< Jeremiasza 16 >
1 I stało się słowo Pańskie do mnie, mówiąc:
१परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले, ते म्हणाले. संराष्ट्र आला:
2 Nie pojmuj sobie żony, ani miej synów ani córek na tem miejscu.
२तू आपणास पत्नी करून घेऊ नको आणि या ठिकाणी तुला मुले व मुली न होवोत.
3 Albowiem tak mówi Pan o synach i o córkach spłodzonych na tem miejscu, i o matkach ich, które ich zrodziły, i o ojcach ich, którzy ich spłodzili w tej ziemi:
३कारण या ठिकाणी जन्म घेणाऱ्या मुला आणि मुलींना आणि त्यांच्या आयांना ज्यांनी त्यांना जन्म दिला आणि त्यांचे बाप ज्यांमुळे ते या ठिकाणी जन्माला आले, त्यांना परमेश्वर असे म्हणतो,
4 Śmierciami ciężkiemi pomrą; nie będą ich płakać, ani ich pochowają, ale miasto gnoju na wierzchu ziemi będą; a mieczem i głodem wytraceni będą; i będą trupy ich pokarmem ptastwu niebieskiemu i i zwierzowi ziemskiemu.
४“ते रोगग्रस्त मृत्यू मरतील, त्यांच्यासाठी कोणीही शोक करणार नाही आणि त्यांना पुरले जाणार नाही. ते शेणखताप्रमाणे जमिनीवर असतील. कारण ते लोक तलवारीने आणि उपासमारीने नष्ट होतील. त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व भूमीवरील प्राण्यांस आहार असे होतील.”
5 Bo tak mówi Pan: Nie wchodź do domu żałoby, ani chodź na płacz, ani ich żałuj; bom odjął pokój mój od ludu tego, miłosierdzie i litość, mówi Pan.
५कारण परमेश्वर असे म्हणतो, ज्या घरी शोक आहे, त्या घरात जाऊ नकोस. विलाप करायला आणि सहानुभूती दाखवायला त्या लोकांजवळ जाऊ नको. कारण या लोकांपासून मी आपली शांती व प्रेमदया व करुणा काढून नेल्या आहेत, असे परमेश्वर म्हणतो.
6 Gdy pomrą wielcy i mali w tej ziemi, nie będą pogrzebieni, ani ich płakać będą; i nie będą się rzezać, ani sobie łysiny czynić dla nich;
६म्हणून या देशातील मोठे आणि लहान मरतील. ते पुरले जाणार नाहीत किंवा त्यांच्याबद्दल कोणी शोक करणार नाही. त्यांच्याकरिता कोणी आपल्याला कापून घेणार नाही किंवा आपले केस कापणार नाहीत.
7 Ani im dadzą jeść, aby ich w smutku cieszyli nad umarłym; ani im dadzą pić z kubka pocieszenia po ojcu ich i po matce ich;
७मृतांबद्दल शोक करणाऱ्यांसाठी कोणीही अन्न आणणार नाही. ज्यांचे आईवडील गेले आहेत, त्यांचे कोणी सांत्वन करणार नाही. मृतांसाठी शोक करणाऱ्यांसाठी, कोणीही पेये आणून सांत्वन करणार नाही.
8 Także do domu uczty nie wchodź, abyś zasiadał z nimi, i jadł, i pił.
८ज्या घरात मेजवानी सुरु आहे, अशा घरात त्यांच्यासोबत तू खायला व प्यायला बसू जाऊ नकोस.
9 Albowiem tak mówi Pan zastępów, Bóg Izraelski: Oto Ja sprawię, iż ustanie na tem miejscu przed oczyma waszemi, i za dni waszych głos wesela, i głos radości, głos oblubieńca, i głos oblubienicy.
९कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, पाहा! तुझ्या डोळ्या देखत मी आनंद आणि उत्सव, नवऱ्याचा आणि नवरीचा शब्द बंद होणार, असे मी करीन.
10 A gdy opowiesz ludowi temu wszystkie te słowa, a rzekliby do ciebie: Przecz Pan wyrzekł przeciwko nam to wszystko wielkie złe? I cóż jest za nieprawość nasza, i co za grzech nasz, którymeśmy zgrzeszyli przeciwko Panu, Bogu naszemu?
१०आणि मग असे होईल, तू ही वचने या लोकांस सांगशील आणि ते तुला म्हणतील, परमेश्वराने आमच्याबद्दल या भयंकर गोष्टी का सांगितल्या? आम्ही काय चूक केली? आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध काय पाप केले?
11 Tedy rzeczesz do nich: Przeto, iż mię opuścili ojcowie wasi, (mówi Pan) a chodzili za bogami cudzymi, i służyli im, i kłaniali się im, lecz mnie opuścili, i zakonu mego nie przestrzegali.
११तेव्हा तू त्यांना असे सांग, परमेश्वर असे म्हणतो: कारण तुमच्या पूर्वजांनी मला सोडून अन्य दैवतांच्या मागे गेले आणि त्यांची पूजा केली व त्यांना नमन केले. त्यांनी मला सोडले आणि माझे नियमशास्त्र पाळले नाही.
12 A wy dalekoście gorzej czynili, niż ojcowie wasi; albowiem oto każdy chodzi za uporem złego serca swego, nie słuchając mię;
१२पण तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्ही वाईट पापे केलीत. कारण पाहा! प्रत्येक मनुष्य आपल्या दुष्ट हृदयाच्या हट्टाप्रमाणे चालत आहे. कोणीही असा नाही जो माझे ऐकतो.
13 Dlatego wyrzucę was z tej ziemi do ziemi, którejście nie znali, wy i ojcowie wasi, a tam służyć będziecie bogom cudzym we dnie i w nocy, dokąd wam nie okażę miłosierdzia.
१३म्हणून मी तुम्हास देशाबाहेर काढून तुम्हास किंवा तुमच्या पूर्वजांनासुद्धा माहीत नसलेल्या देशात घालवून देईन, आणि दिवसरात्र तुम्ही तेथे दुसऱ्या देवांची पूजा कराल, कारण मी तुमच्यावर अनुग्रह करणार नाही.
14 Przetoż oto dni idą, mówi Pan, że nie rzeką więcej: Jako żyje Pan, który wywiódł synów Izraelskich z ziemi Egipskiej.
१४यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो. असे दिवस येत आहेत, ज्यात, ज्याने मिसरच्या भूमीतून इस्राएलाच्या लोकांची सुटका तो परमेश्वर जिवंत आहे. असे लोक आणखी म्हणणार नाही.
15 Ale: Jako żyje Pan, który wywiódł synów Izraelskich z ziemi północnej, i ze wszystkich ziem, do których ich był wygnał, gdy ich zasię przywiodę do ziemi ich, którąm dał ojcom ich.
१५ज्याने इस्राएलाच्या लोकांची उत्तरेतील प्रदेशातून सुटका केली आणि त्या देशात जिथे त्याने त्यांना पांगवले, त्यातूनही काढून वर आणले तो परमेश्वर जिवंत आहे. असे ते म्हणतील आणि त्यांचा जो राष्ट्र मी त्याच्या पूर्वजांना दिला होता त्यामध्ये मी त्यांना परत आणीन.
16 Oto Ja poślę do wielu rybitwów, (mówi Pan) aby ich łowili; potem poślę do wielu łowców, aby ich łapali na wszelkiej górze i na wszelkim pagórku, i w dziurach skalnych.
१६परमेश्वर असे म्हणतो, पाहा! लवकरच मी पुष्कळ मासे धरणाऱ्यांना पाठवीन. म्हणजे ते लोकांस मासे धरल्यासारखे पकडतील. त्यानंतर पुष्कळ शिकाऱ्यांना पाठवीन म्हणजे ते प्रत्येक डोंगर, टेकड्या व कपारी यांमधून त्यांची शिकार करतील.
17 Oczy moje patrzą na wszystkie drogi ich; nie są utajone przed obliczem mojem, ani jest zakryta nieprawość ich przed oczyma mojemi.
१७कारण माझे डोळे त्यांच्या मर्गावर आहेत, ते माझ्यासमोरुन लपलेले नाहीत. त्यांचे अन्याय माझ्या डोळ्यांपासून लपलेला नाहीत.
18 I oddam im pierwej w dwójnasób za nieprawości ich, i za grzechy ich, przeto, że ziemię moję splugawili trupami obrzydliwości swojej, i sprosnościami swemi napełnili dziedzictwo moje.
१८मी पहिल्याने त्याच्या त्याच्या अन्यायाची आणि पापांची फेड दुपटीने करीन, कारण माझी भूमी त्यांनी आपल्या तिरस्करणीय मूर्तींच्या आकृतींनी विटाळवीली आहे. आणि माझे वतन त्यांनी आपल्या ओंगळ मूर्ती स्थापून कलंकित केले आहे.
19 Panie, mocy moja i siło moja, i ucieczko moja w dzień utrapienia! do ciebie przyjdą narody od kończyn ziemi, i rzekną: Zaiste się fałszu trzymali ojcowie nasi, i marności, w których żadnego pożytku nie było.
१९परमेश्वरा, तूच माझे सामर्थ्य आहेस आणि माझे संरक्षण आहेस. संकटकाळी धावत जाऊन आश्रय घ्यावा असे सुरक्षित स्थान तू आहेस. पृथ्वीच्या शेवटापासून राष्ट्रे तुझ्याकडे येतील आणि ते म्हणतील, “आमच्या वाडवडिलांना कपटाचा वारसा मिळाला आहे. जे खाली आहे, त्यामध्ये काहीच हित नाही.”
20 Izali sobie człowiek uczynić może bogów? ponieważ sami nie są bogami.
२०लोक स्वत: साठी देव निर्माण करु शकतील काय? पण ते देव नव्हेतच.
21 Dlatego oto Ja sprawię, aby poznali tym razem; sprawię, mówię, aby poznali rękę moję i moc moję, i dowiedzieli się, że imię moje jest Pan.
२१यास्तव पाहा! परमेश्वर म्हणतो “मी त्यांना कळवीन, या एकदाच मी अपला हात व आपले सामर्थ्य त्यांना कळवीन, म्हणजे ते जाणतील की माझे नाव परमेश्वर आहे.”