< عاموس 7 >
خداوند یهوه به من چنین نمودار ساخت که اینک در ابتدای روییدن حاصل رش دوم ملخها آفرید و هان حاصل رش دوم بعد از چیدن پادشاه بود. | ۱ 1 |
१परमेश्वराने मला असे दाखविले की पाहा, वसंत ऋतुचे पीक वर येत असताच त्याने टोळ निर्माण केले. पहिल्या पिकाची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे पीक होय.
و چون تمامی گیاه زمین را خورده بودند، گفتم: «ای خداوند یهوه مستدعی آنکه عفو فرمایی! چگونه بعقوب برخیزد چونکه کوچک است؟» | ۲ 2 |
२टोळांनी देशातील सर्व गवत खाऊन झाल्यानंतर मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हास क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही, कारण तो फारच लहान आहे.”
و خداوند از این پشیمان شد وخداوند گفت: «نخواهد شد.» | ۳ 3 |
३मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मन परिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”
خداوند یهوه به من چنین نمودار ساخت و اینک خداوند یهوه آتش را خواند که محاکمه بکند. پس لجه عظیم رابلعید و زمین را سوزانید. | ۴ 4 |
४प्रभू परमेश्वराने, मला पुढील गोष्टी दाखविल्या, पाहा, परमेश्वर देवाने अग्नीला न्याय करण्यास बोलावले. त्याने महासागर कोरडा केला व भूमीही खाऊन टाकणार होता.
پس گفتم: «ای خداوندیهوه از این باز ایست! یعقوب چگونه برخیزدچونکه کوچک است؟» | ۵ 5 |
५पण मी म्हणालो, “हे परमेश्वर देवा, थांब, याकोब कसा वाचेल? करण तो खूपच लहान आहे.”
و خداوند از این پشیمان شد و خداوند یهوه گفت: «این نیز نخواهد شد.» | ۶ 6 |
६मग परमेश्वराचे या गोष्टीबाबत हृदयपरिवर्तन झाले. प्रभू परमेश्वर म्हणाला, “हे ही घडणार नाही.”
و به من چنین نمودار ساخت که خداوند بر دیوارقایمی ایستاده بود و شاقولی در دستش بود. | ۷ 7 |
७परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. पाहा, परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता.
و خداوند مرا گفت: «ای عاموس چه میبینی؟» گفتم: «شاقولی.» خداوند فرمود: «اینک من شاقولی در میان قوم خود اسرائیل میگذارم و بار دیگر از ایشان درنخواهم گذشت. | ۸ 8 |
८परमेश्वर मला म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो ओळंबा, मग प्रभू म्हणाला, “पाहा, माझ्या मनुष्यांमध्ये, इस्राएलमध्ये मी ओळंबा धरीन. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही.
و مکانهای بلند اسحاق ویران و مقدس های اسرائیل خراب خواهد شد و به ضد خاندان یربعام با شمشیر خواهم برخاست.» | ۹ 9 |
९इसहाकाच्या उच्च स्थानाचा नाश होईल, इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील, आणि मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”
و امصیای کاهن بیت ئیل نزد یربعام پادشاه اسرائیل فرستاده، گفت: «عاموس در میان خاندان اسرائیل بر تو فتنه میانگیزد و زمین سخنان او رامتحمل نتواند شد. | ۱۰ 10 |
१०बेथेल येथील याजक अमस्या ह्याने, “इस्राएलाचा राजा, यराबामाला निरोप पाठविला. आमोसाने इस्राएलाच्या घरामध्ये तुझ्याविरुध्द कट केला आहे. त्याचे सर्व शब्द देशाला सहन करवत नाही.
زیرا عاموس چنین میگوید: یربعام به شمشیر خواهد مرد و اسرائیل از زمین خود البته به اسیری خواهد رفت.» | ۱۱ 11 |
११कारण आमोस असे म्हणतो, यराबाम तलवारीने मरेल, आणि इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या देशातून कैदी म्हणून बाहेर नेले जाईल.”
و امصیا به عاموس گفت: «ای رایی برو و به زمین یهودا فرار کن و در آنجا نان بخور و در آنجا نبوت کن. | ۱۲ 12 |
१२अमस्या आमोसला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, खाली यहूदात पळून जा आणि तेथेच भाकर खाऊन तुझे प्रवचन दे.
اما در بیت ئیل بار دیگر نبوت منماچونکه آن مقدس پادشاه و خانه سلطنت میباشد.» | ۱۳ 13 |
१३पण यापुढे बेथेलमध्ये संदेश देऊ नकोस. कारण ही राजाचे पवित्रस्थान आहे व राज घराणे आहेत.”
عاموس در جواب امصیا گفت: «من نه نبی هستم و نه پسر نبی بلکه رمه بان بودم و انجیرهای بری را میچیدم. | ۱۴ 14 |
१४मग आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नव्हतो व संदेष्ट्याचा मुलगाही नव्हतो. मी गुरांचे कळप राखणारा आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो.
و خداوند مرا از عقب گوسفندان گرفت و خداوند مرا گفت: برو و بر قوم من اسرائیل نبوت نما. | ۱۵ 15 |
१५मी कळपामागे चालण्यातून परमेश्वराने मला बोलावून घेतले, आणि मला म्हटले, ‘जा, माझ्या लोकांस, इस्राएलाला, भविष्य सांग.’
پس حال کلام خداوندرا بشنو: تو میگویی به ضد اسرائیل نبوت مکن وبه ضد خاندان اسحاق تکلم منما. | ۱۶ 16 |
१६म्हणून आता परमेश्वराचे वचन ऐक, ‘इस्राएलविरुध्द संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुध्द प्रवचन देऊ नकोस’ असे तू मला सांगतोस.
لهذاخداوند چنین میگوید: زن تو در شهر مرتکب زناخواهد شد و پسران و دخترانت به شمشیرخواهند افتاد و زمینت به ریسمان تقسیم خواهدشد و تو در زمین نجس خواهی مرد و اسرائیل اززمین خود البته به اسیری خواهد رفت.» | ۱۷ 17 |
१७पण परमेश्वर असे म्हणतो, ‘तुझी पत्नी गावची वेश्या होईल; तुझी मुले-मुली तलवारीने मरतील, तुझी भूमी सूत्राने विभागीत करण्यात येईल, तू अपवित्र जागी मरशील, इस्राएलाच्या लोकांस निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.’”