ma sługę, niżeli chlubny, któremu nie staje chleba.
९जो आपणास प्रतिष्ठित दाखवतो पण त्याच्याकडे अन्न नसते; त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून फक्त सेवक असतो तो चांगला समजायचा.
10 Sprawiedliwy ma na pieczy żywot bydlątka swego; ale serce niepobożnych okrutne jest.
१०नीतिमान आपल्या प्राण्यांविषयीच्या गरजांची काळजी घेतो, पण दुष्टाचे दयाळूपणही क्रूर असते.
11 Kto sprawuje ziemię swoję, chlebem nasycony bywa; ale kto naśladuje próżnujących, głupi jest.
११जो कोणी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे विपुल अन्न असते, पण जो निरर्थक योजनेमागे धावतो तो बुद्धिहीन आहे.
12 Niepobożny pragnie obrony przeciw nieszczęściu; ale korzeń sprawiedliwych daje ją.
१२दुसऱ्यापासून चोरल्याची इच्छा दुर्जन करतो, पण नितीमानाचे फळ ते स्वतःपासून येते.
13 W przestępstwie warg upląta się złośnik; ale sprawiedliwy z ucisku wychodzi.
१३दुष्ट मनुष्य आपल्या पापी बोलल्याने पाशात पडतो, पण नीतिमान संकटातून निसटतो.
14 Z owocu ust każdy będzie nasycony dobrem, a nagrodę spraw rąk jego Bóg mu odda.
१४मनुष्य आपल्या मुखाच्या फळाकडून चांगल्या गोष्टींच्या योगे तृप्त होतो, त्यास आपल्या हातांच्या कामाचे प्रतिफळ मिळेल.
15 Droga głupiego zda się prosta przed oczyma jego; ale kto słucha rady, mądrym jest.
१५मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट असतो, परंतु सुज्ञ मनुष्य सल्ला ऐकून घेतो.
16 Gniew głupiego zaraz poznany bywa; ale ostrożny pokrywa hańbę swoję.
१६मूर्ख त्याचा राग लागलाच दाखवतो, पण जो दूरदर्शी आहे तो अपमानाकडे दुर्लक्ष करतो.
17 Kto mówi prawdę, opowiada sprawiedliwość; ale świadek kłamliwy mówi zdradę.
१७जो कोणी खरे बोलतो तो जे काय योग्य आहे ते सांगतो, पण खोटा साक्षीदार लबाड सांगतो.
18 Znajdzie takowego, co mówi słowa jako miecz przerażające; ale język mądrych jest lekarstwem.
१८कोणी असा असतो की, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, पण सुज्ञाची जिव्हा आरोग्य आणते.
19 Wargi prawdomówne utwierdzone będą na wieki; ale króciuchno trwa język kłamliwy.
१९सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल, पण लबाड बोलणारी जिव्हा क्षणिक आहे.
20 Zdrada jest w sercu tych, którzy złe myślą; ale którzy radzą do pokoju, mają wesele.
२०वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते, परंतु शांतीचा सल्ला देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो.
21 Nie spotka sprawiedliwego żadne nieszczęście; ale niezbożnicy pełni będą złego.
२१नीतिमानावर संकटे येत नाहीत, परंतु दुर्जनावर अडचणी येतात.
22 Obrzydliwością są Panu wargi kłamliwe; ale czyniący prawdę podobają mu się.
२२खोटे बोलणाऱ्या वाणीचा परमेश्वरास वीट आहे, पण जे कोणी प्रामाणिकपणे राहणारे त्यास आनंद देतात.
23 Człowiek ostrożny tai umiejętność; ale serce głupich wywołuje głupstwo.
२३शहाणा मनुष्य आपले ज्ञान गुप्त ठेवतो, पण मूर्खाचे हृदय मूर्खपणा ओरडून सांगते.
24 Ręka pracowitych będzie panowała; ale zdradliwa będzie dań dawała.
२४उद्योग्याचे हात अधिकार चालवतील, पण आळशाला गुलामासारखे राबावे लागेल.
25 Frasunek w sercu człowieczem poniża je; ale powieść dobra uwesela je.
२५मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते, पण चांगला शब्द त्यास आनंदित करतो.
26 Zacniejszy jest nad bliźniego swego sprawiedliwy; ale droga niezbożnych zawodzi ich.
२६नीतिमान आपल्या मित्राला मार्ग दाखवतो, पण दुष्टाचे मार्ग त्यांना बहकावतो.
27 Nie upiecze chytry obłowu swojego; ale człowiek pilny majętności kosztownych nabędzie.
२७आळशी आपण धरलेली शिकार भाजित नाही, पण उद्योगी मनुष्य मौल्यवान संपत्ती संपादन करतो.
28 Na ścieszce sprawiedliwości żywot, a na drodze ścieszki jej niemasz śmierci.
२८न्यायीपणाच्या मार्गात जीवन सापडते, आणि त्यांच्या वाटेत मरण नाही.