< Wyjścia 19 >
1 Miesiąca trzeciego po wyjściu synów Izraelskich z ziemi Egipskiej, w tenże dzień przyszli na puszczą Synaj.
१मिसरामधून प्रवासास निघाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात इस्राएल लोक सीनायच्या रानात येऊन पोहोचले.
2 Bo ruszywszy się z Rafidym, i przyszedłszy aż na puszczą Synaj, położyli się obozem na puszczy, i rozbił tam Izrael namioty przeciw górze.
२ते लोक रफीदिम सोडून सीनायच्या रानात आले होते; इस्राएल लोकांनी पर्वतासमोर आपला तळ दिला.
3 A Mojżesz wstąpił do Boga, i zawołał nań Pan z góry, mówiąc: Tak powiesz domowi Jakóbowemu, i oznajmisz synom Izraelskim:
३तेव्हा मोशे पर्वत चढून देवाकडे गेला. परमेश्वराने त्यास पर्वतावरून हाक मारून सांगितले की, “तू याकोबाच्या वंशजांना हे सांग, इस्राएल लोकांस हे सांग.
4 Wyście widzieli, com uczynił Egipczanom, i jakom was nosił niby na skrzydłach orłowych, i przywiodłem was do siebie.
४मिसऱ्यांचे मी काय केले आणि तुम्हास गरुडाच्या पंखावर उचलून घेऊन माझ्याजवळ कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे.
5 Przetoż teraz jeźli słuchając posłuszni będziecie głosu memu, i strzec będziecie przymierza mego, będziecie mi własnością nad wszystkie narody; chociaż moja jest wszystka ziemia.
५म्हणून मी आता तुम्हास सांगतो की तुम्ही माझी वाणी खरोखर ऐकाल आणि माझ्या कराराचे पालन कराल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे.
6 A wy będziecie mi królestwem kapłańskiem, i narodem świętym. Teć są słowa, które mówić będziesz do synów Izraelskich.
६तुम्ही मला, याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. तू इस्राएल लोकांस हेच सांग.”
7 Przyszedłszy tedy Mojżesz zwołał starszych z ludu, i przełożył im wszystkie te słowa, które mu rozkazał Pan.
७मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना एकत्र बोलावले; परमेश्वराने त्यास जी वचने सांगण्याची आज्ञा केली होती ती सर्व त्याने त्यांच्यापुढे सांगितली.
8 I odpowiedział wszystek lud, spólnie mówiąc: Wszystko, co Pan rzekł, uczynimy. I odniósł Mojżesz słowa ludu do Pana.
८आणि सर्व लोक मिळून म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेले सर्व आम्ही करू.” मोशेने परमेश्वरास लोकांचे म्हणणे सांगितले.
9 I rzekł Pan do Mojżesza: Oto, Ja, przyjdę do ciebie w gęstym obłoku, aby słuchał lud, gdy będę mówił z tobą, ażeby też wierzyli tobie na wieki; albowiem opowiedział był Mojżesz słowa ludu onego Panu.
९आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी दाट ढगात तुझ्याजवळ येऊन तुझ्याशी बोलेन आणि माझे तुझ्याबरोबरचे बोलणे सर्व लोकांस ऐकू जाईल;” त्यांचा नेहमी तुझ्यावरही विश्वास बसेल, मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वरास सांगितले.
10 Mówił zaś Pan do Mojżesza: Idź do ludu, a poświęć je dziś i jutro, a niech wypiorą szaty swoje.
१०परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू जाऊन आज आणि उद्या लोकांस पवित्र कर; त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावेत.
11 I niech będą gotowi na dzień trzeci; albowiem trzeciego dnia zstąpi Pan przed oczyma wszystkiego ludu na górę Synaj.
११तिसऱ्या दिवशी त्यांनी तयार रहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.
12 I zamierzysz granice ludowi w około, mówiąc: Strzeżcie się, abyście nie wstępowali na górę, ani się dotykali brzegu jej; wszelki, kto by się dotknął góry, śmiercią umrze.
१२परंतु लोकांसाठी तेथे सीमारेषा आखून लोकांनी ती ओलांडू नये, त्यांना बजावून सांग; पर्वतावर कोणीही चढू नये जो कोणी पर्वताला स्पर्श करेल तो खास आपल्या जिवाला मुकेल.
13 Nie tknie się go ręka, ale kamieniem ukamionują go; albo strzelając zastrzelą go; bądź bydlę, bądź człowiek, nie będzie żył. Gdy przewłocznie trąbić będą, niech wstąpią na górę.
१३कोणीही त्यास हात लावू नये. हात लावला तर त्यास दगडमार करावी किंवा बाणांनी विंधावे, तो पशू असो किंवा मनुष्य असो, त्यास जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घ आवाज होईल तेव्हा लोकांनी पर्वताजवळ यावे.”
14 Zstąpił tedy Mojżesz z góry do ludu, i poświęcił lud; a uprali szaty swoje.
१४मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले.
15 I mówił do ludu: Bądźcie gotowi na dzień trzeci, nie przystępujcie do żon.
१५मग मोशे लोकांस म्हणाला, “तीन दिवस तुम्ही देवाची भेट घेण्यासाठी तयार राहा. तोपर्यंत स्त्रीस्पर्श करू नका.”
16 Stało się tedy dnia trzeciego rano, że były grzmienia, i błyskawice, i gęsty obłok nad górą, i głos trąby bardzo potężny; a bał się wszystek lud, który był w obozie.
१६तिसरा दिवस उजडताच मेघगर्जना झाली व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग आले आणि प्रचंड शिंगाचा फार आवाज होऊ लागला. तेव्हा छावणीत राहणारे सर्व लोक थरथर कापू लागले.
17 I wywiódł Mojżesz lud na przeciwko Bogu z obozu, a stanęli pod samą górą.
१७नंतर मोशेने लोकांस छावणीतून बाहेर काढून देवाच्या दर्शनाला बाहेर आणले आणि ते पर्वताच्या तळाजवळ उभे राहिले.
18 A góra Synaj kurzyła się wszystka, przeto, iż zstąpił na nią Pan w ogniu; i występował dym z niej, jako dym z pieca, i trzęsła się wszystka góra bardzo.
१८परमेश्वर सीनाय पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून तो पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा त्याचा धूर वर आला, आणि सर्व पर्वत थरथरू लागला.
19 A gdy się głos trąby im dalej tem bardziej rozlegał, Mojżesz mówił, a Bóg mu odpowiadał głosem.
१९शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्यास आपल्या वाणीने उत्तर देत गेला.
20 I zstąpił Pan na górę Synaj, na wierzch góry, i wezwał Pan Mojżesza na wierzch góry, i wstąpił tam Mojżesz.
२०परमेश्वराने पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला सीनाय पर्वताच्या शिखरावर बोलावले. तेव्हा तो पर्वतावर गेला.
21 Zaczem rzekł Pan do Mojżesza: Zstąp, przestrzeż lud, by snać nie przestąpili kresu, chcąc Pana widzieć, aby ich nie padło wiele:
२१परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू खाली जा आणि लोकांस बजावून सांग की त्यांनी मर्यादा ओलांडून परमेश्वर काय आहे ते पाहण्यास तिकडे येऊ नये. जर ते तसे करतील तर बरेच जण मरतील.
22 Nawet i kapłani, którzy przystępują do Pana, niech się poświęcą, by ich snać nie potracił Pan.
२२तसेच परमेश्वराजवळ येणाऱ्या याजकांनीही पवित्र व्हावे; नाहीतर परमेश्वर त्यांना शिक्षा करील.”
23 I rzekł Mojżesz do Pana: Nie będzie lud mógł wnijść na górę Synaj, ponieważeś ty nas przestrzegł, mówiąć: Ogranicz górę, a poświęć ją.
२३मोशेने परमेश्वरास सांगितले, “लोक सीनाय पर्वतावर येऊ शकणार नाहीत, कारण तूच स्वत: आम्हांला मर्यादा घालून दिली व सक्त ताकीद दिली व तो अधिक पवित्र करण्यास सांगितले.”
24 Któremu Pan rzekł: Idź, zstąp, a zaś tu wstąpisz, ty i Aaron z tobą: lecz kapłani i lud niech nie przestępują kresu, aby wstąpili do Pana, by ich snać nie potracił.
२४परमेश्वर त्यास म्हणाला, “तू खाली लोकांकडे जा व मागे येताना अहरोनाला तुझ्याबरोबर परत आण, परंतु याजक किंवा इतर लोकांस इकडे येऊ देऊ नको; ते जर माझ्याजवळ येतील तर मी त्यांना शिक्षा करीन.”
25 Tedy zstąpił Mojżesz do ludu i powiedział im to.
२५मग मोशेने खाली जाऊन लोकांस हे सांगितले.